घरच्या मागच्या खिडकीचे गज वाकवून अडीच लाखांचा ऐवज लांबविला

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल शहरातील महाजन नगरमध्ये मंगळवारी ७ मे रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील खिडकीचे गज वाकवून सुमारे अडीच लाखाची रोकड व ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एरंडोल येथे महाजन नगर येथे वास्तव्यास असलेल्या मेहरबननाथ सिंधूनाथ सोळंकी (मूर्तिकार) हे मध्य प्रदेशातील रहिवासी यांच्या घरी मंगळवारी ७ मे रोजी रात्री ११. ३० वाजेपर्यंत मूर्ती बनवून झोपी गेले व बुधवारी ८ मे रोजी पहाटे ४ वाजता उठल्यानंतर घराच्या मागील बाजूच्या खिडकीच्या गज वाकलेल्या दिसल्या. किचनमध्ये दोन लोखंडी पेट्या ठेवण्यात आल्या होत्या.त्याही दिसत नसल्याने चोरट्यांनी संपूर्ण घरातील कपड्यांचीही अस्तव्यस्त केली होती.त्यांनी तत्काळ घरमालकाला फोन करून चोरीची माहिती दिली. यात 1 लाख 98 हजार रुपये रोख, 15 हजार रुपये किमतीच्या चांदीच्या बांगड्या आणि 50 हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरीला गेल्याची फिर्याद मेहेरबननाथ सिंधूनाथ सोळंकी यांनी एरंडोल पोलीस ठाण्यात दिली आहे. एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहा.पो. निरीक्षक शरद बागल यांच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे.

Protected Content