चाळीसगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार आणि खासदार असताना सतत प्रयत्नशिल होतो. आजही समाजातील प्रत्येक व्यक्तींशी संपर्कात राहून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तत्पर आहे. समाजाने विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे यासाठी माझी धडपड सुरू असून समाजाने मला दिलेले प्रेम आशिर्वाद याचे भान सदैव राहील अशी भावना शिवसेना नेते माजी खा. उन्मेशदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.
चाळीसगाव तालुक्यातील येथे भाजपच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी माजी खासदार उन्मेशदादा पाटील बोलत होते. सुरुवातीला संत सेवालाल महाराज, श्री संत बाळूमामा व हरितक्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जेष्ठ नेते ऍड. राजेंद्र सोनवणे,पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील, बेलगंगा संचालक बाळासाहेब पाटील, पंचायत समितीचे सदस्य रविंद्र चौधरी,ओबीसी सेना जिल्हाप्रमुख संजय चौधरी, सामाजिक कार्यकर्ते नरेनकाका जैन,भटक्या सेना जिल्हा प्रमूख मारोती काळे,तालुका प्रमुख अनिल चव्हाण, सोशल मीडिया प्रमुख गणेश महाजन,व्यापारी सेनेचे अमित सुराणा, पिनूबाबा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी युवा कार्यकर्ते गणेश राठोड यांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले माजी खासदार उन्मेशदादा यांनी सतत समाजातील माता भगिनी जेष्ठ श्रेष्ठ यांना आपुलकीचे प्रेम दिले आहे. शेतकऱ्यांची चिंता व्यक्त करणारा एक संवेदनशील युवा नेता म्हणून बंजारा समाज त्यांच्यावर प्रेम करतो आज उन्मेशदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे भावना व्यक्त केली. याप्रसंगी पांझण डावा कालवा समिती अध्यक्ष ऍड. राजेंद्र सोनवणे, रामेश्वर हजारी यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी गणेश राठोड,भाईदास चव्हाण, मकरंद चव्हाण, किसन चव्हाण, भाऊसाहेब राठोड, राकेश राठोड, गोपाल राठोड, सुखदेव राठोड, विजय भाऊ राठोड, गोरखनाथ राठोड, संदीप राठोड, लक्ष्मण राठोड, खुशाल धनगर, रंजीत राठोड, अमोल राठोड, यशवंत राठोड, सोनू राठोड, भगवान राठोड,रामेश्वर राठोड, विठ्ठल शिंदे, रावसाहेब तांबे, सुपडू अहिरे, चिमा कोळी, खुशाल तांबे, समाधान चव्हाण, पंडित राठोड, ईश्वर चव्हाण, बाबू राठोड, सुधाकर राठोड, निलेश चव्हाण, हिरामण चव्हाण, हनुमान पवार,प्रकाश
**