क्राईम

क्राईम राज्य

धक्कादायक…मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच नकली क्राईम ब्रांच

मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नागपुरात गुन्हेगारीला अक्षरश: ऊत आला आहे. गुन्हेगारांनी वेगवेगळ्या युक्त्या शोधून पोलिसांच्या नाकी नऊ आणले आहेत. आता तर एका भामट्याने चक्क नकली क्राईम ब्रॅन्च म्हणजेच ‘गुन्हे अन्वेषण शाखा’ सुरु केली होती, ती ही भाड्याच्या घरात. एवढेच नाही तर डायरेक्टर क्राईम इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असा त्याने बोर्डही लावला होता. तो शहरात खुलेआम फिरत होता. पोलिसांनी नागपूरच्या समर्थनगर भागात एका भाड्याच्या घरात छापा टाकून नकली क्राईम ब्रॅन्चचा भंडाफोड केला. आरोपी नरेश पालरपवार हा ‘क्राईम इन्व्हेस्टिगेशन एजन्सी’ नावाने ही नकली क्राईम ब्रॅन्च चालवत होता. पोलिसांनी आरोपी पालरपवार याला अटक केली आहे. तसेच त्याच्या कार्यालयातून काही दस्ताऐवजही जप्त केले आहेत. अशिक्षितांची […]

क्राईम जळगाव

वाळू माफियांकडून पोलिसांवर दगडफेक;तीन कर्मचारी जखमी

  जळगाव (प्रतिनिधी) अवैध वाळु तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या आरसीपी पथकातील तीन कर्मचाऱ्यांवर दगडफेक झाल्याची खळबळजनक घटना खेडी नदीपात्रात शुक्रवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी अज्ञात २० ते २२ लोकांविरुद्ध तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक असे की, आरसीपीच्या पथकातील पोलिस नाईक प्रकाश मन्साराम वाघ यांच्या नेतृत्त्वात शुक्रवारी रात्री २२ पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक वाळु तस्करांवर कारवाईसाठी मुख्यालयातून निघाले होते. रात्री १२ वाजेच्या सुमारास त्यांना खेडी गावाजवळ वाळु वाहुन नेणारे एक ट्रॅक्टर मिळुन आले. ट्रॅक्टर जप्तीची कारवाई पुर्ण करुन हे ट्रॅक्टर तालुका पोलिस ठाण्यात आणत होते. त्याचवेळी घटनास्थळापासून थोड्याच अंतरावर अंधार लपून बसलेल्या सुमारे २० ते २२ […]

एरंडोल क्राईम

एरंडोलला पेट्रोलपंपावर बंदुकीच्या धाकाने लुटमार

एरंडोल (प्रतिनिधी) येथील राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील एका पेट्रोल पंपावर पिस्तुलाचा धाक दाखवत रोकड लुटल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसांनी तपासचक्र फिरवायला सुरुवात केली आहे. या संदर्भात अधिक असे की, धरणगाव येथील बाबूलाल शहा यांचा एरंडोलपासून साधारण ५ कि.मी अंतरावर नवीन धारागीर गावाजवळ हाय-वे वर एम.जी शहा नावाने पेट्रोल पंप आहे. शुक्रवारी रात्री पेट्रोलपंपावर रवींद्र पाटील व निलेश पाटील हे दोन कर्मचारी नेहमी प्रमाणे कामावर होते. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पेट्रोल भरण्याच्या बहाण्याने आले. त्यानंतर त्यांनी दोघं कर्मचारींना बंदुकीचा धाक दाखवून साधारण ४७ हजाराची रोकड लंपास केली. या घटनेची माहिती मिळताच एरंडोल […]

