कोर्ट

कोर्ट राजकीय

राफेल प्रकरणी पुनर्विचार याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्ट तयार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सुप्रीम कोर्टाने १४ डिसेंबर २०१८ रोजी दिलेल्या निकालात राफेल करारात सरकारच्या निर्णय प्रक्रियेत त्रुटी आढळलेल्या नाही, असे सांगत या कराराच्या चौकशीची मागणी फेटाळली होती. परंतु मोदी सरकारला क्लीन चिट देणाऱ्या या निकालासंदर्भात दाखल झालेल्या पुर्नविचार याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने तयारी दर्शवली आहे.   फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या कराराच्या न्यायालयीन चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या होत्या. त्यावर सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई, न्या. एस के कौल, न्या. के एम जोसेफ यांच्या खंडपीठाने 14 डिसेंबर 2018 रोजी या याचिकांवर निर्णय देत मोदी सरकारला क्लीन चीट दिली होती. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाविरोधात प्रशांत भूषण […]

कोर्ट राष्ट्रीय

453 कोटी जमा करा, अन्यथा तुरुंगात जा; अनिल अंबानींना सुप्रीम कोर्टाचा दणका

नवी दिल्ली (प्रतिनिधी) एरिक्सन इंडिया कंपनीने रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनील अंबानी याच्या विरोधात दाखल केलेल्या अवमानना प्रकरणी सुप्रीम कोर्टाने अनील अंबानी यांना दोषी धरले आहे. अनील अंबानी यांच्यासह रिलायन्स टेलिकॉमचे संचालक सतिश सेठ आणि रिलायन्स इन्फ्राटेलचे अध्यक्ष छाया विरानी यांनी ४ आठवड्यांमध्ये एरिक्सन इंडिया ४५३ कोटी रुपये द्यावेत, असे आदेश सुप्रिम कोर्टाने दिले आहेत. शिवाय महिन्याभरात १ कोटी रुपयांचा दंड न भरल्यास एक महिन्यासाठी तुरुंगात जावे लागेल असेही सुप्रिम कोर्टाने म्हटले आहे. देशातील दूरसंचार जाळे वापरण्यासंदर्भातील व्यवहारापोटी थकीत रक्कम व व्याज मिळून ५५० कोटी रुपये संदर्भात एरिक्सनने रिलायन्स कम्युनिकेशन्सला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. न्या. आर. एफ. नरिमन आणि न्या. […]

कोर्ट क्राईम जळगाव राजकीय

विमानतळ गैरव्यवहारप्रकरणी रायसोनींसह सहा जणांना जामीन मंजूर

जळगाव (प्रतिनिधी) विमानतळ योजनेतील गैरव्यवहार व अनियमितताप्रकरणी दाखल गुन्ह्यात आज प्रदीप रायसोनींसह सहा संशयितांना जामीन मिळाला. याप्रकरणी पूर्वी झालेल्या कामकाजावेळी आठ संशयित गैरहजर राहिल्याने त्यांना न्यायालयाने 14 फेब्रुवारी ही तारीख हजर राहण्यासाठी दिली होती. त्यानुसार सिंधू कोल्हे वगळता इतर सर्व सहा संशयित आज न्यायालयात हजर झाले होते. न्यायमूर्ती बी.जी. गोरे यांच्या न्यायालयात कामकाज होऊन सगळ्यांना वीस हजार रुपये रोख व वीस हजार रुपयांचा जातमुचलका आणि 20 हजारांचा पी.आर.बॉन्ड अशा प्रत्येकी 60 हजार रुपयांच्या रकमेवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. जमीन मंजूर करण्यात आलेल्यांमध्ये प्रदीप रायसोनी, लक्ष्मीकांत तुकाराम चौधरी, चत्रभुज सोमा सोनवणे, मुख्याधिकारी पंढरीनाथ धोंडिबा काळे, धनंजय दयाराम जावळीकर व अटलांटा […]

