चाळीसगाव

चाळीसगाव राजकीय

चाळीसगाव तालुक्यासाठी चार कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर

चाळीसगाव (प्रतिनिधी) मतदार संघातील गावांमध्ये मुलभूत सुविधेअंतर्गत विकासकामांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी आ. उन्मेशदादा पाटील यांनी ग्रामविकास मंत्री ना. सौ. पंकजा मुंडे यांच्याकडे पाच कोटी रुपयांची मागणी केली होती. आ. उन्मेश पाटील यांच्या निवेदनाची दखल घेत मंत्र्यांनी २५१५ मुलभूत सुविधा योजनेंतर्गत चाळीसगाव तालुक्यासाठी चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक निधी चाळीसगाव तालुक्याला मिळाला आहे.   या निधीतून पुढील प्रमाणे कामे करण्यात येणार आहेत १ – भामरे येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे (७ लक्ष) व रस्ता सुधारणा करणे (५ लक्ष) २ – टेकवाडे येथे रस्ता सुधारणा करणे (५ लक्ष) ३ – राजदेहरे […]

अमळनेर एरंडोल चाळीसगाव जळगाव राजकीय

जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची पुरती गोची !

जळगाव प्रतिनिधी । आज युतीवर शिक्कामोर्तब झाल्यामुळे जळगाव लोकसभा मतदार संघात दंड थोपटून भाजप समोर उभे असलेल्या शिवसेनेची पुरती गोची झालीय. विशेष करून आर.ओ. पाटील यांच्या राजकीय पुनर्वसाचा प्रश्‍न अधांतरी लटकणार असून जाहीरपणे पंतप्रधान मोदी यांची मिमिक्री करून खिल्ली उडविणारे ना. गुलाबराव पाटील यांना आता मोदींना पंतप्रधान करण्यासाठीच मतं मागावी लागणार आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघात प्रखर भाजप विरोधावर राजकीय आगेकूच करणार्‍या शिवसेनेच्या मातब्बर नेत्यांची युतीमुळे अडचण होणार असल्याचे आता स्पष्टपणे दिसून येत आहे. आर.ओ. तात्यांचे राजकीय पुनर्वसन अधांतरी युतीबाबतच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, युती झाल्यामुळे जळगाव लोकसभा मतदार संघात पूर्ण जोशाने तयारी करणार्‍या शिवसेनेची पुरती गोची झाली आहे. […]

चाळीसगाव सामाजिक

चाळीसगावकरांच्या मागणीला न्याय देण्याचा प्रयत्न- आ. उन्मेष पाटील (व्हिडीओ)

चाळीसगावात २० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन चाळीसगाव प्रतिनिधी । गेल्या अनेक वर्षापासून चाळीसगावकरांच्या मागणीला न्याय देण्याचा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याच्या माध्यमातून करण्यात येत असून या कामाचे भूमिपुजन येत्या २० फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती आ. उन्मेष पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी आमदार उन्मेष पाटील म्हणाले की, या समारंभाचे आयोजन युवराज छत्रपती संभाजी राजे भोसले कोल्हापूर यांच्या हस्ते करण्यात आले असून या पुतळ्यामुळे चाळीसगाव शहराच्या सौंदर्यात अधिक भर पडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्‍वारूढ पुतळा साठी गेल्या अनेक वर्षापासून शहरातील विविध संघटना संस्था यांच्यामार्फत आंदोलने व मागणी केली जात होती तर संभाजी […]

चाळीसगाव शिक्षण

ग्रेस अकॅडमीच्या विश्‍वास बारीस यांनी बुडविला लाखोंचा कर

ट्रस्टी संजय बारिस यांचा आरोप चाळीसगाव प्रतिनिधी । येथील हिरापूर रोड स्थित ग्रेस अकॅडमी इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक विश्‍वास बारीस यांनी शासनाचा लाखो रूपयांचा कर बुडविल्याचा आरोप ट्रस्टी संजय बारीश यांनी केला आहे. याबाबत वृत्त असे की, ग्रेस अकॅडमीतील शालेय आर्थिक व्यवहारात अनेक गैरव्यवहार करून अनियमितता ठेवल्याने तसेच संस्थेचे फिच्या स्वरूपातून आणि इतर मार्गाने येणारे उत्पन्न रीतसर बँकेच्या खात्यात न जमा केल्याने हा संपूर्ण व्यवहार ऑडिटर व शासकीय कर विषयक खात्यापासून लपून राहिल्याने याद्वारे विश्‍वास बारिस यांनी शासनाचा लाखो रुपयांचा कर बुडविला असल्याचे संजय बारीस यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे. त्याच प्रमाणे अल्पसंख्यांक घटकांसाठी असलेल्या या शाळे द्वारे अल्पसंख्यांकांसाठी सामाजिक […]

चाळीसगाव सामाजिक

चाळीसगावात व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

चाळीसगाव (प्रतिनिधी) पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या हत्येच्या निषेधार्थ येथील व्यापारी बांधवांनी आज स्वयंस्फूर्तीने आपले व्यवसाय बंद ठेवून निषेध नोंदवला. व्यापारी बांधवांनी सगळ्यांना या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आव्हान केले. तसेच जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध केला व शहीद जवानांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी व्यापारी असोशियनचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, माजी आमदार राजूदादा देशमुख, नगरसेवक रामचंद्र जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शशिकांत साळुंखे, श्रीकांत राजपूत, स्वप्निल कोतकर, अविनाश पाटील, राजेंद्र रामदास चौधरी, महिंद्र जैन, पंचमचे संभा जाधव, श्याम देशमुख, संभाजी सेनेचे अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ, मुस्लिम समाजाचे मुराद पटेल, अरविंद पाटील आदी कार्यकर्ते तसेच व्यापारी उपस्थित […]