अमळनेर क्राईम

झाडी येथील तरूणाचा खून; परिसरात खळबळ

अमळनेर प्रतिनिधी। तालुक्यातील मारवड पोलीस स्टेशन हद्दीतील झाडी येथील तरूणाचा खून झाल्याचे उघडकीस आल्याने खबळ उडाली आहे. अमळनेर तालुक्यातील झाडी गावापासून १ किमी अंतरावरील शेतात २४ वर्षीय अविवाहित युवकाचा खून झाला असल्याची घटना काल सायंकाळी उघडकीस आली आहे. झाडीचे पोलीस पाटील यांनी पोलिसांना या बाबत खबर दिल्यावरून मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील , पोलीस उपनिरीक्षक निलेश शेमळे, सहाय्यक फौजदार रोहिदास जाधव , भागवत पाटील, पोलीस नाईक सुनिल अगोने, दिनेश कुलकर्णी हे त्वरित झाडी गावांतील सुभाष गोविदा पाटील यांच्या शेतात घटनास्थळी दाखल झाले. संबंधीत शेतमालकाचा मुलगा सुनील सुभाष पाटील वय २४ राहणार झाडी ता अमळनेर याचा शेतात असलेल्या […]

क्राईम जामनेर

जिल्हा परिषदेचा अभियंता व शिपाई एसीबीच्या जाळ्यात

जळगाव प्रतिनिधी । सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याकडून लाच मागणारा जिल्हा परिषदेचे कनिष्ठ अभियंता व शिपायाविरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुन्हा दाखल केला आहे. जि.प.बांधकाम उपविभागाचा कनिष्ठ अभियंता पी.डी.पवार वय( ५४ रा.प्लॉट क्रमांक २० गौरी पार्क वीर सावरकरनगर पिंप्राळा) असे तर मंगेश गंभीर बेडीस्कर,( वय ३५ रा.प्लॉट क्रमांक ५ पार्वती नगर मोहाडी रोड) असे शिपायाचे नाव आहे. तक्रारदार हा सुशिक्षित बरोजगार अभियंता आहे. नोंदणीकृत सुशिक्षित बरोजगार अभियंत्यांना शासनाची कामे देण्यात येतात. त्यानुसार त्यांना जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयामार्फत काँक्रिटीकरणाचे कंत्राट मिळालेले होते. त्या कामाचे बील मंजूर करण्याच्या मोबदल्यास आरोपी पवार व बेडीस्कर यांनी ११ फेब्रुवारी रोजी पंचासमक्ष ४ हजार ५०० रूपयांच्या […]

अमळनेर क्राईम

समाजकंटकांकडून आंदोलन मंडपाची जाळपोळ;अमळनेरात प्रचंड खळबळ

  अमळनेर (प्रतिनिधी) पाडळसरे धरण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी यांचे पाडळसरे धरणासाठीचे आंदोलन सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात जोर धरत आहे. याचदरम्यान काल (गुरुवार) मध्यरात्री अज्ञात समाजकंटकांनी काल रात्री पेट्रोल टाकून आंदोलन मंडप स्टेज व बॅनर, परदे जाळल्यामुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. तर सत्ताधारी गटाकडून आंदोलन मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा देखील श्री.चौधरी यांनी केला आहे. उपोषणस्थळी आतापर्यंत माजीमंत्री अरुण भाई गुजराती गुलाबराव देवकर, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार गुलाबराव पाटील व अनेक सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांनी धरणाच्या उपोषणाच्या ठिकाणी भेटी दिल्या आहेत. त्यामुळे सध्या उपोषण करणाऱ्यांना पाठिंबा व प्रतिसाद वाढत असताना हे उपोषण बंद व्हावे, यासाठी अडथळे आणण्याचा […]

क्राईम राज्य

मराठीत बोल सांगितल्याने बांगलादेशी कुरियर बॉयकडून तरुणींना मारहाण

मुंबई (वृत्तसंस्था) कुरियर घेऊन आलेल्या तरुणाला मराठीत बोल असे सांगितल्यावर त्याने दोन महिलांना मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली. शिवाजी पार्क पोलिस ठाणे आणि शिवसेना भवनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गुरुकृपा इमारतीत ही घटना घडली. या इमारतीमध्ये सुजिता पेडणेकर आणि विनीता पेडणेकर या दोघी राहतात. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कुरियर घेऊन आलेल्या कुरियर बॉयला या युवतींनी मराठीत बोलण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने या तरुणाने शिवीगाळ करत एका युवतीच्या चेहऱ्यावर पेनाने वार केला तर, दुसरीच्या डोक्यावर ठोसा लगावला. या तरुणींनी स्थानिकांच्या मदतीने आरोपी तरुणास पकडून शिवाजी पार्क पोलिसांच्या हवाली केले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू असून आरोपी हा बांगलादेशी असल्याची प्राथमिक […]

