चोपडा

चोपडा

चोपडा येथील डॉ.राहुल पाटील यांना राज्यस्तरीय रक्तमित्र पुरस्कार

चोपडा (प्रतिनिधी) । डॉ. राहूल पाटील यांना पुण्यातील स्व.रोहिणी जाधव स्मारक ट्रस्टचा रक्तमित्र 2018-19चा राज्यस्तरीय पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रामचंद्र देखणी यांच्याहस्ते देण्यात आला. स्वर्गीय रोहिणी जाधव स्मारक ट्रस्ट मागील 23 वर्षापासून रक्तदान क्षेत्रात रक्तदान क्षेत्रातील रक्तमित्र व रक्तदाता पुरस्कार तसेच एड्स जनजागृती पुरस्कार व निसर्ग पर्यावरण मित्र पुरस्कार असे एकूण चार पुरस्कारांचे सातत्याने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवी तसेच सामाजिक संघटना किंवा संस्था याची या पुरस्काराची निवड करत असते. डॉ. राहूल पाटील अध्यक्ष, पदाधिकारी व सहकारी यशोधन चारीटेबल ट्रस्ट यांनी ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक अध्यात्मिक पर्यावरण आरोग्य तसेच विशेष रक्तदान क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या […]

चोपडा जळगाव राजकीय

देशातील कोणत्याही गरीब व्यक्तीला मुलभूत गरजांसाठी कोणावरही विसंबून राहण्याची गरज नाही : अ‍ॅड. संदिपभैय्या पाटील

जळगाव (प्रतिनिधी) छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यानंतर कर्जमाफीबाबत राहुल गांधी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार तीनही राज्यात सरकार आल्याच्या अवघ्या 48 तासांच्याआत शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यात आली असल्याची माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदिपभैय्या पाटील यांनी पत्रपरिषदेत दिली. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, महानगराध्यक्ष जळगाव जिल्हा डॉ. राधेश्याम चौधरी, डी.जी. पाटील, माजी महानगराध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे, अ‍ॅड. अविनाश भालेराव, राजस कोतवाल आदी उपस्थित होते. काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर संपूर्ण देशात गरिबांसाठी किमान उत्पन्न योजना राबविण्याची घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली असून या घोषणेची अंमलबजावणी सुरू झाल्यावर देशातील एकाही गरीब व्यक्तीला आपल्या मुलभूत गरजांसाठी कोणावरही विसंबून राहण्याची […]

Cities चोपडा सामाजिक

गांधी रिसर्च फाउंडेशनच्या पदयात्रेस आरंभ

चोपडा प्रतिनिधी । गांधी रिसर्च फाऊंडेशन जळगावच्यावतीने महात्मा गांधींजीच्या ७० व्या पुण्यतिथी निमित्त बा-बापू१५० कार्यक्रमांतर्गत पदयात्रेची सुरुवात चोपडा शहरातून महात्मा गांधीजींचे चौकातून झाली. अमेरिकेतील ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ मार्क लींडले, जिल्ह्याचे वनसंरक्षक अधिकारी मोराणकर यांच्या हस्ते पदयात्रेला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी शहरातील पोलीस दलातील अधिकारी वर्गही उपस्थित होते. चोपडा तालुक्यातील आदिवासी भागात ही पदयात्रा ६ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण होईल. यामध्ये ग्रामविकासाच्या निर्धारासह राष्ट्रीय एकात्मतेचा जागर केला जाणार आहे. तरुणाईला लाजवेल अशा उत्साहात वयाच्या ८८ व्या वर्षी मार्क लिंडले यात्रेत पहिल्या पाडावा पर्यंत जोमाने सहभागी झाले हे विशेष. बा-बापू १५० जयंती वर्षाच्या औचित्याने संपूर्ण स्वच्छता, ग्रामीण आरोग्य, मूल्यशिक्षण संवर्धन, जलव्यवस्थापन, शेतीपूरक उद्योग […]

