एरंडोल

एरंडोल क्राईम

एरंडोलला पेट्रोलपंपावर बंदुकीच्या धाकाने लुटमार

एरंडोल (प्रतिनिधी) येथील राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील एका पेट्रोल पंपावर पिस्तुलाचा धाक दाखवत रोकड लुटल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसांनी तपासचक्र फिरवायला सुरुवात केली आहे. या संदर्भात अधिक असे की, धरणगाव येथील बाबूलाल शहा यांचा एरंडोलपासून साधारण ५ कि.मी अंतरावर नवीन धारागीर गावाजवळ हाय-वे वर एम.जी शहा नावाने पेट्रोल पंप आहे. शुक्रवारी रात्री पेट्रोलपंपावर रवींद्र पाटील व निलेश पाटील हे दोन कर्मचारी नेहमी प्रमाणे कामावर होते. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पेट्रोल भरण्याच्या बहाण्याने आले. त्यानंतर त्यांनी दोघं कर्मचारींना बंदुकीचा धाक दाखवून साधारण ४७ हजाराची रोकड लंपास केली. या घटनेची माहिती मिळताच एरंडोल […]

अमळनेर एरंडोल चाळीसगाव जळगाव राजकीय

जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची पुरती गोची !

जळगाव प्रतिनिधी । आज युतीवर शिक्कामोर्तब झाल्यामुळे जळगाव लोकसभा मतदार संघात दंड थोपटून भाजप समोर उभे असलेल्या शिवसेनेची पुरती गोची झालीय. विशेष करून आर.ओ. पाटील यांच्या राजकीय पुनर्वसाचा प्रश्‍न अधांतरी लटकणार असून जाहीरपणे पंतप्रधान मोदी यांची मिमिक्री करून खिल्ली उडविणारे ना. गुलाबराव पाटील यांना आता मोदींना पंतप्रधान करण्यासाठीच मतं मागावी लागणार आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघात प्रखर भाजप विरोधावर राजकीय आगेकूच करणार्‍या शिवसेनेच्या मातब्बर नेत्यांची युतीमुळे अडचण होणार असल्याचे आता स्पष्टपणे दिसून येत आहे. आर.ओ. तात्यांचे राजकीय पुनर्वसन अधांतरी युतीबाबतच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, युती झाल्यामुळे जळगाव लोकसभा मतदार संघात पूर्ण जोशाने तयारी करणार्‍या शिवसेनेची पुरती गोची झाली आहे. […]

एरंडोल शिक्षण

म.फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारांने विश्वास पाटील सन्मानित

एरंडोल (प्रतिनिधी) येथील शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास हरी पाटील यांना म.फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारांने नुकतेच लातूर येथे सन्मानित करण्यात आले आहे. डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद या शिक्षक संघटनेकडून विश्वास हरी पाटील (शिक्षण विस्तार अधिकारी बिट कासोदा ता एरंडोल) यांना महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने स्वर्गीय दगडोजीराव देशमुख सभागृह लातूर येथे नुकतेच सन्मानित करण्यात आले. औरंगाबाद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे मा कुलुगुरु शिवराज नाकाडे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी विनोद पाटील, डॉ.विलास पाटील,पप्पू पाटील राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ पंजाबराव देशमुख ,शिक्षण विचारवंत प्राचार्य विठ्ठलराव मोरे ,लोकेश पाटील,वसंत नेरकर ,राकेश पाटील आदी उपस्थित […]

एरंडोल क्राईम

गोवंश घेऊन जाणारे वाहन पेटवले;दोन पोलिस कर्मचारी जखमी

एरंडोल (प्रतिनिधी)तालुक्यातील पिंपळगाव प्र.चा. येथे मंगळवारी रात्री पकडलेले गोवंशचे वाहन एरंडोल पोलीस स्थानकात घेऊन जातांना रिंगणगाव-चोरटकी गावाजवळ अज्ञात लोकांनी पेटवून दिल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. यावेळी अज्ञात समाजकंटकांनी पोलिसांवर देखील दगडफेक केली. त्यात दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. या संदर्भात अधिक असे की, तालुक्यातील पिंपळकोठा प्र.चा येथे मंगळवारी रात्री साधारण ९.३० वाजेच्या दरम्यान,एक गोवंश घेऊन जाणारी एक मालवाहू रिक्षा पकडली. गावातील लोकांनी हे वाहन पकडून त्याची हवा सोडली.वाहन चालक मात्र,गाडी सोडून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पो.कॉ.संदीप सातपुते व उमेश पाटील हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी नागरिकांची समजूत काढत वाहन नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यासाठी एरंडोल पोलीस स्टेशनला घेऊन जात होते. परंतु […]

एरंडोल

कौशल्याबाई सोनार यांचे निधन

एरंडोल प्रतिनिधी । येथील देशपांडे गल्लीतील रहिवाशी श्रीमती ग. भा. कौशल्याबाई पुंडलिक सोनार( वय ७५) यांचे आज पहाटे ३:३० वाजता निधन झाले. कौशल्याबाई ह्या न. पा.कर्मचारी संजय पुंडलिक सोनार तथा विजय सोनार,किशोर सोनार यांच्या मातोश्री होत. त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी पाच वाजता राहत्या घरापासून निघणार आहे.त् यांच्या पश्‍चात तीन मुले दोन मुली सुना, नातवंडे असा परिवार आहे.

