उपराष्ट्रपती पदी जगदीप धनखड

दिल्ली – लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसंस्था | भारताच्या १६ व्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांनी विरोधकांचे उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव करत बाजी मारली आहे. धनकड यांना ५२८ टक्के मतं तर मार्गारेट अल्वा यांना १८२ मतं मिळाली आहेत.

तब्बल ५२८ मतं मिळवत धनखड यांना पाहिली पसंती मिळाली आहे तर त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना १८२ मते मिळाली. १५ मते बाद झाली. लोकसभा महासचिव उत्पलकुमार सिंग यांनी धनखड यांच्या विजयाची घोषणा अधिकृतरीत्या केली.

लोकसभा आणि राज्यसभा मिळून भाजपचे ३९४ खासदार आहेत. याशिवाय जदयू, अण्णा द्रमुक, लोकजनशक्ती पार्टी, एकनाथ शिंदे समर्थक खासदार, बीजेडी, वायएसआर काँग्रेस, बसपा, अकाली दल, टीडीपी यांचा पाठिंबा असल्यानं जगदीप धनखड यांचं पारडं जड मानलं जात होतं. कागदावर जगदीप धनखड यांना ५२७ खासदारांची मतं मिळणार असल्याचं दिसून येत होतं. एकूण ७२५ खासदारांनी मतदान केलं. ७१० मतं वैध ठरली तर १५ मतं अवैध ठरली.

Protected Content