क्राईम चोपडा

देशी पिस्तुलासह चोरट्यास अटक

चोपडा प्रतिनिधी । स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने एका चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून पाच मोटारसायकलींसह देशी पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, तरुण चोरीची मोटारसायकल वापरत असल्याची आणि त्याच्या ताब्यात एक बनावट पिस्टल असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे बी. जी. रोहम यांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र बागुल, नाईक सुरज पाटील, दादाभाऊ पाटील, योगेश वराडे, दीपक पाटील, प्रवीण हिवराळे आदींच्या पथकाने तपास सुरू केला. यानंतर राहुल सुरेश कोळी (वय २३, रा वरवाडा, ता. शिरपूर) या तरुणाला काळ्या रंगाच्या फॅशन प्लस गाडीवर पकडले. त्याची पोलिसांनी झाडाझडती घेतली असता त्याच्या कंबरेला एक देशी […]

चोपडा राजकीय

चोपडा शिवसेनेतील वाद चिघळला; आता माजी आमदारांवर आरोप

चोपडा प्रतिनिधी । येथील शिवसेनेतील वाद चिघळला असून आता आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या समर्थकांनी माजी आमदार कैलास पाटील हे गद्दार असल्याचा आरोप केला आहे. यांनी घेतली पत्रकार परिषद बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात माजी आमदार कैलास पाटील यांनी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याला दुसर्‍याच दिवशी आमदार समर्थकांनी उत्तर दिले. पंचायत समितीचे सदस्य भरत बाविस्कर व शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत कैलास पाटील यांच्यावर आरोपांची सरबत्ती केली. याप्रसंगी चोसाकाचे माजी संचालक अ‍ॅड. एस. डी. सोनवणे, जि.प. सदस्य हरीश पाटील, महिला आघाडीच्या रोहिणी पाटील, प्रा. शरद पाटील, गटनेते महेश पवार, किशोर चौधरी, शहरप्रमुख आबा देशमुख, नरेश […]

Cities चोपडा राजकीय

चोपड्यात शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर

चोपडा प्रतिनिधी । येथील शिवसेनेतील गटबाजी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमातून उघड झाली आहे. चोपडा शिवसेनेमध्ये माजी आमदार कैलास पाटील आणि विद्यमान आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्यात अनेक महिन्यांपासून वाद सुरू असल्याची चर्चा होती. यावर बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिक्कामोर्तब झाले आहे. शिवसेनेतर्फे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी सकाळी बाजार समितीच्या सभागृहात कार्यक्रम झाला. या वेळी बोलतांना कैलास पाटील यांनी विद्यमान आमदारांवर जोरदार टीका केली. आम्ही रात्रंदिवस फिरुन आमदार चंद्रकांत सोनवणे यांना निवडून आणले. मात्र, आपल्याशी गद्दारी झाली. आगामी निवडणुकीत अनेक उमेदवार आपल्याकडे आहेत. त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून उमेदवारी मिळवून देऊ असा दावादेखील त्यांनी केला. कैलास पाटील […]

चोपडा सामाजिक

बारी समाज महासंमेलनाबाबत सहविचार सभा

चोपडा प्रतिनिधी । जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या बारी समाज महासंमेलनाच्या आयोजनाबाबत आज येथे सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. फेब्रूवारीमध्ये जळगाव येथे अखिल भारतीय बरई-तांबोळी-चौरसिया-कुमरावत-बारी महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या महासंमेलनाच्या आयोजनाबाबत येथील बारीवाड्यात सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष रामदास बोडखे यांची प्रमुख उपस्थिती होती. ते म्हणाले की, समाजाच्या आर्थिक, राजकीय व सामाजिक विकासासाठी या महासंमेलनातून प्रयत्न केले जातील. सामाजिक एकजुट उभी केली जाउन समाजाची ताकद वाढवणे हा उद्देश्य आहे. यासाठी सर्व समाज बंधु-भगिनींची साथ आवश्यक असल्याते प्रतिपादन त्यांनी केले. तर कार्याध्यक्ष मनोज बारी यांनी संमेलनामागील भूमिका विषद करतांना देशभर विखुरलेल्या समाजातील बांधवांचा […]