क्राईम राज्य शिक्षण

पेपरचे फोटो काढणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी मुंबईत इंग्रजी विषयाच्या परीक्षेदरम्यान एका विद्यार्थ्याने प्रश्नपत्रिकेचे फोटो काढल्याची घटना समोर आली आहे. परीक्षा सुरु झाल्यावर विद्यार्थ्याने हे फोटो काढले असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन असल्याने त्याला अटक करण्यात आलेली नसून त्याचा मोबाईल मात्र जप्त करण्यात आला आहे. सांताक्रूझमधील कनिष्ठ महाविद्यालय बारावीचे परीक्षा केंद्र असून वाकोला येथील रात्र महाविद्यालयातील विद्यार्थी या परीक्षा केंद्रात आला होता. गुरुवारी पहिलाच पेपर इंग्रजीचा होता. सकाळी ११.०० वाजता परीक्षा सुरु झाली. ११.३०च्या सुमारास पर्यवेक्षकाला एक विद्यार्थी इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेचे मोबाईलवर फोटो काढत असल्याचे लक्षात आले आणि हा प्रकार उघड झाला. हे […]

क्राईम राष्ट्रीय

उ.प्र.तून दोन संशयित दहशतवाद्यांना अटक

सहारनपुर (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकानं शुक्रवारी सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथून जैश ए मोहम्मदच्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली. देवबंद येथील एका वसतिगृहात ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. शाहनवाझ अहमद तेली आणि आकिब अशी या संशयित दहशतवाद्यांची नावे आहेत. शाहनवाझ जम्मू-काश्मीरच्या कुलगामचा आहे, तर आकिब हा पुलवामातील रहिवासी आहे. सूत्रांनुसार, ब्रेन वॉश करून ‘जैश’ या दहशतवादी संघटनेत भरती करता येतील, अशा तरुणांच्या शोधात हे दोघे उत्तर प्रदेशात आले होते. याआधीही ते अनेकदा देवबंद आणि राज्यातील इतर भागात आले होते. आकिब पहिल्यांदा जानेवारीत एटीएसच्या रडारवर आला होता. एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, या संशयितांच्या फोनमधून ‘जैश’ शी संबंधित […]

क्राईम जळगाव

आयकर धाड: सहा कोटीची रक्कम सापडल्याच्या चर्चेने खळबळ

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील आठ दवाखान्यात मागील सलग तीन दिवसापासून झाडाझडती सुरु आहे. या झाडाझडतीत  एका रुग्णालयात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना ६ कोटीची रोकड सापडल्याची चर्चा आहे. या संदर्भात अधिकृत कुठलीही माहिती समोर आलेली नाहीय. दरम्यान, रोकड सापडल्याच्या या चर्चेमुळे मात्र,शहरात प्रचंड खळबळ उडालेली आहे. राज्य आयकर विभागाच्या मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद व नागपूर येथील पथकांनी बुधवारी जळगाव शहरातील आठ रुग्णालये, पॅथॉलाॅजी लॅबसह डायग्नोस्टीक सेंटर्सवर सशस्त्र पोलिस बंदोबस्तात धाडी टाकून झाडाझडती घेत आहेत.  त्यात मू. जे. महाविद्यालय रस्त्यालगतचे डॉ. विकास बोरोले यांचे नेत्रम हॉस्पिटल, भास्कर मार्केटमधील डॉ. सुनील नाहाटा यांचे वर्धमान अॅक्सिडेंट हॉस्पिटल, इंडो-अमेरिकन हॉस्पिटल व गोल्ड सिटी हॉस्पिटल,डॉ. राजेश डाबी यांचे […]