चाळीसगाव सामाजिक

चाळीसगावात शहिदांना श्रद्धांजली

चाळीसगाव (प्रतिनिधी) पूलवामा येथे झालेल्या अतिरेकी हल्यात शहीद झालेल्या जवानांना शुक्रवारी श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य मिलींद बिल्दीकर यांनी अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्याचा तीव्र निषेध केला.   आज शहीद जवानांच्या कुटुंबियांवरच नव्हे तर संपूर्ण भारतावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हा हल्ला प्रत्येक नागरिकाच्या मनाला इजा पोहचवणारा असून सबधीत दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

चाळीसगाव सामाजिक

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा चाळीसगाव शिवसेनेतर्फे जाहीर निषेध

चाळीसगाव (प्रतिनिधी) पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा जवळ लोटू मोड येथे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केंद्रीय राखीव दलाच्या सीआरपीएफ ताफ्यावरवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा चाळीसगाव शिवसेनेतर्फे आज जाहीर निषेध करण्यात आला. पाकिस्तानच्या छुप्या पाठिंब्याने सुरू असलेल्या या भ्याड हल्ल्याचा चाळीसगाव शिवसेनेतर्फे तीव्र निषेध करण्यात आला असून तहसीलदार कैलास देवरे यांना एक निवेदन देण्यात आले आहे. या हल्ल्याचे केंद्रीय सरकारने ताबडतोब जशास तसे उत्तर देऊन बदला घ्यावा, अशा तीव्र भावनाही यावेळी शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आल्या. या निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, शहर प्रमुख नाना कुमावत, उमेश दादा गुंजाळ, बाजार समिती उपसभापती महेंद्र पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख भिमराव खलाणे, तालुका प्रवक्ता […]

चाळीसगाव सामाजिक

दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ चाळीसगावात निदर्शने; पुतळा जाळला (व्हीडीओ)

चाळीसगाव (प्रतिनिधी) जम्मू काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज शहरात विविध सामाजिक संघटनांनी तीव्र निषेध नोंदवत ‘जैश-ए-मोहम्मद’संघटनेचा प्रतीकात्मक पुतळा जाळला. जम्मू-काश्मीरमधील पुलगाव क्षेत्रात भारतीय जवानांच्या वाहनावर पाकिस्तानी हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात ४२ जवान शहीद झाले असून अनेक जवान जखमी झाले आहेत. या घटनेचा संपूर्ण देशभर तीव्र निषेध होत असताना चाळीसगावातील अनेक सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन पाकिस्तानच्या या भ्याड कृत्याचा जाहीर निषेध केला आहे. या हल्ल्याची जबाबदारी घेतलेल्या ‘जैश ए मोहम्‍मद’ या संघटनेचा प्रतिकात्मक पुतळ्याचे आज दहन करण्यात आले. तसेच नागरिकांनी निषेधाच्या घोषणा देखील दिल्यात. यावेळी संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे, खुशाल पाटील, रयत सेनेचे गणेश पवार, […]

चाळीसगाव सामाजिक

प्रणाली जाधव हत्याप्रकरणी सीआयडी चौकशी करण्याची मागणी

चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील शिंपी समाजाने आज (दि.१४) तहसील कार्यालयावर एका मोर्चाद्वारे निवेदन सादर केले असून या निवेदनात उंडणगाव तालुका सिल्लोड येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी प्रणाली कृष्णा जाधव हिने लिपिक संजय घोगरे याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचा आरोप केला आहे. यासंबंधी अजिंठा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणात निष्पाप प्रणाली हिला आपला प्राण गमवावा लागला असल्याने तिच्या मृत्यूच्या कारणीभूत असलेल्या संजय घोगरे या आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी व सदर घटनेचा तपास सीआयडीमार्फत करण्यात यावा, या खटल्यात वरिष्ठ सरकारी वकील ॲड. उज्वल निकम यांची नेमणूक व्हावी, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या दामिनी पथकाची काम गतिमान करण्यात यावे, अशा मागण्या […]

चाळीसगाव शिक्षण

चाळीसगावच्या ग्रेस अकॅडमीतील मुख्याध्यापक अनधिकृत

विश्‍वस्त संजय बारीश यांचा आरोप चाळीसगाव दिलीप घोरपडे । चाळीसगाव येथील हिरापूर रोड सबस्टेशन भागात असलेल्या ग्रेस अकॅडमी इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापक पदावर गेल्या दहा ते बारा वर्षांपासून अनाधिकृतपणे बाबा बारिश हे कुठलीही मान्यता नसताना काम पाहत असल्याचा आरोप या संस्थेचे ट्रस्टी संजय बारीश यांनी केला आहे. या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधीत संस्थेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार होत असून अनेक वर्षापासून या संस्थेचे कुठलेही ऑडिट केले जात नसून ऑडिटरला योग्य ते कागदपत्र पुरविले जात नसल्याने ऑडिटर मागणी करूनही ही कागदपत्रे जाणीवपूर्वक पुरवली जात नाहीत. याबाबत आपण वेळोवेळी शिक्षण विभागात तक्रारी केल्या असून नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक रामचंद जाधव […]