राजकीय

भुसावळ यावल राजकीय

जि.प. सदस्या नंदाताई सपकाळे यांच्या संपर्क कार्यालयास प्रारंभ (व्हिडीओ)

भुसावळ प्रतिनिधी । जिल्हा परिषद सदस्या नंदाताई दिलीप सपकाळे यांच्या संपर्क कार्यालयाचे आज आमदार हरीभाऊ जावळे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. नंदाताई दिलीप सपकाळे यांनी अंजाळे या गावी आपले संपर्क कार्यालय सुरू केले आहे. आमदार हरीभाऊ जावळे यांनी याचे उदघाटन केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे विधानसभा विस्तारक हर्षल पाटील, जिल्हा सरचिटणीस उज्जैनसिंग राजपूत, सामाजिक कार्यकर्ते दिलीप सपकाळे, अंजाळे येथील सरपंच मनीषा कोळी, ग्रामपंचायत सदस्य प्रमीलाबाई सपकाळे, त्र्यंबक सपकाळे, योगेश साळुंके, शांताराम सपकाळे, सुनील सपकाळे, पंकज सपकाळे, शंकर कोळी, सागर सपकाळे, संजय सपकाळे, विशाल सपकाळे, अमोल सपकाळे, भैया मोरे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी आमदार हरीभाऊ जावळे म्हणाले की, आज अगदी अंजाळे […]

चाळीसगाव राजकीय

चाळीसगाव तालुक्यासाठी चार कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर

चाळीसगाव (प्रतिनिधी) मतदार संघातील गावांमध्ये मुलभूत सुविधेअंतर्गत विकासकामांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी आ. उन्मेशदादा पाटील यांनी ग्रामविकास मंत्री ना. सौ. पंकजा मुंडे यांच्याकडे पाच कोटी रुपयांची मागणी केली होती. आ. उन्मेश पाटील यांच्या निवेदनाची दखल घेत मंत्र्यांनी २५१५ मुलभूत सुविधा योजनेंतर्गत चाळीसगाव तालुक्यासाठी चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक निधी चाळीसगाव तालुक्याला मिळाला आहे.   या निधीतून पुढील प्रमाणे कामे करण्यात येणार आहेत १ – भामरे येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे (७ लक्ष) व रस्ता सुधारणा करणे (५ लक्ष) २ – टेकवाडे येथे रस्ता सुधारणा करणे (५ लक्ष) ३ – राजदेहरे […]

राजकीय

तुम्ही सध्या जामिनावर आहात, हे विसरु नका

मुख्यमंत्री फडणवीस यांची भुजबळांवर बोचरी टिका नांदेड । छगन भुजबळ हे स्वातंत्र्यलढ्यासाठी नव्हे तर भ्रष्टाचार केला म्हणून तुरुंगात गेला. अजून तुमची सुटका झालेली नाही. तुम्ही सध्या जामिनावर बाहेर आहात, किती बोलावं आणि काय बोलावं याचा जरा विचार करा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर पलटवार केला आहे. विरोधकांच्या आयोजित सभेत नागरीकांची गर्दी होत नाही म्हणून त्यांना सभेत नकलाकार आणावे लागतात, मी या नकलाकरांना इतकंच सांगण्याची इच्छा आहे की सुर्याकडे पाहून थुंकले की थुंकी आपल्याच चेहर्‍यावर पडते. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी भुजबळांना सुनावले आहे. नांदेड येथे भाजपाच्या बूथ प्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मेळाव्यात मुख्यमंत्री […]

