Cities

चोपडा

चोपडा येथील डॉ.राहुल पाटील यांना राज्यस्तरीय रक्तमित्र पुरस्कार

चोपडा (प्रतिनिधी) । डॉ. राहूल पाटील यांना पुण्यातील स्व.रोहिणी जाधव स्मारक ट्रस्टचा रक्तमित्र 2018-19चा राज्यस्तरीय पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रामचंद्र देखणी यांच्याहस्ते देण्यात आला. स्वर्गीय रोहिणी जाधव स्मारक ट्रस्ट मागील 23 वर्षापासून रक्तदान क्षेत्रात रक्तदान क्षेत्रातील रक्तमित्र व रक्तदाता पुरस्कार तसेच एड्स जनजागृती पुरस्कार व निसर्ग पर्यावरण मित्र पुरस्कार असे एकूण चार पुरस्कारांचे सातत्याने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवी तसेच सामाजिक संघटना किंवा संस्था याची या पुरस्काराची निवड करत असते. डॉ. राहूल पाटील अध्यक्ष, पदाधिकारी व सहकारी यशोधन चारीटेबल ट्रस्ट यांनी ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक अध्यात्मिक पर्यावरण आरोग्य तसेच विशेष रक्तदान क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या […]

जळगाव

जिल्हा कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

जळगाव प्रतिनिधी । सचित्र छायाचित्रांसह जिल्ह्याच्या सर्वांगीण माहितीचा समावेश असलेल्या जळगाव जिल्हा कॉफी टेबल बुकचे प्रकाशन आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी करण्यात आले. यांची होती उपस्थिती याप्रसंगी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स व्यवसाय मंत्री महादेव जानकर, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव तथा जळगाव जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर उपस्थित होते. जळगाव जिल्हा कॉफी टेबल बुकमध्ये जिल्ह्याची सर्वांगीण माहिती देणारे विविध आठ विभाग असून यामध्ये १७० विषयांची हाय रिझोल्युशनची रंगीत छायाचित्रे आणि महत्त्वपूर्ण माहिती आहे. वर्षभराचे परिश्रम कॉफी टेबल बुकच्या कव्हरपेजवर कटआऊटसह अक्षरांच्या उठावाने लक्षवेधून घेणार्‍या या १८० पानी कॉफी टेबल बूकमधील आशय आणि छायाचित्रांची मांडणी […]

धरणगाव सामाजिक

धरणगाव येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती उत्साहात

धरणगाव (प्रतिनिधी) येथे थोर समाजसुधारक स्वच्छता अभियानाचे जनक राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची १४३ वी जयंती मोठ्या उत्साहात विविध ठिकाणी साजरी करण्यात आली. तसेच नगरपालिकेतर्फे प्रशासकीय इमारत सभागृहातील कार्यक्रमात प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी यांनी संत गाडगे महाराज याचा प्रतिमेस माल्यार्पण केले. यावेळी भाजपा गटनेते कैलास माळी व माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील यांनी गाडगेबाबा यांचा स्वच्छता संदेश घरोघरी पोहचवा असे प्रतिपादन केले. यावेळी उपस्थित चर्मकार समाजाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, विजय महाजन, नूतन विकास सोसायटी नवनिर्वाचित चेअरमन धीरेंद्र पुरभे, नगरसेवक भागवत चौधरी, सुरेश महाजन, विलास महाजन, नंदू पाटिल, परिट समाजचे प्रांत सदस्य छोटू जाधव, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख विनोद रोकडे, शिवसेना उपशहर प्रमुख रवींद्र […]

भुसावळ यावल राजकीय

जि.प. सदस्या नंदाताई सपकाळे यांच्या संपर्क कार्यालयास प्रारंभ (व्हिडीओ)

भुसावळ प्रतिनिधी । जिल्हा परिषद सदस्या नंदाताई दिलीप सपकाळे यांच्या संपर्क कार्यालयाचे आज आमदार हरीभाऊ जावळे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. नंदाताई दिलीप सपकाळे यांनी अंजाळे या गावी आपले संपर्क कार्यालय सुरू केले आहे. आमदार हरीभाऊ जावळे यांनी याचे उदघाटन केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे विधानसभा विस्तारक हर्षल पाटील, जिल्हा सरचिटणीस उज्जैनसिंग राजपूत, सामाजिक कार्यकर्ते दिलीप सपकाळे, अंजाळे येथील सरपंच मनीषा कोळी, ग्रामपंचायत सदस्य प्रमीलाबाई सपकाळे, त्र्यंबक सपकाळे, योगेश साळुंके, शांताराम सपकाळे, सुनील सपकाळे, पंकज सपकाळे, शंकर कोळी, सागर सपकाळे, संजय सपकाळे, विशाल सपकाळे, अमोल सपकाळे, भैया मोरे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी आमदार हरीभाऊ जावळे म्हणाले की, आज अगदी अंजाळे […]

चाळीसगाव राजकीय

चाळीसगाव तालुक्यासाठी चार कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर

चाळीसगाव (प्रतिनिधी) मतदार संघातील गावांमध्ये मुलभूत सुविधेअंतर्गत विकासकामांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी आ. उन्मेशदादा पाटील यांनी ग्रामविकास मंत्री ना. सौ. पंकजा मुंडे यांच्याकडे पाच कोटी रुपयांची मागणी केली होती. आ. उन्मेश पाटील यांच्या निवेदनाची दखल घेत मंत्र्यांनी २५१५ मुलभूत सुविधा योजनेंतर्गत चाळीसगाव तालुक्यासाठी चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक निधी चाळीसगाव तालुक्याला मिळाला आहे.   या निधीतून पुढील प्रमाणे कामे करण्यात येणार आहेत १ – भामरे येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे (७ लक्ष) व रस्ता सुधारणा करणे (५ लक्ष) २ – टेकवाडे येथे रस्ता सुधारणा करणे (५ लक्ष) ३ – राजदेहरे […]

