मनोरंजन

जळगाव मनोरंजन

पहिल्या आशियाई चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन संदीप सावंत यांचे हस्ते तर समारोपाला दीपल लांजेकर!

जळगाव (प्रतिनिधी) पहिल्या आशियाई चित्रपट महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून, येत्या १ ते ४ मार्च दरम्यान माया देवी नगर येथील रोटरी हॉल येथे हा महोत्सव संपन्न होत आहे. महोत्सवाचे उद्घाटन १ मार्च रोजी सकाळी १० वाजता आ. स्मिता ताई वाघ आणि ‘श्वास’ चे दिग्दर्शक संदीप सावंत यांचे हस्ते योजण्यात आले असून, समारोप ४ मार्च रोजी सायंकाळी ७:३० वाजता जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांचे हस्ते संपन्न होणार आहे. या प्रसंगी फर्जंद चित्रपटाचे चे दिग्दर्शक दीपक लांजेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पर्यटन वा सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या सहयोगाने अजिंठा फिल्म सोसायटी यांच्या सहकार्याने समर्पण संस्थेच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन […]

मनोरंजन

डोंबिवली रिटर्न : वेगळ्या अनुभवाचे ‘रिटर्न तिकीट’ ( चित्रपट समीक्षा )

मध्यमवर्गीय, सामान्य माणुस, सरळ स्वभावाचा एका मार्गाने जाणारा, अत्यंत पापभिरू, अश्या सरळ-साधेपणाने जीवन जगणार्‍या व्यक्तीच्या आयुष्यात जर काही मोहाचे प्रसंग आले तर त्याची मानसिकता कशी होईल, कोणत्या संकटाला त्याला सामोरे जावे लागेल, अशा कल्पनेवर आधारित ‘डोंबिवली रिटर्न’ ह्या सिनेमाची निर्मिती कॅरंबोला क्रियेशन्सने केली आहे. याचे निर्माते संदीप कुलकर्णी, महेंद्र अटोले, गुरमीत सिंग, कपिल झवेरी असून कथा-पटकथा-संवाद-दिग्दर्शन महेंद्र तेरेदेसाई यांचे आहे. छायाचित्रण उदयसिंग मोहिते, संगीत शैलेंद्र बर्वे, गीते चंद्रशेखर सानेकर, मुकुंद सोनावणे यांची असून यामध्ये संदीप कुलकर्णी, राजेश्‍वरी सचदेव, ऋषिकेश जोशी, अमोल पराशर, सिया पाटील, तृषनिका शिंदे या कलाकारांनी भूमिका साकारलेल्या आहेत. एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाचे जीवन जगणारा अनंत वेलणकर ह्याची […]

मनोरंजन

पहा- केसरीचा जबरदस्त ट्रेलर (व्हिडीओ)

मुंबई प्रतिनिधी । अक्षयकुमारची प्रमुख भूमिका असणाया केसरी या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला असून याला सोशल मीडियात जोरदार प्रतिसाद लाभला आहे. सरगर्‍ही येथील गाजलेल्या लढाईवर आधारित केसरी या चित्रपटाबाबत आधीच प्रचंड उत्सुकता लागली आहे. यात फक्त २१ शीख सैनिकांनी जवळपास दहा हजार अफगाणी सैन्याचा केलेला प्रतिकार हा इतिहासात अजरामर झालेला आहे. केसरी चित्रपट याच लढाईवर आधारित असून यामध्ये अक्षयने हवलदार अनुराग सिंग यांची भूमिका केली आहे. यामध्ये परिणिती चोप्राचीही भूमिका आहे. २१ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शीत होत असून आज याचा ऑफिशियल ट्रेलर लाँच करण्यात आला. पहा– केसरीचा ट्रेलर.

