भुसावळ

भुसावळ यावल राजकीय

जि.प. सदस्या नंदाताई सपकाळे यांच्या संपर्क कार्यालयास प्रारंभ (व्हिडीओ)

भुसावळ प्रतिनिधी । जिल्हा परिषद सदस्या नंदाताई दिलीप सपकाळे यांच्या संपर्क कार्यालयाचे आज आमदार हरीभाऊ जावळे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. नंदाताई दिलीप सपकाळे यांनी अंजाळे या गावी आपले संपर्क कार्यालय सुरू केले आहे. आमदार हरीभाऊ जावळे यांनी याचे उदघाटन केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे विधानसभा विस्तारक हर्षल पाटील, जिल्हा सरचिटणीस उज्जैनसिंग राजपूत, सामाजिक कार्यकर्ते दिलीप सपकाळे, अंजाळे येथील सरपंच मनीषा कोळी, ग्रामपंचायत सदस्य प्रमीलाबाई सपकाळे, त्र्यंबक सपकाळे, योगेश साळुंके, शांताराम सपकाळे, सुनील सपकाळे, पंकज सपकाळे, शंकर कोळी, सागर सपकाळे, संजय सपकाळे, विशाल सपकाळे, अमोल सपकाळे, भैया मोरे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी आमदार हरीभाऊ जावळे म्हणाले की, आज अगदी अंजाळे […]

जळगाव भुसावळ राजकीय

मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यात भाजपमधील गटबाजीचे जाहीर प्रदर्शन

जळगाव प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरणगाव व जळगाव येथील दौर्‍यात गुळमुळीत पवित्रा घेत काही लोकप्रिय घोेषणा निश्‍चितच केल्या. मात्र पक्षातील गटबाजीला थांबविण्यात तेदेखील अपयशी ठरले. या अंतर्गत कलहाचा पक्षाच्या आगामी वाटचालीवर नक्कीच परिणाम होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल धरणगाव व भुसावळ येथे सभा घेतल्या. यात धरणगाव येथे त्यांनी जनजाती संमेलनास संबोधित करून क्रांतीवीर खाजाजी नाईक यांच्या स्मृती आराखड्यासाठी निधीची घोषणा केली. तर भुसावळातील सभेत बेघरांना घरे देण्याची घोषणा करत खासदार रक्षा खडसे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. मात्र या दोन्ही सभांमधील विसंगती लक्षात घेण्याची गरज आहे. खरं तर शेतकर्‍यांच्या लाँच मार्चमुळे ना. गिरीश महाजन हे दोन्ही कार्यक्रमांना […]

भुसावळ सामाजिक

बारसे दाम्पत्याचे मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन

भुसावळ प्रतिनिधी । मेहतर वाल्मीकी व सुदर्शन समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन संतोष बारसे आणि नगरसेविका सोनी बारसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केले. मेहतर वाल्मिकी व सुदर्शन समाजाचा राज्यव्यापी मेळावा गुरुवारी शहरातील टी.व्ही.टॉवर मैदानावर आयोजित करण्यात आला होता. मात्र तांत्रिक कारण्यांमुळे हा कार्यक्रम न झाल्यामुळे नगरसेविका सोनी बारसे व माजी नगरसेवक संतोष बारसे यांनी मेहतर वाल्मिकी समाजाच्या समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर निवेदन दिले. यामध्ये विविध मागण्यात करण्यात आल्या आहेत. यात वाल्मिकी मेहतर समाज हा उपेक्षित घटक असून समाजाच्या प्रतिनिधीला सत्तेत सहभागी करून घ्यावे, सफाई कर्मचार्‍यांची रिक्त पदे भरावीत, वारसा नोकरी देताना शैक्षणिक पात्रता पाहून पदे द्यावीत, गटारी, […]

भुसावळ राजकीय

आमदार संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन

भुसावळ प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आमदार संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात विविध विकासकामांचे रिमोटद्वारे भूमिपुजन करण्यात आले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन केले. याप्रसंगी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. सुभाष भामरे, माजी महसूलमंत्री आ. एकनाथराव खडसे, आमदार राजूमामा भोळे आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार सावकारे यांचे हे कार्यालय जामनेर रोडवर आहे.

भुसावळ राजकीय

खासदार रक्षाताई यांचे काम पथदर्शी- मुख्यमंत्री (व्हिडीओ)

भुसावळ प्रतिनिधी । खासदार रक्षाताई खडसे या फक्त तरूणच नव्हे तर कार्यक्षम खासदार असून त्यांचे काम हे अन्य लोकप्रतिनिधींसाठी पथदर्शी ठरणार असल्याचे कौतुकोदगार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. ते शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित कार्यक्रमात बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज भुसावळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील मुख्य कार्यक्रम हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. यात खासदार रक्षाताई खडसे यांच्या कार्यवृत्ताच्या प्रकाशनासह विविध योजनांच्या भूमिपुजनाचा समावेश होता. याप्रसंगी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून रक्षाताई खडसे यांच्या कार्याचा गौरव केला. रक्षाताईंनी आपल्या कार्यकाळात विविध योजनांचा गती दिल्याबद्दल त्यांनी कौतुकोदगार काढले. […]

