बोदवड

जामनेर बोदवड भुसावळ मुक्ताईनगर यावल राजकीय रावेर

खडसे एके खडसे !

जळगाव (प्रतिनिधी)  भाजपचे वर्चस्व असलेला रावेर लोकसभा मतदारसंघात २०१४ मध्ये तत्कालीन खासदार हरिभाऊ जावळे यांना डावलून एकनाथ खडसे यांनी आपली स्नुषा रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यास भाग पाडले होते. त्या निवडणुकीत स्वत: नाथाभाऊंनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आणि रक्षाताईंना ऐतिहासिक मताधिक्याने निवडून आणले होत. परंतु भाजपातील एक गट यावेळी रक्षाताईचे तिकीट कापले जाईल आणि हरिभाऊ जावळे यांना मिळेल अशा आवया उठवीत आहे. खरं म्हणजे हा मतदार संघ भाजप ऐवजी खडसे यांचा बालेकिल्ला म्हटला तरी चुकणार नाही. याला कारणही तसचं आहे. या मतदार संघात येणाऱ्या जामनेर वगळून प्रत्येक विधानसभा मतदार संघावर खडसेंची जबरदस्त पकड आहे. अगदी नगरध्यक्ष,नगरसेवक तसेच जिल्हा परिषद,पंचायत समितीमधील […]

बोदवड

बोदवड येथे शिवजयंती उत्सव समितीची स्थापना

बोदवड । येथे शिवजयंती उत्सव समिती घोषीत करण्यात आली असून यंदा विविध उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले आहे. येथील जिजाऊ बालोद्यान झालेल्या बैठकीत शिवजयंती उत्सव समिती जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी रामदास पाटील, उपाध्यक्षपदी भरत पाटील, सचिवपदी नईम खान, हर्षल बडगुजर, कार्याध्यक्षपदी कलिम शेख व सदस्य म्हणून कैलास चौधरी, देवेंद्र खेवलकर, आनंदा पाटील, अनुप हजारी, सुनील बोरसे, अमोल देशमुख, आबा माळी, संजय गंगतीरे, महेंद्र सुरडकर यांची निवड झाली. उत्सव समितीतर्फे १४ फेब्रुवारीला बाजार समितीच्या शेतकरी सभागृहात रक्तदान शिबिर, मोटारसायकल रॅली, पुरुषांना शिवसम्मान, तर महिलांचा जिजाऊ सन्मान पुरस्काराने गौरव होणार आहे.

बोदवड

बोदवडमध्ये तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

बोदवड प्रतिनिधी । अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शहरातून ६९ मीटर लांबीच्या तिरंग्याची पदयात्रा काढली. याला बोदवडकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी दीपक पाटील, प्रमोद कराड, नितीन झाल्टे, अरविंद चौधरी, अजय पाटील, प्रमोद सोनवणे, विशाल माळी यांनी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन केले. बोदवड महाविद्यालयापासून पदयात्रेला सुरुवात झाली. ही पदयात्रा गांधी चौकात आल्यावर जाहीर सभा झाली. येथे विशाल माळी यांनी प्रास्ताविक, तर अभाविपविषयी प्रमोद सोनवणे यांनी माहिती दिली. याप्रसंगी प्रमोद कराड यांनी देशभरात अनेक ठिकाणी तिरंगा पदयात्रा काढल्याचे सांगितले. सूत्रसंचालन दर्शना वर्मा, तर आभार स्वप्नील वंजारी यांनी मानले. या पदयात्रेत शहरवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले […]

बोदवड

जुनोने प्रकल्पस्थळी भाजपचा कार्यकर्ता मेळावा

बोदवड प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज जुनोने प्रकल्पाची पाहणी करून येथे कार्यकर्त्यांना मेळाव्यात मार्गदर्शन केले. बोदवड उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्यातील जुनोने धरणाचे काम सुरू आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज या कामाची पाहणी केली. यानंतर प्रकल्पस्थळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, या प्रकल्पासाठी ६५० कोटींचा निधी मिळाल्यामुळे २०२१ पर्यंत योजनेचे काम पूर्ण होईल. यामुळे बोदवड, मुक्ताईनगर, जामनेर, मोताळा आदी १०१ गावांमधील २२ हजार २२० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी डॉ.राजेंद्र फडके, नंदकिशोर महाजन, अशोक कांडेलकर, आर.ओ.वाघ, शुभांगी भोलाणे, गणेश पाटील, प्रिती पाटील, अनिल येवले, नजमा तडवी, निवृत्ती पाटील, वैशाली तायडे, […]