अमळनेर

अमळनेर सामाजिक

संत गाडगेबाबांचे कार्य बहुजन समाजाला प्रेरणादायी : दिलीप सोनवणे (व्हिडीओ)

अमळनेर (प्रतिनिधी) साधी राहणी ,आणि उच्च विचारसरणीचे संत गाडगेबाबा यांनी संपूर्ण समाजाला स्वच्छतेचा मंत्र दिला. संत गाडगे महाराजांना सामाजिक न्याय,आणि सुधारणा व स्वच्छता यामध्ये जास्त रुची होती. त्यांचे कार्य संपूर्ण बहुजन समाजाला प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी केले. ते अमळनेर येथे पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय व डेबुजी झिंगराजी जानोरकर ग्रंथालय व मोफत वाचनालय यांच्या वतीने संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून शासकीय प्रतिमा वाटप प्रसंगी अध्यक्षीय भाषणातून  बोलत होते.   व्यासपीठावर साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्यां उपाध्यक्षा प्राध्यापक डॉ माधुरी भांडारकर, चिटणीस प्रकाश वाघ ,विश्वस्त बापू नगावकर ,परीट समाजाचे अध्यक्ष […]

अमळनेर शिक्षण सामाजिक

स्वच्छतेचा मूलमंत्र देणारे संत गाडगेबाबा यांचे कार्य समाजाला दिशा देणारे : अनिल महाजन

अमळनेर (प्रतिनिधी) संत गाडगे महाराजांविषयी बहुजन समाजात कमालीचा आदर भाव आहे. त्यांनी महाराष्ट्रात केलेले लोकजागृतीचे कार्य मोलाचे व समाजाला दिशा देणारे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी केले. ते संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सर्वप्रथम संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी केले प्रतिमेला माल्यार्पण ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के यांनी केले. व्यासपीठावर शाळेचे ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के , शिक्षक आय आर महाजन, एस.के.महाजन,एच.ओ.माळी, लिपीक एन.जी.देशमुख होते. यावेळी श्री.महाजन पुढे म्हाणाले की, संत गाडगे महाराज यांनी दिलेला स्वच्छतेचा मूलमंत्र केलेली स्वच्छतेची जनजागृती त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात लोकांमध्ये स्वच्छतेचा संदेश देणारे एकमेव […]

अमळनेर क्राईम

झाडी येथील तरूणाचा खून; परिसरात खळबळ

अमळनेर प्रतिनिधी। तालुक्यातील मारवड पोलीस स्टेशन हद्दीतील झाडी येथील तरूणाचा खून झाल्याचे उघडकीस आल्याने खबळ उडाली आहे. अमळनेर तालुक्यातील झाडी गावापासून १ किमी अंतरावरील शेतात २४ वर्षीय अविवाहित युवकाचा खून झाला असल्याची घटना काल सायंकाळी उघडकीस आली आहे. झाडीचे पोलीस पाटील यांनी पोलिसांना या बाबत खबर दिल्यावरून मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील , पोलीस उपनिरीक्षक निलेश शेमळे, सहाय्यक फौजदार रोहिदास जाधव , भागवत पाटील, पोलीस नाईक सुनिल अगोने, दिनेश कुलकर्णी हे त्वरित झाडी गावांतील सुभाष गोविदा पाटील यांच्या शेतात घटनास्थळी दाखल झाले. संबंधीत शेतमालकाचा मुलगा सुनील सुभाष पाटील वय २४ राहणार झाडी ता अमळनेर याचा शेतात असलेल्या […]