भुसावळ राजकीय

सर्वांच्या सहकार्याने विकास केला- रक्षाताई खडसे

भुसावळ प्रतिनिधी । सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळे आपल्या कार्यकाळात विविध विकासकामे करून विविधांगी योजनांना गती मिळाल्याचे प्रतिपादन खासदार रक्षाताई खडसे यांनी केले. त्या येथील डॉ. आंबेडकर मैदानावर आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भुसावळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील मुख्य कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रारंभी खासदार रक्षाताई खडसे यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या की, मी खासदार बनल्यानंतर बाबांनी मला समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहचण्याचा मंत्र दिला होता. आपण लोकांमध्ये गेले पाहिजे. त्यांची कामे केली पाहिजे ही शिकवण त्यांनी मला दिली. आजवर हीच शिकवण मी अंमलात आणली आहे. पहिल्यांदा एक महिला […]

भुसावळ राजकीय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भुसावळात दाखल

भुसावळ प्रतिनिधी । धरणगाव येथील कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भुसावळात दाखल झाले असून त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जिल्हा दौर्‍यावर आले असून त्यांच्या उपस्थितीत धरणगाव येथे जनजाती मेळावा नुकताच संपन्न झाला. यानंतर मुख्यमंत्री भुसावळ येथे आले असून येथे त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत. भुसावळ येथील हेलीपॅडवर माजी महसूल मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. याप्रसंगी आमदार संजय सावकारे उपस्थित होते.

भुसावळ राजकीय

मुख्यमंत्री आज नेमका कोणता ‘डोस’ देणार ?

जळगाव प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांच्या स्वागतासाठी पक्षातील दोन्ही गट झटून कामाला लागले आहेत. मात्र या गटांना एकत्रीत राहण्यासाठी ते नेमका काय ‘डोस’ देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. जळगाव जिल्हा भाजपमधील गटबाजी आता अगदी उघड धुम्मसच्या स्वरूपात उफाळून आली आहे. जळगावात आमदार राजूमामा भोळे यांच्याविरूध्द पक्षातील दुसर्‍या गटाने दंड थोपटले आहे तर दुसरीकडे भुसावळात १६ कोटींच्या रस्त्याच्या टेंडरवरूनही दोन्ही गट आमने-सामने आले आहेत. यातच एका गटातील मातब्बर नेत्याची कथित वस्त्रहरण करणारी क्लिप व्हायरल करण्यामागे दुसर्‍या गटाचा हात असल्याचा आरोप होऊ लागला आहे. म्हणजे आक्षेपार्ह छायाचित्रे व्हायरल झाल्यानंतर त्या नेत्यासोबत पक्षाच्या अब्रूची लक्तरेदेखील वेशीवर […]

भुसावळ राजकीय

मुख्यमंत्र्यांच्या भुसावळ दौर्‍यासाठी काटेकोर नियोजन- प्रा. सुनील नेवे (व्हिडीओ)

भुसावळ संतोष शेलोडे । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भुसावळ येथील दौर्‍यासाठी अतिशय काटेकोरपणे नियोजन करण्यात आल्याची माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रा. सुनील नेवे यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिनांक २१ फेब्रुवारी रोजी जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. त्यांचे भुसावळ व धरणगाव येथे जाहीर कार्यक्रम आहेत. यात भुसावळ येथील मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याच्या यशस्वीतेसाठी आपल्या अचूक नियोजनासाठी ख्यातनाम असणारे नगरसेवक तथा जिल्हा सरचिटणीस प्रा. सुनील नेवे यांनी आपल्या सहकार्‍यांसह काटेकोर नियोजन केले आहे. मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच भुसावळला येत असल्यामुळे त्यांच्या या दौर्‍याला यशस्वी करण्यासाठी विविध पातळ्यांवरून नियोजन करण्यात आल्याची माहिती प्रा. नेवे यांनी या मुलाखतीत […]

भुसावळ राजकीय

आमदार सावकारेंच्या पाठपुराव्याने भुसावळ मतदारसंघासाठी २.८० कोटींचा निधी

भुसावळ प्रतिनिधी । आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नांनी ग्रामीण भागातील गावांसाठी २.८० कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार संजय सावकारे यांच्या पाठपुराव्यामुळे मूलभूत सुविधा पुरवणे अंतर्गत भुसावळ तालुक्यातील डांबरी रस्ते, सामाजिक सभागृह, स्मशान भूमी बांधकामांसाठी ग्राम विकास व पंचायत राज विभागामार्फत २ कोटी.८० लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला. तसेच वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेअंतर्गत ५० लक्ष रुपये किमतीच्या कामांना मंजुरी मिळाली विकास कामांमध्ये तळवेल ता. भुसावळ येथील पाण्याची टाकी ते शाळेपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे १० लक्ष, बेलखेडा ता. भुसावळ येथे अंतर्गत रस्ते ५लक्ष, कुर्‍हे पानाचे ता. भुसावळ येथील स्मशान भूमी मध्ये बैठक व्यवस्थेसाठी ५ लक्ष, कंडारी ता. भुसावळ […]