Browsing Category

पाचोरा

भाजपच्या ताब्यातील चार बाजार समित्यांवर प्रशासक

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील जामनेर, चाळीसगाव, पाचोरा व अमळनेर या भाजपच्या ताब्यात असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या बरखास्त करण्यात आल्या असून त्यांच्यावर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ए. टी. पाटील यांच्या कार्यलयात रक्तदान शिबिर

पारोळा प्रतिनिधी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपा वतीने सुरु असलेल्या"सेवा सप्ताहत" आज शहरातील माजी खासदार ए. टी. पाटील यांच्या कार्यलयात रक्तदान शिबिर घेण्यात आले.  त्यात 23 जणांनी रक्तदान केले.सुरवातीला…

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील सातगाव (डोंगरी) तांडा येथील जि.प.शाळेत सेवा सप्ताह अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्या, पेन आदी शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी जि.प.सदस्य मधुकर…

पारोळा येथे संविधान जागृती अभियाना अंतर्गत व्याख्यान

पारोळा प्रतिनिधी- भारतीय संविधानाला 70 वर्ष पुर्ण झाल्याने आज संविधान जागृती अभियाना अंतर्गत तालुका विधी सेवा समिती व वकील संघ आणि किसान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने 'भारतीय नागरिक या नात्याने आपली मूलभूत कर्तव्य' या विषयावर…

माहिजी रेल्वे स्टेशनजवळ अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळला

जळगाव प्रतिनिधी ।  पाचोरा तालुक्यातील माहिजी रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे रुळावर ४० वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. रेल्वे पोलीसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात ठेवला आहे.…

पाचोरा नगराध्यक्षांच्या दालनास हार घालून निषेध

पाचोरा प्रतिनिधी । शहरात अतिवृष्टीमुळे भुयारी मार्गात पाणी साचल्याने नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल जाब विचारण्यासाठी गेलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष उपस्थित नसल्याने त्यांच्या दालनालाच हार घालून आपला निषेध व्यक्त केला.

चोपडा तालुक्यातील बिडगावात बनावट दारु तयार करण्याआधीच कारखाना उद्धवस्त

जळगाव प्रतिनिधी । देशी-विदेशी बनावट दारु तयार करण्याआधीच राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारु निर्मितीचा कारखाना उध्वस्त केला आहे. ही कारवाई चोपडा तालुक्यातील बिडगाव शिवारात करण्यात आली असून एकाला अटक करण्यात आली आहे. तथापि,…

अतिवृष्टीमुळे हिवरा नदीला पूर; पाचोर्‍यातील पूर्व-पश्‍चीम संपर्क तुटला

पाचोरा प्रतिनिधी । अजिंठा डोंगर रांगांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हिवरा नदीला मोठा पूर आला असून यामुळे पाचोरा शहरातील पूर्व व पश्‍चीम भागाचा संपर्क अनेक तासांपर्यंत तुटला होता.

पाचोर्‍यातील जोशी कुटुंबाकडे राम मंदिरासह कोविडची आरास ( व्हिडीओ )

पाचोरा प्रतिनिधी येथील उदय जोशी यांनी आपल्या घरच्या गणेशोत्सवात अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमिपुजनासह कोविडवर करण्यात येणार्‍या उपचारांबाबत आरास केली असून आज खासदार उन्मेषदादा पाटील यांनी याला भेट देऊन जोशी कुटुंबाचे कौतुक केले.

वाळूचे ट्रॅक्टर चालू ठेवत तस्कराने ठोकली धुम; ड्रायव्हरच्या धाडसाने टळला अनर्थ !

पाचोरा प्रतिनिधी । अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर चालकाचा प्रांताधिकारी पाठलाग करत असतांना त्याने ट्रॅक्टर चालू ठेवून पळ काढल्याची घटना आज पाचोरा येथे घडली. प्रांताधिकार्‍यांच्या ड्रायव्हरने प्रसंगावधान राखून…

अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन घोड्यांचा मृत्यू

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा- भडगाव दरम्यानच्या रस्त्यावर भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेने तीन घोड्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. पाचोरा- भडगाव दरम्यानच्या रस्त्यावर ओम लक्ष्मी सिरॅमिकजवळ तीन लाल रंगाचे घोडे मृतावस्थेत आढळले. रात्रीच्या वेळी…

आमदार किशोर पाटील यांना देखील कोरोनाची लागण

पाचोरा प्रतिनिधी । आ. मंगेश चव्हाण यांच्या पाठोपाठ पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यांनी सोशल मीडियातून याबाबत माहिती दिली आहे.

त्र्यंबक विष्णू बडगुजर यांचे देहावसान

जळगाव प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील रहिवासी त्र्यंबक विष्णू बडगुजर (वय ८५) यांचे आज वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्र्यंबक विष्णू बडगुजर यांची प्रकृती गत काही…

पाचोऱ्यात कोरोनाचा संसर्ग वाढला; जिल्ह्यात ५४० बाधित रूग्ण आढळले

जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये एकाच दिवशी तब्बल ५४० आढळून आले आहेत. यात जिल्ह्यात पाचोरा, चाळीसगाव आणि जळगाव शहरात संसर्ग वाढला आहे. तर आजच ४५० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी जाहीर…

‘त्या’ पंचायत समिती सदस्याविरूध्द गुन्हा दाखल

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नांद्रा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राडा केल्या प्रकरणी पंचायत समिती सदस्य ललीत वाघ यांच्या विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

श्रीराम मंदिराचे भूमिपुजन दिपावली सारखे साजरे करा – अमोल शिंदे

पाचोरा प्रतिनिधी । श्री राम मंदिराचे भूमिपूजन हा ऐतिहासीक दिवस असून याला दीपोत्सव म्हणून साजरा करण्याचे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केले आहे.

नांद्रा आरोग्य केंद्रात राडा; वैद्यकीय अधिकार्‍यावर उगारली चप्पल ! ( Live Video )

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नांद्रा येथील आरोग्य केंद्रातील भोंगळ कारभारामुळे संतप्त झालेले पंचायत समिती सदस्य ललीत वाघ यांनी वैद्यकीय अधिकार्‍यावर चप्पल उगारल्याने खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यात आज ३४२ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह; जळगावसह पाचोऱ्यात संसर्ग वाढला

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या अहवालानुसार आज जिल्ह्यातील ३४२ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. आज आढळून आलेल्या अहवालात जळगाव शहरासह पाचोऱ्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. तर आजच २८० रूग्ण बरे झाले असून…

युट्युबवरील व्हिडीओ पाहून केली बुलेट चोरी !

पाचोरा प्रतिनिधी । युट्युबवर बुलेट गाडीचे हँडल लॉक तोडण्याची माहिती मिळवून या वाहनाची चोरी करणार्‍याला पोलिसांनी गजाआड केले आहे.
error: Content is protected !!