धुळे व अहमदनगर महानगरपालिकेची पोटनिवडणूक जाहीर

जळगाव प्रतिनिधी | धुळे, अहमदनगर, नांदेड- वाघाळा आणि सांगली-मिरज-कुपवाड या चार महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली आहे.

निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे – दि. 5 डिसेंबर रोजी शासकीय सुट्टीचा अपवाद वगळता 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 दरम्यान नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. 7 डिसेंबरला नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार असून 9 डिसेंबर ही नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.दि. 10 डिसेंबरला निवडणूक चिन्हे वाटप होणार असून दि. 21 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान संपन्न होईल.

महानगरपालिकानिहाय धुळे- 5 ब, अहमदनगर- 9 क, नांदेड वाघाळा- 13 अ व सांगली मिरज कुपवाड- 16 अ.रा या रिक्तपदांवर निवडणूक होणार आहे. 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होणार असून संबंधित प्रभागात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!