पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा येथील भारतीय जनता पार्टीचे विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांच्या संकल्पनेतून व शिंदे अकॅडमी यांच्या माध्यमातून मागील बऱ्याच वर्षापासून प्रत्येक गणेश उत्सव हा सामाजिक ऐक्य, प्रबोधन, कला, क्रीडा व संस्कृतीचे प्रदर्शन आणि सामाजिक मूल्यांची जोपासना करण्यासाठीच असतो. त्यांच्या माध्यमातून दरवर्षी नवनवीन कलाकृतीत श्रीगणेशाचे रूप बघावयास मिळत असते.अशा अनोख्या पद्धतीने श्री गणेश उत्सव साजरा करणाऱ्या शिंदे अकॅडमीच्या माध्यमातून ह्या वर्षी श्रीगणेश उत्सवानिमित्त स्वराज्य माझ्या शिवबांचे या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे .
७ सप्टेंबर पासून ते १७ सप्टेंबर पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पाचोरा-भडगाव तालुक्यातील विद्यार्थी, तरुण पिढी,अभ्यासक, शिवप्रेमी, महिला वर्ग व ज्येष्ठांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळांत ज्या शस्त्रांनी स्वराज्याचे रक्षण केले.शत्रूंना पळते केले.अश्या पवित्र शस्त्रांचे दर्शन व्हावे व मराठ्यांच्या ज्वाजल्या इतिहासाचे स्मरण व्हावे. या उद्देशाने या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे अमोल शिंदे यांनी सांगितले.
या शस्त्र प्रदर्शनामध्ये मराठा युद्ध कलेतील विविध (ओरिजल) शस्त्रे जसे ढाल, विविध तलवार व तलवारीचे प्रकार, भाला, छुऱ्या, कट्यार,वाघनखे, कुऱ्हाडी, दांडपट्टे, चिलखत, बिछवे, व इतर अनेक प्रकारचे दुर्मिळ शस्त्रास्रे या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेली आहेत. तरी १७ सप्टेंबर २०२४ पर्यंत आशीर्वाद हॉल, भडगाव रोड,पाचोरा येथे आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाला पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व शालेय विद्यार्थी,तरुण पिढी,शिवप्रेमी अभ्यासक, महिला वर्ग व ज्येष्ठांनी या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी असे विनम्र आवाहन अमोल शिंदे यांनी यावेळी केले आहे.