मुक्ताईनगर

मुक्ताईनगर सामाजिक

शहीद जवानांना मुक्ताईनगर भाजपतर्फे श्रद्धांजली

मुक्ताईनगर प्रतिनिधी । पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना येथील भारतीय जनता पक्षातर्फे श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी माजी महसुल मंत्री आमदार एकनाथराव खडसे, भाजपा तालुका अध्यक्ष दशरथ कांडेलकर, बाजार समिति सभापती निवृत्ती पाटील, भाजप शहराध्यक्ष मनोज तळेले, सरचिटणीस संदिप देशमुख, नगरसेवक ललित महाजन, बापु ससाणे, योगेश कोलते, भाजयुमो विधानसभा क्षेत्र प्रमुख दत्ता पाटील, भा ज यु मो तालुका अध्यक्ष अंकुश चौधरी, युवती प्रमुख आम्रपाली पाटील ,प्रियंका चौधरी ,प्रतिभा ढाके, सुनिल काटे ,प्रफुल जावरे ,सचिन पाटील, पांडुरंग नाफडे, सुभाष खाटीक, संदिप जुमळे, राहुल गोसावी , बापू ठेलारी उपस्थित होते याप्रसंगी आमदार एकनाथराव खडसे म्हणाले की, भारतीय जवानांवर दहशतवाद्यांनी भ्याड […]

मुक्ताईनगर राजकीय

मुक्ताईनगर येथे “मेरा परिवार भाजपा परिवार” अभियान सुरु

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षातर्फे ” मेरा परिवार भाजपा परिवार ” अभियान राबविन्यात येत आहे, या अभियानाअंतर्गत आज आ.एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताई या निवासस्थानी स्वत: त्यांच्या हस्ते भाजपाच्या ध्वजाचे आरोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आ. खडसे म्हणाले की, देशाला नरेंद्र मोदी यांच्या रूपाने कणखर पंतप्रधान लाभले आहेत, आज भारत प्रत्येक क्षेत्रात सर्वांगीण प्रगती करत आहे, प्रगतीचा हा रथ असाच सुरू ठेवण्यासाठी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाला केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार पुन्हा एकदा बहुमताने निवडुन येण्यासाठी प्रयत्न करायचे आहे व परत पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना विराजमान करण्यासाठी संकल्प करायचा आहे. त्यासाठी भाजपतर्फे 12 फेब्रुवारी […]

जामनेर बोदवड भुसावळ मुक्ताईनगर यावल राजकीय रावेर

खडसे एके खडसे !

जळगाव (प्रतिनिधी)  भाजपचे वर्चस्व असलेला रावेर लोकसभा मतदारसंघात २०१४ मध्ये तत्कालीन खासदार हरिभाऊ जावळे यांना डावलून एकनाथ खडसे यांनी आपली स्नुषा रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यास भाग पाडले होते. त्या निवडणुकीत स्वत: नाथाभाऊंनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आणि रक्षाताईंना ऐतिहासिक मताधिक्याने निवडून आणले होत. परंतु भाजपातील एक गट यावेळी रक्षाताईचे तिकीट कापले जाईल आणि हरिभाऊ जावळे यांना मिळेल अशा आवया उठवीत आहे. खरं म्हणजे हा मतदार संघ भाजप ऐवजी खडसे यांचा बालेकिल्ला म्हटला तरी चुकणार नाही. याला कारणही तसचं आहे. या मतदार संघात येणाऱ्या जामनेर वगळून प्रत्येक विधानसभा मतदार संघावर खडसेंची जबरदस्त पकड आहे. अगदी नगरध्यक्ष,नगरसेवक तसेच जिल्हा परिषद,पंचायत समितीमधील […]

क्रीडा मुक्ताईनगर

सीएम चषक स्पर्धेत मुक्ताईनगर विधानसभा उत्तर महाराष्ट्रात प्रथम

भुसावळ प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार घेण्यात आलेल्या सीएम चषक स्पर्धेत उत्तर महाराष्ट्रातून मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राने अव्वल क्रमांक मिळवला आहे. ग्रामिण व शहरी भागातील युवक युवती यांच्या मधील कला गुणांना वाव मिळावा त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी संपुर्ण राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सीएम चषकाचे विधानसभा ,जिल्हा ,राज्य स्तरावर आयोजन करण्यात आले होते. याच्या अंतर्गत मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात आयुष्यमान भारत क्रिकेट स्पर्धा, उडान १०० मीटर धावणे, मुद्रा योजना ४०० मीटर धावणे, शेतकरी सन्मान कबड्डी योजना, इंद्रधनुष्य चित्रकला स्पर्धा, मेक इन इंडिया रांगोळी स्पर्धा, खो खो स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुर्ण विधानसभा क्षेत्रातून सुमारे ६५८८५ […]

कृषी मुक्ताईनगर

रूईखेडा येथील चंद्रशेखर बढे यांना ‘उद्यान पंडित’ पुरस्कार

जळगाव प्रतिनिधी । राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत २०१५-१६ या वर्षाचे कृषी पुरस्कार जाहीर करण्यात आले. यात मुक्ताईनगर तालुक्यातील रुईखेडा येथील शेतकरी चंद्रशेखर रामभाऊ बढे यांना उद्यान पंडीत पुरस्कार घोषित झाला आहे. शेती व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्ती व संस्था यांना शासनाच्या कृषि विभागामार्फत विविध विभागातून पुरस्कार जाहीर करण्यात येतात. २०१५-१६च्या पुरस्कारात जळगाव जिल्ह्यातील रुईखेडा येथील प्रगतशील शेतकरी चंद्रशेखर बढे यांनी कृषी व फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहेे. नावीन्यपूर्ण प्रयोगातून ते आधुनिक शेती करीत आहेत. त्यांना उद्यान पंडित हा पुरस्कार घोषीत झाला असून याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