मनोरंजन राष्ट्रीय व्हायरल मसाला

सावधान ! व्हॉट्सअॅप गृपवर अॅड करण्याआधी घ्यावी लागणार परवानगी

नवीदिल्ली (वृत्तसंस्था) १३० कोटी ग्राहकांसह व्हॉट्सअॅप आजच्या घडीला जगातील सर्वाधिक पसंतीस उतरलेले इन्सटंट मेसेजिंग अॅप म्हणून गणले जाते. यात २० कोटी भारतीयांचा समावेश आहे. व्हॉट्सअॅपची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे अधिकाधिक चांगली सेवा देता यावी म्हणून हे सतत नवनवीन अपडेट्स देत असते. लाँच झाल्यापासूनच व्हॉट्सअॅपने अनेक नवे फीचर्स दिले आहेत. या फीचर्समुळेच ते पूर्वीपेक्षा अधिक उत्तम आणि सुरक्षित झाले आहे. एवढेच नव्हे तर व्हॉट्सअॅप येणाऱ्या काळात आपल्या अॅपमध्ये नवीन फीचर्स अॅड करण्याच्या तयारीत आहे. लवकरच नव्या फीचर्सचा यात समावेश होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशाच नवीन येणाऱ्या फीचर्सबाबत जाणून घेऊया. व्हॉट्सअॅप बिटा इन्फोनुसार व्हॉट्सअॅप ग्रुप इन्व्हिटेशन फीचरवर आता काम सुरू आहे […]

मनोरंजन

पाकी कलावंतांना बॉलिवुडचे दरवाजे बंद

मुंबई प्रतिनिधी । पुलवामा येथील हल्ल्यानंतर आता चित्रपटसृष्टी पाकी कलावंतांच्या विरूध्द एकवटल्याचे दिसून येत असून त्यांना बॉलिवुडचे दरवाजे बंद होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जम्मू-काश्मीरमधील हल्ल्याच्या निषेधार्थ आज गोरेगाव येथील फिल्मसिटीमधील शूटिंग बंद ठेवण्यात आलं होतं. दुपारी येथे पुलवामातील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जवानांच बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही अशी शपथ यावेळी घेण्यात आली. याप्रसंगी इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पंडित म्हणाले की, यापुढे पाकिस्तानी कलाकारांसोबत काम केलं जाणार नाही. पाकिस्तानमधील अनेक कलावंत बॉलिवुडच्या माध्यमातून प्रसिध्द झाले असून त्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे.

मनोरंजन

आनंदी गोपाळ : एक प्रभावी यशोगाथा ( चित्रपट समीक्षा)

सुमारे सव्वाशे वर्षापूर्वी इंग्रजी शिक्षणाचा प्रसार / प्रचार सुरु झाला होता, त्या काळात काहीतरी वेगळे करणाच्या वृत्तीची माणसे होती. याच काळात गोपाळ विनायक जोशी हे शिक्षणाच्या ध्येयाने पछाडलेले होते. त्यांनी आनंदी नावाच्या पत्नीला इंग्रजी भाषा शिकण्यासाठी प्रवृत्त केले. इतकेच नाही तर त्यांनी तिच्याकडून वैद्यकीय अभ्यास पूर्ण करण्यासाठी ते तिला अमेरिकेला पाठवले आणि आनंदीबाई गोपाळराव जोशी यांनी सुद्धा आपल्या हिमतीवर, जिद्दीने तो अभ्यास पूर्ण केला. गोपाळराव यांच्या सोबतीने आनंदीबाई फक्त शिकल्याच नाहीत तर भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान त्यांनी मिळवला. त्यांच्या दोघांच्या नाते संबंधावर असलेला सहयोगाचा प्रवास आनंदी गोपाळ मध्ये सादर केला आहे. नमः पिक्चर्स, फ्रेश लाईम फिल्म्स प्रोडक्शनने ह्या […]

मनोरंजन राष्ट्रीय व्हायरल मसाला

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना स्वाईन फ्लू

मुंबई (प्रतिनिधी) ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमींना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. सर्दी-खोकला झाल्यामुळे त्या तपासणीसाठी गेल्या होत्या, त्यावेळी चाचणी केल्यानंतर शबाना यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निदान झाले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हॉस्पिटलाईज झाल्यामुळे मला विसाव्यासाठी वेळ मिळत आहे, अशी प्रतिक्रिया शबाना आझमी यांनी दिली आहे. ‘मला शांत बसून आत्मचिंतनासाठी फार कमी वेळ मिळतो. मात्र आता जबरदस्ती विश्रांती घ्यावी लागत आहे. मी रुग्णालयात असून वेगाने रिकव्हरी होत आहे’ असेही शबाना आझमींनी सांगितले आहे.शबाना आझमी नुकत्याच जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलला गेल्या होत्या. शबाना आझमी या प्रसिद्ध गीतकार कैफी आझमी यांच्या कन्या, तर गीतकार जावेद अख्तर यांच्या पत्नी आहेत. 1974 साली […]