अमळनेर राजकीय

नंदगाव ते गांधली रस्ता नुतनीकरणासाठी १० लाखांचा निधी-जयश्री पाटील

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील नंदगाव ते गांधरी रस्ता नुतनीकरणासाठी दहा लाख तर मोरी मजबुतीकरणासाठी ८.४४ लाखांचा अतिरिक्त निधी मिळाला असल्याची माहिती जि.प. सदस्या सौ. जयश्री अनिल पाटील यांनी दिली आहे. याबाबतची माहिती अशी की, तालुक्यातील कळमसरे-जळोद जि प गटात जि.प.च्या ३०५४/२१३२ अंतर्गत नंदगाव ते गांधली रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी १० लक्ष १७ हजार ५७२ रु निधी मंजूर झाला आहे. यासोबत ५०५४/४१३ अंतर्गत नंदगाव येथे मोरी बांधकामासह डांबरीकरण व मजबुतीकरणासाठी ८ लक्ष ४४ हजर २३५ रु निधी मंजूर होऊन प्राप्त झाला असल्याची माहिती या गटाच्या जि. प. सदस्या सौ जयश्री अनिल पाटील यांनी दिली. नंदगाव गांधली रस्त्याची मोठी दुरावस्था झाल्याने या […]

अमळनेर क्राईम

समाजकंटकांकडून आंदोलन मंडपाची जाळपोळ;अमळनेरात प्रचंड खळबळ

  अमळनेर (प्रतिनिधी) पाडळसरे धरण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी यांचे पाडळसरे धरणासाठीचे आंदोलन सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात जोर धरत आहे. याचदरम्यान काल (गुरुवार) मध्यरात्री अज्ञात समाजकंटकांनी काल रात्री पेट्रोल टाकून आंदोलन मंडप स्टेज व बॅनर, परदे जाळल्यामुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. तर सत्ताधारी गटाकडून आंदोलन मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा देखील श्री.चौधरी यांनी केला आहे. उपोषणस्थळी आतापर्यंत माजीमंत्री अरुण भाई गुजराती गुलाबराव देवकर, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार गुलाबराव पाटील व अनेक सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांनी धरणाच्या उपोषणाच्या ठिकाणी भेटी दिल्या आहेत. त्यामुळे सध्या उपोषण करणाऱ्यांना पाठिंबा व प्रतिसाद वाढत असताना हे उपोषण बंद व्हावे, यासाठी अडथळे आणण्याचा […]

अमळनेर राजकीय

मुडी-बोदर्डे येथे विविध विकास कामांचे लोकार्पण

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मुडी बोदर्डे येथे अत्याधुनिक ग्रामपंचायत इमारत, सभागृह व सरक्षण भिंत कामाचे लोकार्पण तसेच नविन रस्ता कॉंक्रीटीकरणाचे भूमिपूजन आ. शिरीष चौधरी व हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ. रविंद्र चौधरी यांच्या शुभहस्ते शुक्रवारी करण्यात आले. या कामांसाठी आ. चौधरी प्रयत्नशील होते. यावेळी उपस्थित विकासो व्हाईस चेअरमन बाळासाहेब सदांनशिव, जि.प.सदस्या संगिता भील, गटनेते प्रवीण पाठक, किरण गोसावी, नगरसेवक धनंजय महाजन, अबू महाजन, पंकज चौधरी, सुनील भामरे, राजेंद्र पाटील,रमेश पाटील, रामचंद्र पाटील, बोदर्डे सरपंच संतोष चौधरी, मुडी सरपंच काशिनाथ माळी, आनंदसिंग पाटील,पितांबर पाटील, मुगसिंग भील, शशांक सदांशीव, विलास भील, बापु मूलचंद भील, शामराव भील,चंद्रसेन पाटील, संजीव पाटील, तुषार सैदाने,नारायण पाटील, शांतीलाल […]

अमळनेर सामाजिक

पाडळसरे धरणासाठी लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन लढा दयावा: अरूणभाई गुजराथी

  अमळनेर (प्रतिनिधी) पाडळसे धरणाचे काम युद्धपातळीवर सुरू व्हावे या मागणीसाठी सुरू असलेले साखळी उपोषण आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील पाण्यासाठी होणारा संघर्ष आता देश,राज्य,जिल्हा व तालुका पातळीपर्यंत येऊन ठेपला आहे. चोपडा तालुक्यातही पाण्याचा प्रश्न गंभिर झाला असून पाण्याचे महत्व लक्षात घेऊन शासनाने तत्परतेने पाडळसे धरणाचे काम सुरू करावे,असे आवाहन आंदोलनास पाठिंबा देतांना त्यांनी केले. जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष संदिप भैय्या पाटिल यांनीही आंदोलनास काँग्रेस पक्षाचा पाठिंबा जाहीर केला.   राष्ट्रीय किसान मोर्चाचे राज्य प्रभारी शिवाजीराव पाटिल यांनी आंदोलनात सक्रिय होत आवाहन केले की,’देशातील शेतकऱ्यांचे प्रश्न कायम ठेवून त्यावर राजकारणाची पोळी शेकली जाते! आज पर्यंत […]

