धुळे

धुळे

ब्राम्हणेच्या सरपंचा ज्योत्स्ना निकम यांचा गौरव

शिंदखेडा (प्रतिनिधी) – तालुक्यातील ब्राम्हणे ग्रामपंचायतीच्या सदस्या ज्योत्स्‍ना निकम यांना उदयोन्मुख नेतृत्व पुरस्कार कार्यकम केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांच्याहस्ते देण्यात आला. सौ. निकम यांना पर्यावरण पुरस्कारामुळे जबाबदारी वाढल्याने २ हजार वृक्षांची लागवड करून संवर्धन करण्यात येत आहे. गावहद्दीत खाजगी उद्योगांना मंजुरी व बचत गटाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला हातभार लावण्यात येतो. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याने सर्वत्र कौतूक होत आहे. गावात उपलब्ध करून दिल्यात विविध सुविधा तालुक्यातील बाम्हणे गाव दुष्काळी भागात मोडते. परंतु तरीही गावात नियमित व शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी गावापासून पाच कि.मी. अंतरावरील तापी नदीचे पाणी काठावर उभारलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात स्वच्छ करून पाईपलाईनद्वारे आणले आहे. सांडपाण्यासाठी गटारी […]

धुळे राजकीय

जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार : पंतप्रधान

धुळे (प्रतिनिधी) आताची वेळ संवेदनशीलतेची वेळ आहे, शोक करण्याची वेळ आहे. मात्र, आता मी हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना आश्वासन देतो की, हुतात्मा जवानांनी जे रक्त सांडले आहे, त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाणार आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (शनिवार) येथे केले. येथील विविध विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी पुलवामा येथे दहशतवाद्याने केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, भारतीयाची एक निती आहे, आम्ही कोणाला डिवचत नाही. मात्र, आम्हाला डिवचले की, आम्ही कोणाला सोडणार नाही. यापूर्वी आपल्या भारतीय सुरक्षा दलातील जवानांनी करुन दाखवले आहे. त्यामुळे आताही पुन्हा दाखवून देणार आहे. जवानांनी सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंब आणि त्यांच्या कुटुंबियांच्या प्रत्येक […]

धुळे राजकीय

पंतप्रधान मोदी धुळ्यात येणारच !

धुळे (प्रातिनिधी) जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या (शनिवार) होणारा धुळे जिल्हा दौरा रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतू ही शक्यता खोटी ठरवत पंतप्रधान नरेंद्र मोदी धुळ्यात येत भूमिपूजन सोहळ्याला हजेरी लावून सभेला संबोधित करणारच आहेत. भारतीय सैन्य दल यासाठी सक्षम असल्याचे संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, ना.नितीन गडकरी आदी मान्यवर उद्या (ता.16) दुपारी 1 वाजता नियोजित कार्यक्रमानुसार धुळ्याला येतील. त्यांच्या हस्ते मनमाड-धुळे-इंदौर रेल्वेमार्ग, सुलवाडे-जामफळ उपसा सिंचन योजना, अक्कलपाडा धरण ते धुळे शहर पाईपलाईन योजनांचे भूमिपूजन आणि विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात येईल, तसेच नियोजित जाहिर सभेत पंतप्रधान […]

धुळे राजकीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा धुळे दौरा रद्द ?

धुळे (प्रतिनिधी) काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा धुळ्याचा उद्या होणारा नियोजित दौरा रद्द झाल्याचे वृत्त आहे. खुद्द भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी धुळे दौरा रद्द करण्याबाबत खासदार डॉ. सुभाष भामरे यांना सूचना दिल्याचे समजते. देशात असलेले गंभीर वातावरण लक्षात घेता भाजपातर्फे आगामी आठवडाभर कोणत्याही निवडणूक बैठका व प्रचार दौरे, सभा घेतल्या जाणार नाहीत, असेही समजते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भुसावळातील सभाही रद्द झाल्यात जमा असल्याचे कळते. दरम्यान,याबाबत प्रशासकीय पातळीवर अजून कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीय.

धुळे

धुळ्यात हुडहुडी कायम ; गारपीटीचा अंदाज

धुळे (प्रतिनिधी) सध्या राज्यात थंडीचा कडाका वाढला असून धुळे जिल्हात तापमानाचा पारा 3.4 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला आहे. तसेच ही थंडी काही पिकांसाठी लाभदायी असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. मात्र हवामान खात्याने येत्या दोन दिवसात गारपीटीचा अंदाज वर्तवला असल्याने शेतकरी चिंतीत झाले आहेत. मागील काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमान 10 अंश सेल्सियसच्या खाली गेले आहे. धुळ्यातही पारा 3.4 अंशांवर स्थिरावला आहे. जिल्ह्यात परतलेली थंडी काढणीला आलेला गहू, हरभरा या पिकांसाठी तसेच आंबा पिकांच्या मोहरांसाठी लाभदायी असल्याचं कृषी क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत. धुळ्यात दिवसभर गारठा राहत असल्यानं कमाल तापमानातही घट झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेचा हा प्रभाव पुढील काही दिवस कायम […]

