दिपनगर, ता. भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लेवा पाटीदार समाज विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी आमदार संजय सावकारे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले असून याबाबत फेकरीच्या सरपंचांनी त्यांचे आभार मानले आहेत.
भुसावळ तालुक्याचे आमदार संजय भाऊ सावकारे यांनी लेवा पाटीदार समाजाच्या विकासाकरिता महाराष्ट्र शासनाकडे लेवा समाज विकास महामंडळ स्थापन करणेकामी लेखी स्वरूपात मागणी केलेली आहे. मुख्यतः जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यात वास्तव्यास असलेला आणि उपजीविका शेती व्यवसायावर अवलंबून असलेला लेवा पाटीदार समाज बिकट आर्थिक स्थितीला सामोरे जात आहे.दर वर्षी नैसर्गिक आपत्ती कारणामुळे शेती व्यवसाय सोडून हा समाज उपजीविकेसाठी हळूहळू शहरी भागात स्थलांतरीत होत आहे.राज्यातील एकूण ३५८ तालुक्यांपैकी मोजून ६ ते ७ तालुक्यात लेवा पाटीदार समाज अल्प प्रमाणात वास्तव्यास आहे.
महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्यांक लेवा पाटीदार समाजाचा विकास करणे करिता प्रयत्न कमी पडत असून मर्यादा येत असल्याने या समाजाचा विकास शासनाच्या मदतीशिवाय होणे शक्य नाही. या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून भुसावळ तालुक्याचे आमदार संजय भाऊ सावकारे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे लेवा पाटीदार आर्थिक विकास महामंडळ स्थापना करण्याची मागणी केलेली आहे.
या अगोदर फेकरी गावातील लेवा पाटीदार समाज सभागॄह बांधकामासाठी ५० लाख रूपयांचा निधी आमदार सावकारे यांनी उपलब्ध करुन दिलेला आहे. सदर विकास कामांसाठी प्रयत्नशील , तत्पर आणि सतत लोकनेत्यांच्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरवठा करणाऱ्या फेकरी गावच्या प्रथम महिला तथा सरपंच चेतनाताई संजय भिरूड यांनी यावेळी आमदार संजय सावकारे यांचे मनःपूर्वक आभार मानले.