राष्ट्रीय

राज्य राष्ट्रीय

एरो इंडियाच्या कार्यक्रमादरम्यान कार पार्किंगला भीषण आग

बंगळूरूतील घटना; अनेक चाकचाकी वाहने भस्म कोट्यावधी रूपयांचे नुकसान बंगळुरु । कर्नाटकातील बंगळुरु शहरातील एरो इंडियाच्या ‘शो’च्या कार्यक्रमासाठी आलेल्या प्रेक्षकांनी पार्किंग झोनमध्ये भीषण आग लागली असून या आगीत पार्किंगमध्ये उभी असलेली शेकडो वाहने जळून खाक झाल्याची घटना घडली. पार्किंगमधील गवताच्या पेंड्यांना आग लागून ती मोठ्या प्रमाणात पसरल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. याआधी 19 फेब्रुवारी रोजी एरो इंडिया शो दरम्यान दोन विमाने आपापसात धडकली होती. ते वृत्त ताजे असतांना ही दुसरी घटना घडली आहे. गवताच्या पेंड्यांना लागलेली आग संपूर्ण पार्किंग परिसरात पसरली. आगीमुळे हवेत धुराचे लोट पसरले आहेत. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या शेकडो गाड्या जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे. अग्निशमन दलाच्या […]

राजकीय राष्ट्रीय

आम्ही अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या – मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ‘काही गोष्टी देशात होऊच शकत नाहीत असं काही वर्षांपूर्वी म्हटलं जायचं. मात्र, देशातील जनतेच्या पाठिंब्याने व सहकार्याने आम्ही अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. गेल्या साडेचार वर्षांतील आर्थिक सुधारणांनी देशाचं चित्र बदलून टाकलंय,’ असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केला. राजधानीत आयोजित ‘ईटी ग्लोबल बिझनेस समीट’ मध्ये देशानं गेल्या साडेचार वर्षांत केलेल्या आर्थिक प्रगतीचा आढावा पंतप्रधान मोदी यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. ‘२०१४ साली अनेक पातळ्यांवर व निकषांवर आपली अर्थव्यवस्था गर्तेत गेल्याचं चित्र होतं. मग ती महागाई असो, चालू खात्यातील तूट किंवा वित्तीय तूट. आर्थिक सुधारणा अशक्य आहेत असा एक समज झाला होता. […]

राष्ट्रीय

भारत पाकविरोधात कठोर पावले उचलण्याच्या तयारीत: ट्रम्प

वॉशिंग्टन (वृत्तसेवा) ‘पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये आजवरची सर्वात तणावाची परिस्थिती आहे. हा तणाव कमी व्हावा यासाठी आम्ही दोन्ही देशांच्या संपर्कात आहोत. मात्र, भारत यावेळी काहीतरी मोठं पाऊल उचलण्याचा विचार करतोय,’ असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत – पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. भारताने पाकिस्तानची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु केले असून यामुळे धसका घेतलेल्या पाकिस्तानने थेट युद्धाची धमकीच दिली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भाष्य केले आहे. ट्रम्प म्हणाले, सध्या भारत – पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला असून परिस्थिती धोकादायक आहे. आम्ही दोन्ही देशांच्या संपर्कात आहोत. […]

राष्ट्रीय

फुटिरतावादी काश्मिरी नेता यासिन मलीक अटकेत

श्रीनगर वृत्तसंस्था । फुटिरतावादी नेता तथा जम्मू-काश्मिर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख यासिन मलीक याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुलवामा येथील हल्ल्याच्या पार्श्‍वभूमिवर, केंद्र सरकारने अलीकडेच यासीन मलीकसह अन्य फुटिरतावादी काश्मिरी नेत्यांची सुरक्षा काढून घेण्याचा महत्वाचा निर्णय घेतला होता. यामुळे या नेत्यांच्या गोटात घबराट पसरली आहे. यामुळे त्यांनी आम्हाला सुरक्षा नकोच हवी होती अशा उलट्या बोंबा ठोकल्या आहेत. यातच आता यासीन मलीकला काल रात्री ताब्यात घेण्यात आले आहे. यासिन मलीक याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सोमवारी सर्वोच्च न्यायालयात कलम ३५-अ बाबत महत्वाची चर्चा होणार आहे. या पार्श्‍वभूमिवर मलिकला अटक करण्यात आल्याचे मानले जात आहे.

राष्ट्रीय

पाकच्या पुन्हा उलट्या बोंबा

नवी दिल्ली वृत्तसंस्था । पुलवामा हल्ल्याप्रकरणी हात झटकून टाकत पाकने पुन्हा एकदा उलट्या बोंबा ठोकल्या असून या हल्ल्यासाठी भारतच जबाबदार असल्याचा दावा केला आहे. मेजर जनरल आसीफ गफूर यांनी आज पाकची भूमिका मांडतांना भारतावरच आरोप केले आहेत. ते पत्रकार परिषदेत म्हणाले की, पुलवामातील दहशतवादी हल्ल्यावरुन भारतानं आमच्यावर बेछूट आरोप केले. कोणत्याही पुराव्यांशिवाय आरोप केले गेले. त्या आरोपांची चौकशी आमच्याकडून पूर्ण करण्यात आली. त्यामुळेच आम्हाला उत्तर देण्यास उशीर झाला, असं स्पष्टीकरण पाकिस्तानी लष्करानं दिलं. पुलवामा हल्ल्यासाठी भारतच जबाबदार असल्याचा जावईशोध पाकिस्ताननं लावला. मपुलवामातील ज्या ठिकाणी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला, ते ठिकाण नियंत्रण रेषेपासून खूप दूर आहे. त्यामुळे पाकिस्तानातील एखादी व्यक्ती तिथंपर्यंत […]