अमळनेर राजकीय

कपिलेश्वर देवस्थानसाठी दोन कोटी मंजूर – आ. चौधरी

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील निम येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कपिलेश्वर मंदिराच्या भक्तनिवास इमारतीसाठी दोन कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती आ. शिरीष चौधरी यांनी दिली आहे. या उल्लेखनीय विकास कामाबद्दल मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व राज्याचे पर्यटनमंत्री ना. जयकुमार रावल यांचे त्यांनी आभार व्यक्त केले आहेत. या कामामुळे भक्तांना मंदिरस्थळी निवासाची सोय उपलब्ध होणार आहे. तापी, पांझरा व अनेर नदीच्या त्रिवेणी संगमावर निसर्गरम्य वातावरणात कपिलेश्वर देवस्थान असून याठिकाणी हे भव्य व पुरातन हेमाडपंथी शिव मंदिर आहे, राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी शेकडो वर्षांपूर्वी याची निर्मिती केली असून हे देवस्थान जळगाव ,धुळे व नंदुरबार जिल्ह्यात सुपरिचित आहे. असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. महाशिवरात्रीला […]

अमळनेर राजकीय

शिवसेना-भाजपचे ‘वाघ’ अमळनेरात एकाच व्यासपीठावर (व्हीडीओ)

अमळनेर (प्रतिनिधी)  जंगलात जसे वाघ दिसणे मुश्कील असते तसे राजकारणातही दोन वाघ एका व्यासपीठावर येणे हा मोठा दुर्मिळ योग होता. हा योग गुरुवारी येथे जुळून आला. निमित्त होते शहरातील मा. बाळासाहेब ठाकरे चौक अनावरण सोहळ्याचे. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ एकाच व्यासपीठावर आले होते. या दोघांची एका व्यासपीठावर उपस्थिती अनेकांना उत्साह देणारी तर अनेकांना धडकी भरवणारी होती. गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेमुळे युतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र योग्यवेळी समझोता होऊन युती कायम राहिल्याने तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याप्रसंगी उदय वाघ म्हणाले की, शहरातील प्रभाग 15 मध्ये आतापर्यंत प्रताप शिंपी यांनी […]

अमळनेर सामाजिक

अमळनेर येथे संत गजानन महाराज मंदिरात वर्धापनदिन व प्रकटदिन कार्यक्रमांचे आयोजन

अमळनेर (प्रतिनिधी) येथील मुंदडानगर जवळील जी.एम.सोनार नगर येथे संत गजानन महाराजांच्या मंदिराचा तिसरा वर्धापन दिवस शनिवारी (२३ फेब्रुवारी) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मंदीरात गणपती, राम ,लक्ष्मण, सिता, विठ्ठल-रूखमीनी व संत गजानन महाराज यांच्या रेखीव मुर्ती आहेत. विद्यार्थ्यांच्या सहली सुद्धा या गजानन महाराज मंदिरामध्ये येत असतात. मंदिराच्या आजुबाजुचा परिसर अत्यंत स्वच्छ असून मंदिरात अशोक महाराज, नितीन भावे , रघुनाथ पाटील सेवा करीत असतात. या मंदिरामध्ये उत्तर महाराष्ट्रतून मोठ्या संख्येने भाविक असतात, त्यांना या जागृत देवस्थानाबद्दल अनेक अनुभव येत असतात. त्यामुळे अनेक भाविक कोणत्याही कार्यक्रमाला सढळ हाताने मदत करीत असतात. आतापर्यंत मंदीरासाठी बांधकामापासून अनेकांनी मदत केली आहे. मंदिरात वर्धापन दिनानिमित्ताने विविध […]