प्रशांत किशोर यांची राजकीय रिंगणात एन्ट्री

पाटणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आता राजकारणात धडाक्यात एंट्री घेतली आहे. पाटणा या ठिकाणी बुधवारी त्यांनी ‘जन सुराज’ या त्यांच्या पक्षाची घोषणा केली आहे. मनोज भारती हे पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष असतील. बिहारमध्ये आज मी एक नारा देतो आहे, तो नारा आहे जय बिहार! असे प्रशांत किशोर म्हणाले.

प्रशांत किशोर यांनी जन सुराज पक्षाची घोषणा पाटणा येथील व्हेटरनरी महाविद्यालयाच्या मैदानावर केली. यानंतर ते लोकांना संबोधित करत म्हणाले की मागच्या अडीच वर्षांपासून जन सुराज पक्ष आणण्याची तयारी सुरु होती. सगळे लोक विचारत होते की तुम्ही पक्षाची घोषणा कधी करणार? आज मी ही घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला अधिकृतरित्या पक्षाचा दर्जा दिला आहे. हे नाव योग्य आहे ना? असंही प्रशांत किशोर यांनी जमलेल्या गर्दीला विचारलं.

सगळ्यांनी अनुमोदन दिलं आहे. पक्षाच्या स्थापनेच्या आधी प्रशांत किशोर यांनी जी मोहीम चालवली त्यात त्यांनी चंपारण येथून राज्याची सुमारे ३ हजार किलोमीटरची पदयात्रा केली. ही पदयात्रा दोन वर्षांपूर्वी सुरु झाली होती. महात्मा गांधी यांनी देशातला पहिला सत्याग्रह सुरु केला होता. २ ऑक्टोबरच्या दिवशी म्हणजेच गांधी जयंतीच्या दिवशी त्यांनी पक्षाची घोषणा केली आहे. बिहारच्या जनतेला आता नव्या राजकीय पक्षाचा पर्याय या निमित्ताने निर्माण झाला आहे.

Protected Content