राष्ट्रीय

भारतीय कारवाईच्या भीतीने पाकिस्तानची घाबरगुंडी

नवी दिल्ली (वृत्तसेवा) पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाईसाठी मोदींवर दबाव वाढत आहे. इस्रायल, अमेरिका, रशियासारख्या देशांनीही भारतावर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला असून, भारतानं निर्णायक कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे युद्धाची शक्यता लक्षात घेऊन आधीच पाकिस्तानची घाबरगुंडी उडाल्याचे दिसत आहे. त्याने आधीच बचावाची तयारी सुरू केली आहे. भारताने सीमेवर लष्कराच्या हालचाली सुरु करण्याआधीच पाकिस्ताननं सर्व लष्करी रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तान सरकारकडून लष्कराला कारवाईचे सर्व अधिकार देण्यात आले आहेत. पाकिस्तानी लष्कराने जिलानी रुग्णालयाला एक पत्र पाठवलं आहे. या पत्रात भारताशी युद्ध होण्याची शक्यता लक्षात घेता वैद्यकीय मदतीसाठी सर्व तयारी करण्यास […]

क्राईम राष्ट्रीय

उ.प्र.तून दोन संशयित दहशतवाद्यांना अटक

सहारनपुर (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकानं शुक्रवारी सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथून जैश ए मोहम्मदच्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली. देवबंद येथील एका वसतिगृहात ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. शाहनवाझ अहमद तेली आणि आकिब अशी या संशयित दहशतवाद्यांची नावे आहेत. शाहनवाझ जम्मू-काश्मीरच्या कुलगामचा आहे, तर आकिब हा पुलवामातील रहिवासी आहे. सूत्रांनुसार, ब्रेन वॉश करून ‘जैश’ या दहशतवादी संघटनेत भरती करता येतील, अशा तरुणांच्या शोधात हे दोघे उत्तर प्रदेशात आले होते. याआधीही ते अनेकदा देवबंद आणि राज्यातील इतर भागात आले होते. आकिब पहिल्यांदा जानेवारीत एटीएसच्या रडारवर आला होता. एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, या संशयितांच्या फोनमधून ‘जैश’ शी संबंधित […]

Uncategorized अर्थ राष्ट्रीय

देशातील १२ कोटी शेतकर्यांना रविवारी ‘किसान सन्मान निधी’ मिळणार

लखनऊ (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीपूर्वीच ‘किसान सन्मान निधी योजना’ शेतकऱ्यांसाठी गेमचेंजर ठरणार आहे. मोदी सरकार रविवारी या योजनेचा पहिला हफ्ता देणार आहे. गोरखपूर राष्ट्रीय किसान संमेलनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेद्र मोदी एका क्लिकवर देशातील १२ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २५ हजार कोटी रुपये जमा करणार आहेत. यंदाच्या वर्षात घोषित करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या योजनांपैकी ही एक आहे. या योजनेंवर ७५ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये तीन टप्प्यांत मिळणार आहेत. याचा पहिला हफ्ता पंतप्रधान रविवारी जारी करणार आहेत. ही रक्कम छोट्या शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. भाजपाचे खासदार आणि किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेंद्र सिंह यांनी […]

राजकीय राष्ट्रीय

नरेंद्र मोदी यांना ‘सेउल शांतता पुरस्कार’ प्रदान

सेऊल (वृत्तसंस्था) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळवणारे नरेंद्र मोदी हे जागातील 14 वे आणि भारतातले पहिले व्यक्ती ठरले आहेत. दरम्यान, पुरस्कार म्हणून मिळालेली रक्कम ‘नमामि गंगे’ प्रकल्पाला दान करणार असल्याचे मोदींनी जाहीर केले आहे. ”सियोल शांती पुरस्कार प्राप्त होणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मात्र या सन्मानाकडे मी केवळ वैयक्तिरित्या माझा माझा सन्मान म्हणून पाहत नाही तर भारतीय जनतेला कोरियाई जनतेने दिलेल्या सद्भावना आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून पाहतो,” अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार स्वीकारल्या नंतर दिली आहे. सेऊल शांतता पुरस्कारासाठी जगभरातुन एकूण 1300 नामांकने प्राप्त झाली होती. त्यानंतर पुरस्कार […]

अर्थ क्राईम राष्ट्रीय

चंदा कोचर यांना देश सोडून जाण्यास मनाई

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पदांचा गैरवापर करत मर्जीतील लोकांना आर्थिक फायदा दिल्याच्या आरोपाखाली चंदा कोचर यांच्यावर सीबीआयने 22 जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान,चंदा यांच्या विरोधात आता सीबीआयकडून लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली असून त्यांना देश सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आहे.   व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणात चंदा कोचर दोषी ठरल्या असून त्यांच्यावर बँकेच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आयसीआयसीआय बँकेच्या अंतर्गत चौकशी समितीने हा निष्कर्ष काढला आहे. चंदा कोचर या आयसीआयसीआय बँकेत सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर होत्या. धूत यांच्या व्हिडीओकॉन ग्रुपला 20 बँकांच्या ग्रुपनं कर्ज दिलं होतं. ज्यात आयसीआयसीआय बँकेचा वाटा 10 टक्के होता. मात्र धूत यांनी […]