क्रीडा

क्रीडा राज्य

भांडेपाटील परिवार पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन विक्रम करणार

पुणे (वृत्तसंस्था) देशातील टॉपचे गुप्तहेर सुर्यकांत भांडेपाटील हे आपल्या पत्नी व मुलासह पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेवून विक्रम करणार आहेत. महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण असोसिएटस मुंबई यांच्यातर्फे रविवार दि.२४ फेब्रुवारी रोजी सकाळी संकरॉक लाईट हाऊस ते गेट वे ऑफ इंडिया, अशी जलतरण स्पर्धा होणार आहे. पुणे येथिल बांधकाम व्यवसायीक तथा देशातील टॉपचे गुप्तहेर,वसुंधरासमूहाचे संचालक आणि प्रसिध्द जलतरणपटू सुर्यकांत भांडे पाटील (वय ५३) सोबत सातारा येथील जि.प.आदर्श शिक्षिका असलेल्या त्यांच्या पत्नी प्रतिभा भांडेपाटील (वय ५३) व सिव्हिल इंजिनियर असलेला त्यांचा मुलगा सौरभ (वय २६) असे तिघं जण जलतरण स्पर्धेत सहभागी होणार आहेत. अशा स्पर्धेमध्ये आई-वडील आणि मुलगा सहभागी होण्याचा हा देशातील पहिलाच […]

क्रीडा जळगाव

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात मॅरेथॉन स्पर्धा

जळगाव प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ब्रिगेडीयर अनंत नागेंद्र कमांडो रन मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या उपस्थितीत स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन.एस.आर्विकर, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. आर.बी.गुप्ता, फार्मोकोलॉजी डॉ. बापूराव बीटे, नाक-कान-घसा तज्ञ डॉ. विक्रांत वझे, डॉ. विठ्ठल शिंदे, आशिष भिरूड, नर्सिंग महाविद्यालयाचे प्रवीण कोल्हे, फिजिओथेरपीचे राहुल गिरी हे उपस्थित होते. एकूण पाच किलोमीटर अंतराच्या या मॅरेथॉन स्पर्धेत मुलांमध्ये संग्राम वाघ प्रथम, अनिरुध्द लहाडे द्वितीय, कृष्णा चव्हाण याने तृतीय क्रमांक मिळविला. मुलींमध्ये सिध्दी धिंग्रा प्रथम, रूपाली ढोले द्वित्तीय, श्रेया जाधव हिने तृतीय क्रमांक मिळविला. प्राध्यापक कर्मचारी गटात प्रमोद […]

अमळनेर क्रीडा शिक्षण

अमळनेर क्रीडा परिषदेच्या वतीने उत्कृष्ट खेळाडू व शिक्षकांना बक्षीस वितरण

अमळनेर (प्रतिनिधी) तालुका क्रीडा परिषदेच्यावतीने सन २०१८-१९ वर्षात आयोजित विविध स्पर्धेत प्राविण्य प्राप्त सांघिक व वैयक्तिक बक्षिस समांरभ नुकताच जी.एस.हायस्कुलमध्ये संपन्न झाला. यावेळी शिक्षकांना देखील सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक के. डी सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेर पं.स.चे शिक्षण विस्तार अधिकारी .पी.डी. धनगर,खा.शि.चे संचालक कल्याण पाटील,प्राचार्य रविद्र माळी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या तालुका अध्यक्ष अमोल माळी,खा.शि,मं,विश्वस्त वसुंधरा लाडगे,उपमुख्याध्यापक,आर सी मोरानकर,पर्यवेक्षक ए.आर.बडगुजर,माध्यमिक संघाचे प्रमुख संजय पाटील ,आंतरराष्ट्रीय खेळाडू व भारताचा कर्णधार विशाल फिरके(आटया पाटया),राष्ट्रीय खेळाडू अंकित वाघ,आयकेडीचे संचालक किरण माळी,समिती सचिव डी.डी.राजपुत,महेश माळी,एन.डी. विसपुते व तालुका क्रीडा प्रमुख एस. पी वाघ,कैलास पाटील व तालुक्यातील सर्व शिक्षक […]

