भडगाव

भडगाव

भडगाव शहरात दर महिन्याला व्याख्यानाचे आयोजन

भडगाव(प्रतिनिधी) – येथील केशवसुत ज्ञानप्रबोधिनीच्या व्याख्यानमालेचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त दर महिन्याला एक व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे. या व्याख्यानमालेतील प्रथम पुष्प शिवजयंतीनिमित्त ‘बहुजनांचे छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर सुप्रसिद्ध वक्ते, लेखक व इतिहासाचे अभ्यासक प्रा. डॉ. जाकीर पठाण (जालना) हे गुंफणार आहेत. व्याख्यान सोमवारी २५ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास शेतकरी सहकारी संघाच्या प्रांगणावर आयोजित करण्यात आले आहे. प्रा.एल.जी.कांबळे यांनी आपले वडील स्व.ग्यानोबा लक्ष्मण कांबळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व संभाजी युवराज पाटील यांनी आपले वडील स्व. युवराज गजमल पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रायोजित केले आहे. व्याख्यानाला रसिक श्रोत्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती द्यावी, असे आवाहन केशवसुत ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष विजयराव देशपांडे, […]

आरोग्य पाचोरा भडगाव

आ. किशोर पाटील यांच्या प्रयत्नातून पाचोरा-भडगाव ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी

पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा व भडगाव ग्रामीण रूग्नालयांना उपजिल्हा रूग्नालयाचा दर्जा मिळावा, अशी मागणी आमदार किशोर पाटील पाटील शासनाकडे केली आहे. त्या अनुषंगाने आज मंत्रालयात राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची व लोकप्रतिनिधीची एक बैठक झाली. मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असुन त्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे आमदार किशोर पाटील यांना सांगितले आहे. पाचोरा व भडगाव येथे सध्या ग्रामीण रूग्नालय कार्यरत आहे. दोघा तालुक्याचा आरोग्याचा व्याप व जळगावचे अंतर पाहता पाचोरा व भडगाव येथील ग्रामीण रूग्नालयांना उपजिल्हा रूग्नालयाचा दर्जा द्यावा, अशी मागणी आ. किशोर पाटील यांनी शासन दरबारी लावून धरली आहे. पाचोरा येथे ग्रामीण रूग्नालयाच्या नविन इमारतीला प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी मागणी […]

भडगाव राजकीय

भडगावात शिवसेना बुथ प्रमुखांचा मेळावा

भडगाव प्रतिनिधी । येथे आज शिवसेना बुथ प्रमुखांचा मेळावा पार पडला. यात पक्षाचे सहसंपर्क प्रमुख आर.ओ. पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, बुथप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. यांची होती उपस्थिती या कार्यक्रमाला पक्षाचे सहसंपर्क प्रमुख तथा माजी आमदार आर.ओ. पाटील यांच्यासह विधानसभा संपर्कप्रमुख सुनील पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी, प्रा.गणेश पाटील, नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, उपनगराध्यक्ष वसिम मिर्झा, शहरप्रमुख मनोहर चौधरी, तालुका प्रमुख डॉ.विलास पाटील, शहर संघटक डॉ.प्रमोद पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख जे.के. पाटील, सहकारसेना तालुकाप्रमुख युवराज पाटील, युवासेना जिल्हा सरचिटणीस लकीचंद पाटील, युवासेना तालुकाप्रमुख रवींद्र पाटील, नगरसेवक अतुल पाटील, जग्गू भोई तसेच महिला आघाडीच्या […]