कोर्ट यावल

यावल वकील संघाचा आंदोलनास पाठींबा

यावल ( प्रतिनिधी) शासनाने वकीलांसाठी कल्याणकारी योजना राबवाव्यात या मागणीसाठी राज्यातील सर्व वकील संघांनी पुकारलेल्या आंदोलनास येथील वकील संघाने आपला पाठींबा एका निवेदनाव्दारे जाहीर केला आहे. या संदर्भात वकील संघाचे अध्यक्ष अॅड. निवृती पी. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार यांना हे निवेदन देण्यात आले आहे. दिल्ली येथे दिनांक २/२/२०१९ रोजी बार काउंलसिल ऑफ इंडीया व उच्च न्यायलय वकील संघ आणि राज्यातील सर्व राज्य वकील परिषद यांनी वकीलांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यासंदर्भात तसा ठराव पारित केला असुन, तशी तरतूद बजेटमध्ये करावी, या मागणीसाठी राष्ट्रीय पातळीवर दिनांक १२/२/२०१९ रोजी आंदोलन छेडले आहे. या मागणीला पाठींबा म्हणुन यावल वकील संघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनावर सचिव […]

कोर्ट राष्ट्रीय

नागेश्वर राव यांना कोर्टाचे कामकाज संपेपर्यंत कोपऱ्यात उभे राहण्याची शिक्षा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बिहारच्या मुजफ्फरपूर शेल्टर होम प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी सीबीआयचे माजी अतिरिक्त संचालक नागेश्वर राव यांना सर्वोच्च न्यायालयाने कामकाज संपेपर्यंत मागे कोपऱ्यात बसण्याची शिक्षा दिली आहे. आज (12 फेब्रुवारी) सुनावणी करताना, सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी नागेश्वर राव यांचा माफीनामा नामंजूर केला. सुप्रीम कोर्टाने नागेश्वर राव यांना एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. कोर्टाने नागेश्वर राव यांच्यासह एस. भसूरण यांनाही एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. “मुजफ्फरपूर शेल्टर होम प्रकरणाच्या तपास पथकात कोणताही बदल होणार नाही. अरुण शर्मा या तपास पथकाचे नेतृत्त्व करतील,” असेही सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. मुजफ्फरपूर शेल्टर होम प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा आदेश होता की, “कोर्टाच्या […]

कोर्ट क्राईम राज्य

मोहसीन शेखच्या हत्येचा आरोपी धनंजय देसाईसह दीडशे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा

पुणे (प्रतिनिधी) जमावबंदी आदेशाचा भंग करुन पुण्यात बेकायदा रॅली काढल्याप्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाई आणि त्याच्या शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगणक अभियंता मोहसीन शेख हत्येप्रकरणी देसाई हा अटकेत होता.नुकताच तो जामीनावर बाहेर आला आहे. सुटका झालेल्या धनंजय देसाईच्या समर्थनार्थ त्याच्या कार्यकर्त्यांनी भगवे झेंडे घेऊन पुण्यात रॅली काढली होती. सोशल मीडियातील आक्षेपार्ह पोस्टमुळे पुण्यात दंगल उसळली होती. या दंगलीत संगणक अभियंता मोहसीन शेख याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईसह 23 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यानंतर 17 जानेवारी 2019 रोजी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर धनंजय देसाईला जामीन मिळाला […]

कोर्ट क्राईम राजकीय राष्ट्रीय

पांड्यांच्या खूनामागील रहस्यामुळेच सोहराबुद्दीन,जज लोयांचा बळी?