एरंडोल

कर्जबाजारी शेतकरी पुत्राची आत्महत्या

एरंडोल प्रतिनिधी । सततची नापिकी, कृषिमालाचे घातलेले उत्पन्न यास कंटाळून तीस वर्षीय तरुण शेतकरी पुत्राने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास पिंपळकोठा बुद्रुक येथे घडली. याबाबत माहीती अशी,कि पिंपळकोठा खुर्द येथील चेतन उमेशसिंग पाटील (वय ३०) याने सततची नापिकी व कर्जाला कंटाळून आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.मयत चेतन पाटील याची आई बाहेरगावाला गेलेली असल्यामुळे शेजारी राहणाऱ्या काकु त्यास जेवणासाठी बोलावण्यास गेल्या असता त्याना घराचा दरवाजा बंद आढळून आल्याने हा प्रकार उघडकीस आला. चेतन पाटील यांच्या वडिलांचे सुमारे चार वर्षापूर्वी निधन झाले आहे. मयत चेतन यांच्या आईच्या नावावर चार एकर शेती […]

एरंडोल राजकीय

जळगाव जिल्हा काँग्रेस ओ.बी.सी. जिल्हाध्यक्षपदी योगेश महाजन

एरंडोल ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओ.बी.सी. विभागाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी एरंडोल येथील योगेश युवराज महाजन यांची निवड करण्यात आली आहे. ओबीसी प्रदेशाध्यक्ष प्रमोद मोरे व ओ.बी.सी. कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी शामकांत ईशी यांनी त्यांना निवडीचे पत्र देऊन नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग प्रदेश कार्यकारीणीची बैठक दादर मुंबई येथील टिळक भवनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमोद मोरे, कार्याध्यक्ष अमित कारंडे, प्रदेश उपाध्यक्ष शामकांत ईशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी आगामी निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली व पक्ष बळकटीबाबत आवाहन करण्यात आले. यावेळी जळगाव जिल्हा काँग्रेस ओ..बी.सी.विभागाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी […]

एरंडोल

एरंडोल व रिंगणगाव विभागातील विद्यार्थ्यांनाही मिळणार मोफत पास

एरंडोल प्रतिनिधी । आता एरंडोल आणि रिंगणगाव महसूल विभागातील विद्यार्थ्यांना मोफत पास मिळणार असून यामुळे विद्यार्थ्यांची कधीपासूनची मागणी पूर्ण होणार आहे. शिवसेनेचे तालुका प्रमुख वासुदेव पाटील यांनी नुकतेच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना निवेदन दिले होते. एरंडोल तालुक्यातील उत्राण व कासोदा या महसूल विभागातील विद्यार्थ्यांना मोफत पास योजनेत समाविष्ट करण्यात आले होते. एरंडोल व रिगंणगाव हे दोन महसूल विभाग मात्र ८ जानेवारी रोजी दुष्काळ ग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आल्याने ह्या विभागातील विद्यार्थ्यांना मोफत पास योजनेचा लाभ मिळत नव्हता. यामुळे या विभागातील विद्यार्थ्यांनाही ही सवलत मिळण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली होती. वासुदेव पाटील यांनी या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला. याला […]

एरंडोल शिक्षण

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत निशिता पेंढारकर प्रथम

एरंडोल प्रतिनिधी । राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मु.जे. महाविद्यालयात घेण्यात आलेल्या वकृत्व स्पर्धेत एरंडोल येथील दि.श.विद्यालयाची अकरावीची विद्यार्थीनी निशिता सुधीर पेंढारकर हिने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला. निशिताने उपस्थितासमोर मतदान करणे हि किती महत्वपूर्ण भुमिका असते तसेच मतदार हा कसा राजा आसतो व मतदान करतांना कोणत्या गोष्टी मतदाराने विचार करून मतदान करावे कारण प्रत्येक उमेदवार हा आपली बाजू मतदारांपुढे मांडतो ती खरी आहे की नाही याचा देखील विचार मतदाराने करावा. कुठल्याही अमिषाला बळी पडू नये व आपले अमूल्य मत विचारपूर्वक द्यावे. तसेच निवडणुकी नंतर उमेदवाराने दिलेल्या आश्‍वासनाचा पाठपुरावा करावा. तरच मतदार हा खरा राजा ठरू शकतो असे तिने भाषणातून सांगितले. पाचोरा येथील […]

एरंडोल क्राईम

बस व कारच्या अपघातात एक ठार

एरंडोल प्रतिनिधी । ओव्हरटेकच्या नादात भरधाव वेगाने धावणारी कार बसवर आदळून झालेल्या अपघातामध्ये एक जण ठार तर तीन गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात राष्ट्रीय महामार्गावरील धारागीर गावाजवळ घडला. याबाबत वृत्तांत असा की, माऊंटअबू येथे जाण्यासाठी औरंगाबाद येथून दोन कार एरंडोलमार्गे निघाले होते. यातील एक कार पुढे निघून गेली होती. कार (एमएच २० ईवाय २८६३) धारागीर गावाजवळील साई हॉटेलजवळून जातांना पुढे चालणार्‍या ट्रकला ओव्हरटेक करत पुढे निघण्याचा प्रयत्न करीत असतांना अचानक समोरून येणारी बस क्रमांक एमएच १४ बीटी २०४२ आल्याने कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार सरळ बसवर धडकली. ही दुर्घटना सकाळी १०.२० वाजेच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये कार चालकाच्या […]