क्रीडा

ख्रिस गेल वनडे क्रिकेटमधून संन्यास  घेणार

नवी दिल्ली (वृत्तसेवा) आगामी क्रिकेट वर्ल्ड कप झाल्यानंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेणार असल्याची घोषणा वेस्ट इंडीजचा तुफान फलंदाज ख्रिस गेलने केली आहे. वेस्ट इंडीजच्या क्रिकेटरने ट्वीट करून यासंदर्भातील माहिती जारी केली आहे.   येत्या मे ते जुलै पर्यंत इंग्लंड आणि वेल्स येथे वर्ल्ड कप रंगणार आहे. 1999 मध्ये डेब्यू करणारा ख्रिस गेल वेस्ट इंडीजकडून सर्वाधिक शतक लावणारा फलंदाज आहे. तो वेस्ट इंडीजचा ब्रायन लारानंतर सर्वाधिक धावा काढणारा क्रिकेटर आहे. गेलने आतापर्यंत 284 वनडे सामन्यांमध्ये एकूणच 9,727 धावा काढल्या आहेत. यामध्ये 23 शतक आणि 49 अर्धशतकांचा समावेश आहे. ब्रायन लाराच्या नावे वनडे सामन्यांत 10,405 धावांचे विक्रम आहे. 39 वर्षांच्या ख्रिस […]

क्रीडा जळगाव

शिवक्रीडा टेबल टेनिस स्पर्धेत 123 खेळाडूंचा सहभाग

जळगाव (प्रतिनिधी) सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन सानेगुरुजी वाचनालय जिल्हापेठ येथे करण्यात आलेले आहे. या स्पर्धेत एकूण 123 खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. यात १०/१२/१४ व १७ वयोगटातील मुले व मुलींच्या स्पर्धा होत आहेत. स्पर्धेचे औपचारिक उदघाटन फुटबॉलचा राष्ट्रीय खेळाडू धनंजय धनगर व मराठा सेवा संघाचे सुमित पाटील यांनी केले. त्यावेळी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रीडा समन्वयक फारूक शेख, शिवजयंती महोत्सव समितीचे माजी नगरसेवक अजय पाटील, संभाजी बिग्रेडचे अविनाश बाविस्कर उपस्थित होते. आज (गुरुवार) स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पुष्कर टाटीया, रिषभ जैन, महेश चौधरी, फरहान चित्रे, श्रुती केसकर, चिन्मय बाविस्कर, स्वरा साने, प्रेषित […]

क्रीडा जळगाव

बुद्धिबळ स्पर्धेत गुणवंत कासार, विवेक बडगुजर व भरत आमले अंतिम विजेते

जळगाव (प्रतिनिधी) सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन कांताई सभागृहात करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण ५५ खेळाडूंचा सहभाग होता. गुणवंत कासार विवेक बडगुजर व भरत आमले हे या स्पर्धेचे अंतिम विजेते ठरले. स्पर्धेचे औपचारिक उदघाटन जाणता राजाच्या उपप्राचार्य सुलभा पाटील व कॉर्डिनेटर रंजना महाजन यांनी प्रत्यक्ष पटावर चाल खेळून केले. त्यावेळी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार फारुक शेख, समितीचे भगतसिंग निकम, संजय सोनवणे, सुरेश पाटील मनपा क्रीडा अधिकारी विवेक आळवणी उपस्थित होते. या स्पर्धेत एकूण ७ फेऱ्या घेण्यात आल्या.तर स्पर्धेत खुला गट व ७,१०,१३वयो गटातील प्रत्येकी तीन विजेत्यांना बक्षीस देण्यात आली. […]