मनोरंजन व्हायरल मसाला

Valentine’s Day Special : प्रेमाचा गोडवा वाढवा ‘या’ गाण्यांसोबत ! (व्हिडीओ)

आज प्रेम दिन अर्थात व्हॅलेंटाईन्स डे साजरा केला जात आहे. कुणी कितीही नाक मुरडले तरी याला उघड अथवा छुप्या पध्दतीत साजरा करणार्‍यांची संख्या खूप आहे. आणि प्रेम म्हटल्यानंतर गाणी आलीच. प्रेमातील प्रत्येक टप्प्यांवर गाणी आपली साथसंगत करत असतात. आज प्रेम दिनाचे औचित्य साधून प्रेमाचा गोडवा वाढवणारी याच प्रकारची गाणी आपल्यासाठी सादर करत आहोत. १) पहला नशा…पहला खुमार- पहिल्या प्रेमातील मुग्धता अतिशय भावविभोर अवस्थेत अभिव्यक्त करणारे हे गाणे प्रेमीजनांच्या हृदयात घर करून आहे. ‘जो जिता वो ही सिकंदर’ चित्रपटातील या गाण्याचे चित्रकरण स्लो-मोशनमध्ये करण्यात आले असून ते याच्या गोडव्याला नवीन उंची प्रदान करणारे ठरले आहे. २) प्यार तेरी पहली नजर को […]

जळगाव मनोरंजन शिक्षण

सार्वजनिक विद्यालयात ‘कलाविष्कार’ जल्लोषात साजरा

असोदा ता.जळगाव (वार्ताहर)  असोदा येथे सार्वजनिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे ‘कलाविष्कार’ स्नेहसंमेलन जल्लोषात साजरे करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटन सर्वोदय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलासदादा चौधरी यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे सचिव कमलाकरदादा सावदेकर, चेअरमन उध्दवदादा पाटील, तसेच संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ उपस्थित होते. कलाविष्कार कार्यक्रमात लोककला, स्त्री-भ्रूणहत्या, नशामुक्ती,शेतकरी आत्महत्या, पर्यावरण या विषयावर संदेश देणारे कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. या कार्यक्रमाला गावातील प्रेक्षकांनी उस्फूर्तपणे दाद दिली. कार्यक्रमाचे परीक्षण  प्रणिता झोपे व सुनीता पाटील यांनी केले. सूत्रसंचालन चारुलता टोके,शुभांगीनी महाजन,मंगला नारखेडे,गोपाळ महाजन यांनी केले तर आभार शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या खाचणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक डॉ. मिलिंद बागुल व सर्व […]

जळगाव मनोरंजन

पु. ना. गाडगिळ कला दालनाच्या प्रेमात जर्मनी युवती ! (व्हिडीओ)

दर रविवारी लाईव्ह पोर्ट्रेट पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड जळगाव संजय सपकाळे । शहरातील पु.ना. गाडगीळ कलादालनात प्रत्येक रविवारी विख्यात चित्रकार हे लाईव्ह स्केच रेखाटत असतात. यात या रविवारी एका जर्मन युवतीचे पोर्ट्रेट योगेश सुतार यांनी रेखाटले. शहरातील रिंगरोडवर असणार्‍या पु.ना. गाडगीळ या विख्यात सराफा पेढीमध्ये अतिशय भव्य असे कालदालन असून ते रसिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले आहे. या कला दालनात विविध ख्यातप्राप्त चित्रकारांची कला प्रदर्शने होत असतात. याशिवाय, येथे प्रत्येक रविवारी लाईव्ह पोर्ट्रेट कार्यक्रम होतो. याच्या अंतर्गत विख्यात चित्रकार हे नागरिकांचे पोर्ट्रेट या प्रकारातील चित्र रेखाटत असतात. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून कुणीही याला अगदी लाईव्ह स्वरूपात पाहू शकतो. यानुसार आज या […]