राजकीय राष्ट्रीय

आम्ही अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या – मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ‘काही गोष्टी देशात होऊच शकत नाहीत असं काही वर्षांपूर्वी म्हटलं जायचं. मात्र, देशातील जनतेच्या पाठिंब्याने व सहकार्याने आम्ही अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. गेल्या साडेचार वर्षांतील आर्थिक सुधारणांनी देशाचं चित्र बदलून टाकलंय,’ असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केला. राजधानीत आयोजित ‘ईटी ग्लोबल बिझनेस समीट’ मध्ये देशानं गेल्या साडेचार वर्षांत केलेल्या आर्थिक प्रगतीचा आढावा पंतप्रधान मोदी यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. ‘२०१४ साली अनेक पातळ्यांवर व निकषांवर आपली अर्थव्यवस्था गर्तेत गेल्याचं चित्र होतं. मग ती महागाई असो, चालू खात्यातील तूट किंवा वित्तीय तूट. आर्थिक सुधारणा अशक्य आहेत असा एक समज झाला होता. […]

अमळनेर राजकीय

नंदगाव ते गांधली रस्ता नुतनीकरणासाठी १० लाखांचा निधी-जयश्री पाटील

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील नंदगाव ते गांधरी रस्ता नुतनीकरणासाठी दहा लाख तर मोरी मजबुतीकरणासाठी ८.४४ लाखांचा अतिरिक्त निधी मिळाला असल्याची माहिती जि.प. सदस्या सौ. जयश्री अनिल पाटील यांनी दिली आहे. याबाबतची माहिती अशी की, तालुक्यातील कळमसरे-जळोद जि प गटात जि.प.च्या ३०५४/२१३२ अंतर्गत नंदगाव ते गांधली रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी १० लक्ष १७ हजार ५७२ रु निधी मंजूर झाला आहे. यासोबत ५०५४/४१३ अंतर्गत नंदगाव येथे मोरी बांधकामासह डांबरीकरण व मजबुतीकरणासाठी ८ लक्ष ४४ हजर २३५ रु निधी मंजूर होऊन प्राप्त झाला असल्याची माहिती या गटाच्या जि. प. सदस्या सौ जयश्री अनिल पाटील यांनी दिली. नंदगाव गांधली रस्त्याची मोठी दुरावस्था झाल्याने या […]

जळगाव राजकीय

साहेबांचा आदेश, सर्वांनी कामाला लागा: गुलाबराव देवकर (व्हीडीओ)

जळगाव (प्रतिनिधी) साहेबांचा आदेश आहे,त्यामुळे आता सर्वाना कामाला लागावे लागेल, मी देखील उमेदवार म्हणून उद्यापासून मतदार संघाचा दौरा असून उद्या चाळीसगावात सभा घेणार असल्याचे आज जळगाव मतदार संघातील उमेदवार गुलाबराव देवकर यांनी सांगितले. ते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रावादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या आयोजित मेळाव्यात बोलत होते.   लोकसभ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रावादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा जिल्हा मेळावा आज दुपारी येथील जिल्हा कार्यालयात पार पडला. या मेळाव्याकडे सगळ्या राजकीय पक्ष व कार्यकर्त्यांचे लक्ष लागून होते. या मेळाव्यात रा.कॉ. चे जळगाव मतदार संघातील उमेदवार गुलाबराव देवकर यांनी कार्यकर्त्यांना प्रचार कार्याला लागण्याचे आवाहन केले. ते स्वत: उद्यापासून (दि.२३) जिल्ह्यात प्रचारदौरा करणार असून २ मार्चपर्यंत मतदार संघातील सगळ्या […]

राजकीय रावेर

शिवसैनिक मातोश्रीचा आदेश पाळणार की नाही ?- खा. खडसे

रावेर (प्रतिनिधी) आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना माझ्यासाठी प्रचाराचे काम करायचे आहे किंवा नाही, ते त्यांनी ठरवावे, हा त्यांच्या इच्छेचा भाग आहे. पण नुकतीच भाजपा सेनेची युती झाली असताना सेनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी मातोश्रीचा आदेशही डावलणार का ? असा प्रश्न खासदार रक्षा खडसे यांनी शिवसैनिकांना केला आहे. खडसे परिवारातील उमेदवार असल्यास आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही, असे शिवसेनेने नुकतेच भुसावळ येथे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. त्यानंतर राज्यात भाजप व शिवसेनेची युती करण्याचा निर्णय झाला आहे. आगामी निवडणुकांचे पडघम दोन्ही पक्षांचे नेते वाजवीत असताना भाजपच्या विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांनी मत व्यक्त केले आहे. शिवसेनेचे लोक सोबत आले तर त्यांना […]