भडगाव

भडगाव शहरात दर महिन्याला व्याख्यानाचे आयोजन

भडगाव(प्रतिनिधी) – येथील केशवसुत ज्ञानप्रबोधिनीच्या व्याख्यानमालेचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त दर महिन्याला एक व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे. या व्याख्यानमालेतील प्रथम पुष्प शिवजयंतीनिमित्त ‘बहुजनांचे छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर सुप्रसिद्ध वक्ते, लेखक व इतिहासाचे अभ्यासक प्रा. डॉ. जाकीर पठाण (जालना) हे गुंफणार आहेत. व्याख्यान सोमवारी २५ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास शेतकरी सहकारी संघाच्या प्रांगणावर आयोजित करण्यात आले आहे. प्रा.एल.जी.कांबळे यांनी आपले वडील स्व.ग्यानोबा लक्ष्मण कांबळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व संभाजी युवराज पाटील यांनी आपले वडील स्व. युवराज गजमल पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रायोजित केले आहे. व्याख्यानाला रसिक श्रोत्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती द्यावी, असे आवाहन केशवसुत ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष विजयराव देशपांडे, […]

जळगाव मनोरंजन

पहिल्या आशियाई चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन संदीप सावंत यांचे हस्ते तर समारोपाला दीपल लांजेकर!

जळगाव (प्रतिनिधी) पहिल्या आशियाई चित्रपट महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून, येत्या १ ते ४ मार्च दरम्यान माया देवी नगर येथील रोटरी हॉल येथे हा महोत्सव संपन्न होत आहे. महोत्सवाचे उद्घाटन १ मार्च रोजी सकाळी १० वाजता आ. स्मिता ताई वाघ आणि ‘श्वास’ चे दिग्दर्शक संदीप सावंत यांचे हस्ते योजण्यात आले असून, समारोप ४ मार्च रोजी सायंकाळी ७:३० वाजता जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांचे हस्ते संपन्न होणार आहे. या प्रसंगी फर्जंद चित्रपटाचे चे दिग्दर्शक दीपक लांजेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पर्यटन वा सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या सहयोगाने अजिंठा फिल्म सोसायटी यांच्या सहकार्याने समर्पण संस्थेच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन […]

जळगाव शिक्षण

गुरूवर्य पाटील व झांबरे विद्यालयात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना अभिवादन

जळगाव (प्रतिनिधी)। ‘गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला’ या भजनाने साऱ्या समाजाला आपल्या कीर्तनातून व कृतीतून समानतेची शिकवण देऊन स्वच्छतेचे महत्व पटवून देणाऱ्या जगद्गुरू राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील व ए.टी. झांबरे  विद्यालयात करण्यात आले. मान्यवरांच्याहस्ते प्रतिमापूजन सर्वप्रथम प्रमुख पाहुणे नूतन मराठा महाविद्यालयाचे, शालेय शिक्षण समन्वयक के.जी.फेगडे, शाळेच्या मुख्यापिका रेखा पाटील, मुख्याध्यापक डी. व्ही.चौधरी यांच्याहस्ते गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचा तसेच वर्गाचा परिसर स्वच्छ केला. इयत्ता पहिलीचा विद्यार्थी खोमेश निलेश अत्तरदे याने गाडगेबाबा यांची भूमिका साकारून सर्वाना आकर्षित केले. गाडगे महाराज म्हणजे लोकजागृती करणारे एक फिरते विद्यापीठ होते.लोकजीवन तेजाने […]

धरणगाव सामाजिक

धीरेंद्र पुरभे यांचा परिट समाजातर्फे सत्कार

धरणगाव (प्रतिनिधी) येथील नूतन विकास सोसायटीच्या चेअरमनपदी शिवसेनेचे शहर संघटक धीरेंद्र पुरभे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा परीट समाजातर्फे नुकताच सत्कार करण्यात आला. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झालेल्या या सत्कार प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, शिरीष बयस, नूतन सोसायटी संचालक निलेश चौधरी, राजेंद्र महाजन, भगवान महाजन, शैलेंद्र चंदेल व सर्व सचालक उपस्थित होते.

अमळनेर सामाजिक

संत गाडगेबाबांचे कार्य बहुजन समाजाला प्रेरणादायी : दिलीप सोनवणे (व्हिडीओ)

अमळनेर (प्रतिनिधी) साधी राहणी ,आणि उच्च विचारसरणीचे संत गाडगेबाबा यांनी संपूर्ण समाजाला स्वच्छतेचा मंत्र दिला. संत गाडगे महाराजांना सामाजिक न्याय,आणि सुधारणा व स्वच्छता यामध्ये जास्त रुची होती. त्यांचे कार्य संपूर्ण बहुजन समाजाला प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी केले. ते अमळनेर येथे पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय व डेबुजी झिंगराजी जानोरकर ग्रंथालय व मोफत वाचनालय यांच्या वतीने संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून शासकीय प्रतिमा वाटप प्रसंगी अध्यक्षीय भाषणातून  बोलत होते.   व्यासपीठावर साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्यां उपाध्यक्षा प्राध्यापक डॉ माधुरी भांडारकर, चिटणीस प्रकाश वाघ ,विश्वस्त बापू नगावकर ,परीट समाजाचे अध्यक्ष […]