क्रीडा धरणगाव शिक्षण

धरणगाव महाविद्यालयातील तीन खेळाडूंची अश्वमेघ स्पर्धेसाठी निवड

धरणगाव (प्रतिनिधी) येथील तीन खेळाडूंची निवड मुंबई विद्यापीठात होणाऱ्या अश्वमेध स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. येथील महाविद्यालयातील हे तीनही खेळाडू बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघातून खेळणारे आहेत. कु. नेहा प्रकाश पाटील, रुचीका प्रकाश मराठे व संकेत तेजेंद्रसिंह चंदेल अशी या खेळांडूची नावे आहेत. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरुण कुळकर्णी, सचिव डॉ. मिलींद डहाळे यांच्या हस्ते या खेळाडूंचा नुकताच सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उद्योजक सुरेश चौधरी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख व माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील, प्राचार्य खोंडे, क्रीडाशिक्षक दिपक पाटील, ओस्तवाल आदी उपस्थीत होते. त्यांना सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

क्रीडा

भारताने तिसऱ्या सामन्यासह टी-२० मालिका गमावली

हॅमिल्तन (वृत्तसंस्था) न्यूझीलंडच्या भूमीवर ऐतिहासीक कामगिरी करण्याची सुवर्णसंधी भारतीय संघाने पुन्हा एकदा गमावली आहे. अखेरच्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडने भारतावर चार धावांनी मात करत तीन सामन्यांची मालिका 2-1 च्या फरकाने जिंकली आहे. न्यूझीलंडने दिलेल्या 213 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा संघ 208 धावांपर्यंतच मजल मारु शकला. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि मधल्या फळीत ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, दिनेश कार्तिक यांनी फटकेबाजी करत न्यूझीलंडला चांगली झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. न्यूझीलंडच्या मिचेल सँटरन आणि डॅरेल मिशेल यांनी प्रत्येकी 2-2 फलंदाजांना माघारी धाडलं. इतर गोलंदाजांनीही त्यांना चांगली साथ दिली. तिसऱ्या सामन्यात भारताने बाजी मारली असती तर हा […]

क्रीडा राष्ट्रीय

न्यूझीलंडकडून भारतीय महिला क्रिकेट संघ पुन्हा पराभूत

हॅमिल्टन (वृत्तसंस्था)  भारतीय महिला संघाला न्यूझीलंडमध्ये अखेरच्या टी-20 सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवामुळे भारतीय महिलांनी 3 टी-20 सामन्यांची मालिका 3-0 च्या फरकाने गमावली आहे. अंतिम सामन्यात न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले 162 धावांचे आव्हान भारतीय महिला पूर्ण करु शकल्या नाहीत. 20 षटकांमध्ये भारतीय संघ 4 विकेटच्या मोबदल्यात 159 धावांपर्यंतच मजल मारु शकला. अवघ्या दोन धावांनी सामन्यात बाजी मारत न्यूझीलंडच्या महिलांनी मालिकाही खिशात घातली आहे. स्मृती मंधानाने भारताकडून धडाकेबाज अर्धशतकी खेळी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून सोडले, पण आपली जबाबदारी पूर्ण करणे तिला शक्य झालं नाही. अखेरच्या सामन्यात संधी मिळालेल्या मिताली राजला एका चेंडूत 4 धावा काढून संघाला विजय मिळवून […]

क्रीडा राजकीय राष्ट्रीय

निवडणूक लढवण्यास सेहवागचा नकार

चंदीगड ( प्रतिनिधी ) माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग राजकारणाच्या मैदानात उतरणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. सेहवागने हरयाणाच्या रोहतक मतदारसंघातून निवडणूक लढवावी, यासाठी भाजपाच्या बैठकीत चर्चा झाली होती. भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने याबद्दल सेहवागशी संवाद साधण्याची आणि त्याला तिकिटाची ऑफर देण्याची जबाबदारी घेतली होती. परंतु निवडणूक लढवण्यास सेहवागचा नकार दिला असल्याची माहिती समोर येत आहे. रोहतकमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते दीपेंद्र सिंह हुड्डा यांचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व मोडून काढण्यासाठी सेहवागला तिकीट देण्यात येणार असल्याची चर्चा होती. यावर सेहवागने नुकतेच भाष्य केले आहे, मी राजकारणात येणार, ही निव्वळ अफवा असल्याचे सेहवागने म्हटले आहे. त्यात कोणतेही तथ्य नाही, असे […]