जळगाव : विजय वाघमारे  विचार करा…एखादं राज्याच्या माजी गृहमंत्र्याचा दिवसाढवळ्या खुन होतो आणि तरी देखील तपास तंत्रशुद्ध पद्धतीने केला जात नाही. पोलीस काही तासानंतर घटनास्थळी पोहचतात.पंचनामा नावाचा प्रकार देखील नावालाच होतो.घटनास्थळाचे फोटो,व्हीडीओ,ठसे अगदी काहीच रेकॉर्ड तयार केले जात नाही. अगदी प्राथमिक तपास तर इतक्या सुमार दर्ज्याने केला जातो की,कुणालाही संशय आल्याशिवाय राहत नाही. पांड्या यांना कारमध्ये बसलेले असतांना गोळ्या झाडून खून झाल्याचे म्हटले जाते,मात्र गोळ्या लागून देखील कारमध्ये कुठेही रक्ताचा एक थेंब आढळत नाही.दुसरीकडे पोस्टमार्टममध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे म्हटले आहे.याचाच अर्थ खून केल्यानंतरच मृतदेह कारमध्ये ठेवण्यात आला होता,हे स्पष्ट आहे. गुजरात पोलीस आणि सीबीआयच्या तपासानुसार पांड्या यांना कारमध्ये बसलेल्या […]

कोर्ट भुसावळ

भुसावळ वकील संघाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. तुषार पाटील

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ शहर व तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. तुषार पाटील तर उपाध्यक्षपदी अ‍ॅड. धनराज मगर यांची निवड करण्यात आली. भुसावळ तालुका वकील संघाच्या निवडणुकीत ७ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. तर रात्री आठ वाजता निकाल जाहीर झाला. अध्यक्षपदासाठी झालेल्या चौरंगी लढतील तुषार पाटील यांचा ४८ मतांनी विजय झाले. तर उपाध्यक्षपदी धनराज मगर हे तीन मतांनी विजयी झाले. सहसचिव पदावर पुरुषोत्तम पाटील यांनी विजय संपादन केला. तर महिला प्रतिनिधी पद जास्वंदी भंडारी यांनी पटकावले. कोषाध्यक्षपदी राजेश कोळी व ग्रंथपाल पदासाठी संजय तेलगोटे विजयी झाले. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भूपेश बाविस्कर तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून विनोद तायडे, योगेश […]

कोर्ट क्राईम राष्ट्रीय

मुझफ्फरनगर कवाल हत्याकांड प्रकरणात सातही आरोपींना जन्मठेप

लखनऊ (वृत्तसेवा) उत्तर प्रदेशमध्ये २०१३ साली मुझफ्फरनगर येथे झालेल्या दंगलीप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने सात दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मुझम्मिल, मुझस्सिम, फुकरान, नदीम, जहांगिर, अफझल आणि इक्बाल अशी या दोषींची नावे आहेत. मुझफ्फरनगरमधील कवाल या गावात २०१३ साली दंगल झाली होती. या दंगलीत गौरव आणि सचिन या दोघांच्या हत्येप्रकणी कनिष्ठ न्यायालयाने सात जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश हिमांशू भटनागर यांनी हा निर्णय दिला.   ऑगस्ट २०१३ रोजी कवाल या गावात गौरव आणि सचिन या दोघांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली. सरकारी वकील अंजूम खान यांनी सांगितले की, बुलंदशहर कारागृहातून व्हिडिओ […]

कोर्ट

भ्रूणहत्येच्या प्रकरणात मुंडे दाम्पत्याला १० वर्षांची शिक्षा

बीड प्रतिनिधी । अवघ्या राज्याला हादरा देणार्‍या भ्रूण हत्या प्रकरणात परळी येथील डॉ. सुदाम मुंडे आणि त्यांची पत्नी सरस्वती मुंडे यांना बीड जिल्हा न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. धारूर तालुक्यातील महिला विजयमाला पटेकर या महिलेचा १८ मे २०१२ रोजी गर्भपात करीत असताना मृत्यू झाला होता. त्यानंतर या रुग्णालयात सुरू असलेला अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचा धंदा जगासमोर आला होता. या प्रकरणी परळी येथील डॉ.सुदाम मुंडे व डॉ.सरस्वती मुंडे या दाम्पत्यासह १७ आरोपींविरोधात बीड येथील जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू होती. स्त्री भ्रूणहत्या रोखणारा पीसीपीएनडीटी आणि एमटीबी कायद्यानुसार हे तिघेही दोषी ठरले आहेत. भारतीय दंड विधानाच्या ३१२,३१३,३१४,३१५,,तसेच ३१८ एम टी पी […]