मोठी बातमी ! केंद्राने तांदूळ निर्यातबंदी उठवली

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने तांदळाच्या निर्यातीच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे. बासमती नसणाऱ्या तांदूळला सरकारने निर्यातीची परवानगी दिली आहे. मॉरिशस या देशाला भारत १४ हजार टन बिगर बासमती तांदूळ निर्यात करणार आहे. या देशाशिवाय नेपाळ, कॅमेरून, कोटे डी आयव्होर, रिपब्लिक ऑफ गिनी, मलेशिया, फिलीपिन्स, सेशेल्स, संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर, कोमोरोस, मादागास्कर, इक्वेटोरियल गिनी, इजिप्त या देशांमध्ये देखील तांदळाची निर्यात केली जाणार आहे.

तांदळाच्या निर्यातीच्या संदर्भातील माहिती परकीय व्यापार महासंचालनालयाने दिली आहे.तब्बल १० महिन्यानंतर केंद्र सरकारने बिगर बासमची तांदळाच्या निर्यातीवरील बंदी हटवली आहे. जुलै 2023 मध्ये सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. ही बंदी अखेर उटवली आहे. देशांतर्गत गरजा आणि किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. देशांतर्गत किंमती वाढू नये हे सरकारचे उद्दीष्ट आहे. काही काळ तांदळाच्या किंमतीत वाढ झाली होती. ही दरवाढ रोखण्यासाठी सरकारने तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. कारण सर्वसामान्य जनतेला कमी दरात तांदळाची उपलब्धी व्हावी हा यामागचा हेतू आहे.

Protected Content