मुक्ताईनगर

मुक्ताईनगर येथे संत तुकाराम महाराज जयंती साजरी

मुक्ताईनगर प्रतिनिधी । येथे जगदगुरू संत तुकाराम महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संत तुकाराम महाराज जयंतीनिमित्त शहरातील प्रवर्तन चौकात तुकोबारायांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यावेळी रवींद्र हरणे महाराज, पंचायत समिती सभापती शुभांगी भोलाने, नगराध्यक्षा नजमा तडवी, उपनगराध्यक्षा मनीषा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, छोटू भोई, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष संदीप देशमुख, जिल्हा परिषद सदस्य नीलेश पाटील, नगरसेवक संतोष मराठे, नीलेश शिरसाठ, संतोष कोळी, मुकेश वानखेडे, नगरसेविका कुंदा पाटील, दुर्गा मराठे, तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख, उपाध्यक्ष माणिकराव पाटील, दिनेश कदम, धनंजय सापधरे, डॉ.जगदीश पाटील, विकास पाटील, छबिलदास पाटील आदी उपस्थित होते.

क्राईम मुक्ताईनगर

अस्वलाची शिकार करणारे दोन आरोपी अटकेत

मुक्ताईनगर प्रतिनिधी । मध्य प्रदेशातील धामणगाव शेतात एका अस्वलाची शिकार करून मुक्ताईनगर तालुक्याच्या धाबा पिंप्री येथे लपलेल्या दोन्ही आरोपींना महाराष्ट्र व मध्यप्रदेश वनविभागाच्या अधिकार्‍यांनी आज सकाळी अटक केली आहे. याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, मध्यप्रदेशातील धामणगाव येथे एका अस्वलाची शिकार करणारे नवलसिंग थत्तरसिंग पावरा आणि कन्नकसिंग थत्तरसिंग पावरा हे दोन आरोपी हे मुक्ताईनगर तालुक्यातील धाबापिंप्री येथे लपून बसलेले असल्याची माहिती वन खात्याला मिळाली होती. यानुसार महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या वन खात्याच्या संयुक्त पथकाने आज या दोन्ही आरोपींना जेरबंद केले आहे. याबाबत अद्याप गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

जळगाव मुक्ताईनगर सामाजिक

मुक्ताई उपसा जलसिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करण्याची मागणी

जळगाव (प्रतिनिधी) बोदवड शहर व परिसरातील ग्रामीण भागात आताच पाण्याची तीव्र टंचाई भासत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे बंद पडलेली मुक्ताई उपसा जलसिंचन पुन्हा सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. बोदवड शहर व ग्रामीण भागात सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. बऱ्याच गावांना पाणी मिळण्याचा दुसरा कुठलाही स्त्रोत नाही, त्यामुळे माणसांचे व गुरांचे हाल होत आहेत. या ठिकाणी मुक्ताई उपसा जलसिंचन योजना मंजूर करण्यात आली आहे, त्यावर असलेले 110 कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यात आले आहे. त्या पैकी शासनाने 48 कोटी रुपये दिले असून बँकेने 78 कोटींचे व्याज […]

मुक्ताईनगर सामाजिक

खामखेडा येथे योजनेच्या माहितीसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम

मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा येथे योजनेच्या माहितीसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी मार्गदर्शन केले. डॉ शामा प्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन मिशन अंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा गाव समुहाची निवड करण्यात आली आहे यामध्ये हरताळा, कोथळी, सालबर्डी, वढवे, चांगदेव, खामखेडा या गावांचा समावेश आहे. या अनुषंगाने संबंधीत योजनेची माहिती देण्यासाठी खामखेडा येथे सभा घेण्यात आली. माजी महसुल कृषी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली. यावेळी गट अधिकारी डी आर लोखंडे , प्रकल्प समन्वयक प्राची पाटील, बाजार समिति सभापती निवृत्ती पाटील , जि.प. सदस्य निलेश पाटील, वैशालीताई तायडे , वनिताताई […]

क्राईम मुक्ताईनगर

कुऱ्हा काकोडा येथे दोन अट्टल दरोडेखोर पोलिसांच्या जाळ्यात

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील कुर्‍हा काकोडा परिसरात पोलिसांनी आज केलेल्या नाकाबंदीदरम्यान धुळे येथील अट्टल दरोडेखोर पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या या कामगिरीमुळे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींजवळ धारदारजवळ हत्यारे होते. सदर आरोपी या परिसरात काहीतरी गुन्हा करण्याच्या बेतात असल्याचे बोलले जात आहे. मात्र, पोलिसांनी त्यांचा हा बेत हाणून पाडला आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मुक्ताईनगर पोलिस ठाणे हद्दीत वडोदा गावाजवळ जळगाव जामोद रस्त्यावर विभागीय पोलीस अधिकारी श्री. नेवे यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी लावण्यात आली होती. सदर नाकाबंदी दरम्यान एक मोटार सायकल तपासणीसाठी न थांबता पळून […]