नंदुरबार

नंदुरबार

दहशतवादाचा पुतळा दहन करताना शहाद्यात तरुणाचा चेहरा भाजला

नंदूरबार (प्रतिनिधी) जिल्ह्यातील शहादा येथे (सोमवार) सकाळी दहशवादाचा प्रतिकात्मक पुतळा दहन करताना एक तरुण भाजल्याची घटना घडली. राजी इलियास मेमन (वय-43) असे जखमी तरुणाचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, शहरातील मेमन कॉलनीत पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा सकाळी अकरा वाजेच्या सुमारास निषेध करण्यात आला. दहशतवादाचा प्रतिकात्मक पुतळा जाळून मुस्लिम नागरिकांनी हल्ल्याचा निषेध केला. त्यावेळी पुतळा दहन करताना राजी याच्या हातात पेट्रोलची बाटली होती. पुतळ्याला आग लावताच राजीच्या हातात असलेल्या पेट्रोलच्या बाटलीनेही पेट घेतला, त्यामुळे त्याच्या दाढीचे केसही पेटले. त्यात राजीचा चेहरा भाजला असून त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, राजी इलियासच प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्याचे कळते.

Cities क्राईम नंदुरबार

चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या

नंदुरबार प्रतिनिधी । नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात आठ वषीय मुलीची बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा तालुक्मयातील सोरापाडा तेथील आठ वषीय मुलीवर नराधमाने बलात्कार करून तिची गळा आवळून हत्या केल्याची घटना मंगळवारी (ता.२२) रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. रात्री लाईट गेली होती. त्याचा फायदा घेऊन नराधमाने हे घृणास्पद कृत्य केले. दरम्यान, आज सकाळी शेकडो नागरिकांनी अक्कलकुवा तहसिल कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. नराधमाला फाशी द्या, अशा घोषणा या वेळी करण्यात आल्या. या प्रकरणी कमलसिंग कर्तारसिंग सिकलीकर (वय-३२) या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. संतप्त जमावाने अक्कलकुवा पोलिस स्टेशनला घेराव घालून नराधमाला फाशी देण्याची मागणी केली.

क्राईम नंदुरबार

नर्मदा नदीत बोट उलटून पाच ठार

नंदुरबार प्रतिनिधी । नर्मदा नदीतून प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटून पाच जण ठार झाले असून ३६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील भुशा पॉइंटजवळ आज दुपारी ही दुर्घटना घडली. या बोटीमध्ये ५० पेक्षा जास्त प्रवाशी होते. यातील पाच जणांचे मृतदेह हाती लागले असून उर्वरित प्रवाशांना वाचविण्यात आलेले आहे. तथापि, यांच्यातील ३६ जणांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच काही प्रवासी बेपत्ता झाले असून यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

नंदुरबार

नंदुरबार येथे दोन दिवसीय ग्रंथोत्सवास प्रारंभ

नंदुरबार प्रतिनिधी । ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे येथील जुन्या पोलिस कवायत मैदानात सोमवारपासून दोन दिवसीय ग्रंथोत्सवाला प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी विद्यालयातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी व उपनगराध्यक्ष परवेज खान उपस्थित होते. दिंडीत विविध शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. के. डी. गावित सैनिक शाळातील विद्यार्थ्यांनी मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर केली. ग्रंथोत्सवाच्या उदघाटनपर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. विजयकुमार गावित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अ‍ॅड. के.सी. पाडवी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रजनी नाईक, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय पाटील, उपनगराध्यक्ष परवेज खान, माजी उपनगराध्यक्षा शोभा मोरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास […]

नंदुरबार सामाजिक

अंनिसतर्फे महिला पोलिसांचा सत्कार

नंदुरबार प्रतिनिधी । क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे महिला पोलीसांचा सत्कार करण्यात आला. अंनिसतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त महिला प्रबोधन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त जिल्ह्यातील ७५ महिला पोलिसांचा अंधश्रद्धा निर्मूलन समिती व दीनानाथ एस. श्रॉफ संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलिस अधीक्षक संजय पाटील अध्यक्षस्थानी होते. मनोज श्राफ, डीवायएसपी सीताराम गायकवाड, अंनिसचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. शशांक कुलकर्णी, जिल्हा महिला कार्यवाह भारती पवार, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद सोनार, शांतिलाल शिंदे, सुकलाल शिंदे, फिरोज खान मोहंमद खान आदी उपस्थित होते. याप्रसंगी अ‍ॅड. प्रियदर्शन […]