राजकीय राज्य

फलटणमध्ये पवारांसामोरच रा.कॉ.तील गटबाजीला उधाण

फलटण (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच माढा मतदार संघात येणाऱ्या फलटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटबाजीला तोंड फुटले आहे. आज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे दौऱ्यावर आले असताना त्यांच्यासमोरच शेखर गोरे आणि कविता म्हेत्रे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. कविता म्हेत्रे यांना स्टेजवर स्थान देण्यावरून सुरू झालेल्या या वादामुळे कार्यक्रमात गोंधळ आणि घोषणाबाजी सुरू झाली. त्यामुळे पवार यांनाही आपले भाषण थांबवावे लागले. शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, आज ते या मतदारसंघात येणाऱ्या फलटण येथे आले होते. त्यावेळी जयकुमार गोरेंचे बंधू शेखर गोरे आणि कविता म्हेत्रे यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली. कविता म्हेत्रे यांना […]

अमळनेर राजकीय

मुडी-बोदर्डे येथे विविध विकास कामांचे लोकार्पण

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मुडी बोदर्डे येथे अत्याधुनिक ग्रामपंचायत इमारत, सभागृह व सरक्षण भिंत कामाचे लोकार्पण तसेच नविन रस्ता कॉंक्रीटीकरणाचे भूमिपूजन आ. शिरीष चौधरी व हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ. रविंद्र चौधरी यांच्या शुभहस्ते शुक्रवारी करण्यात आले. या कामांसाठी आ. चौधरी प्रयत्नशील होते. यावेळी उपस्थित विकासो व्हाईस चेअरमन बाळासाहेब सदांनशिव, जि.प.सदस्या संगिता भील, गटनेते प्रवीण पाठक, किरण गोसावी, नगरसेवक धनंजय महाजन, अबू महाजन, पंकज चौधरी, सुनील भामरे, राजेंद्र पाटील,रमेश पाटील, रामचंद्र पाटील, बोदर्डे सरपंच संतोष चौधरी, मुडी सरपंच काशिनाथ माळी, आनंदसिंग पाटील,पितांबर पाटील, मुगसिंग भील, शशांक सदांशीव, विलास भील, बापु मूलचंद भील, शामराव भील,चंद्रसेन पाटील, संजीव पाटील, तुषार सैदाने,नारायण पाटील, शांतीलाल […]

राजकीय राष्ट्रीय

नरेंद्र मोदी यांना ‘सेउल शांतता पुरस्कार’ प्रदान

सेऊल (वृत्तसंस्था) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळवणारे नरेंद्र मोदी हे जागातील 14 वे आणि भारतातले पहिले व्यक्ती ठरले आहेत. दरम्यान, पुरस्कार म्हणून मिळालेली रक्कम ‘नमामि गंगे’ प्रकल्पाला दान करणार असल्याचे मोदींनी जाहीर केले आहे. ”सियोल शांती पुरस्कार प्राप्त होणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मात्र या सन्मानाकडे मी केवळ वैयक्तिरित्या माझा माझा सन्मान म्हणून पाहत नाही तर भारतीय जनतेला कोरियाई जनतेने दिलेल्या सद्भावना आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून पाहतो,” अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार स्वीकारल्या नंतर दिली आहे. सेऊल शांतता पुरस्कारासाठी जगभरातुन एकूण 1300 नामांकने प्राप्त झाली होती. त्यानंतर पुरस्कार […]