धुळे राजकीय

पंतप्रधान मोदी १६ तारखेला धुळ्यात; विविध विकासकामांचे भूमिपूजन

धुळे (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी दि.16 फेब्रुवारी रोजी धुळ्यात येत आहेत. त्यात सुलवाडे जामफळ उपसा सिंचन योजना तसेच मनमाड-धुळे-इंदूररेल्वे मार्गाचा समावेश आहे.  यावेळी मोदी यांची जाहीर सभा देखील होणार आहे. सभेच्या नियोजित सभेसाठी जागेची प्रशासनातर्फे नुकतीच पाहणी करण्यात आली. यावेळी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल व पदाधिकारी तसेच पोलिस अधिक्षक विश्वास पांढरे उपस्थित होते. दरम्यान,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणुकीपूर्वी होणारी ही पहिलीच सभा असल्याने भव्य मैदान निवडले जात आहे. धुळेकरांच्या अनेकवर्षांचे स्वप्न असलेल्या मनमाड-धुळे-इंदौर रेल्वेमार्गाच्या कामाला मंजुरी मिळून अखेर प्रत्यक्ष सुरवात होत आहे. तसेच सुलवाडे जामफळ उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजन देखील […]

धुळे राजकीय

महाजनांनी धुळ्यातून निवडणूक लढवावी: अनिल गोटे यांचे आव्हान

धुळे प्रतिनिधी । जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बारामतीत नव्हे तर धुळे लोकसभा मतदारसंघातून मतपत्रीकेवर निवडणूक लढवावी असे खुले आव्हान आमदार अनिल गोटे यांनी त्यांना दिले आहे. निवडणुकीआधी भाजपमधील भाऊबंदकी उफाळून आली आहे. आधीच धुळे महापालिकेत पक्षाचे आमदार अनिल गोटे यांनी उघडपणे पक्षाला आव्हान दिले. येथे भाजपने दणदणीत विजय संपादन केला तरी गोटे यांचा आक्रमक पवित्रा कायम आहे. आता त्यांनी पुन्हा एकदा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना लक्ष्य केले आहे. त्यांनी ना. महाजन खुले आव्हान करताना म्हटले की, बारामतीत निवडणूक लढवायला कशाला जाता. त्यापेक्षा धुळ्यातच निवडणूक लढवा. मात्र ही निवडणूक ईव्हीएम नव्हे तर मतपत्रिकेवर निवडणूक लढवून दाखवा. धुळे शहरात भाजपचे […]

धुळे सामाजिक

धुळ्यात सर्वसमावेशक शिवजयंती साजरी होणार

धुळे प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्व समाजातील नागरिकांना सोबत घेऊन विविध उपक्रमांनी साजरी करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्च्याच्या बैठकीत घेण्यात आला आहे. शिवजयंतीच्या नियोजनासाठी मराठा क्रांती मोर्च्यातर्फे मराठा सेवा संघाच्या मालोजीराजे भोसले सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सुधाकर बेंद्रे तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष मनोज मोरे, नगरसेवक शीतल नवले, निंबा मराठे, दिलीप शितोळे, टी. पी. शिंदे, साहेबराव देसाई, डॉ. योगेश ठाकरे, पवन मराठे, अमर फरताडे, संदीप सूर्यवंशी, नाना कदम, अर्जुन पाटील, नैनेश साळुंके, अ‍ॅड. नितीन पाटील, अ‍ॅड. सचिन जाधव, दीपक रौंदळ, वीरेंद्र मोरे, महेश गायकवाड, राजेंद्र ढवळे, सुधीर मोरे, चंद्रकांत थोरात, […]

धुळे सामाजिक

राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त व्याख्यान

धुळे प्रतिनिधी । राजामाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त येथील झेड. बी. महाविद्यालयात इतिहासाचे अभ्यासक प्रशांत देशमुख यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या वेळी जयहिंद शैक्षणिक संस्थेचे चेअरमन डॉ. अरुण साळुंखे, व्हाइस चेअरमन प्रमोद पाटील, प्राचार्य डॉ. पी. एच. पवार, महाविद्यालयाच्या कमिटीचे चेअरमन सुधीर पाटील, पी. डी. दलाल आदी उपस्थित होते. प्रशांत देशमुख म्हणाले की, राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच स्वराज्याचे बाळकडू पाजले. त्यांना सर्व प्रकारचे ज्ञान दिले. त्याचबरोबर त्यांना शस्त्रविद्येत पारंगत केले. राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना परस्त्रीचा सन्मान करण्याची शिकवण दिली. रयतेचे रक्षण करून त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याचे शिकवले. स्वराज्यावर येणार्‍या संकटात त्या महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या […]

धुळे राजकीय

भाजप प्रदेशाध्यक्षांवर आमदार गोटेंची टीका

धुळे प्रतिनिधी । भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत जोरदार टीकास्त्र सोडून त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. याबाबत वृत्तांत असा की, काही दिवसांपूर्वीच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आमदार अनिल गोटे यांच्यावर कारवाई करणार नसल्याचे सांगितले. मात्र कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी शहराच्या आमदारकीचे ग्रहण सुटले, असे वक्तव्य केले. त्यावर आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, भाजप प्रदेशाध्यक्षांपेक्षा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी चांगले आहेत. निवडणुकीतील उमेदवारांची यादी रात्री मागितल्यानंतर आपण यादी दिली. मात्र स्थानिक नेत्यांनी दिलेली यादी दानवेंकडे असताना अजून यादी आली नाही असे त्यांनी सांगितले. तेव्हाच आपण त्यांना तीन मंत्र्यांना दुखवण्यापेक्षा माझ्या […]