जामनेर

क्राईम जामनेर

जिल्हा परिषदेचा अभियंता व शिपाई एसीबीच्या जाळ्यात

जळगाव प्रतिनिधी । सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याकडून लाच मागणारा जिल्हा परिषदेचे कनिष्ठ अभियंता व शिपायाविरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुन्हा दाखल केला आहे. जि.प.बांधकाम उपविभागाचा कनिष्ठ अभियंता पी.डी.पवार वय( ५४ रा.प्लॉट क्रमांक २० गौरी पार्क वीर सावरकरनगर पिंप्राळा) असे तर मंगेश गंभीर बेडीस्कर,( वय ३५ रा.प्लॉट क्रमांक ५ पार्वती नगर मोहाडी रोड) असे शिपायाचे नाव आहे. तक्रारदार हा सुशिक्षित बरोजगार अभियंता आहे. नोंदणीकृत सुशिक्षित बरोजगार अभियंत्यांना शासनाची कामे देण्यात येतात. त्यानुसार त्यांना जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयामार्फत काँक्रिटीकरणाचे कंत्राट मिळालेले होते. त्या कामाचे बील मंजूर करण्याच्या मोबदल्यास आरोपी पवार व बेडीस्कर यांनी ११ फेब्रुवारी रोजी पंचासमक्ष ४ हजार ५०० रूपयांच्या […]

जामनेर

पाईपलाईन फोडल्याने पहूर कसबेचा पाणी पुरवठा खंडित

पहूर ता जामनेर प्रतिनिधी । पहूर कसबे गावाला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन समाजकंटकांनी फोडल्यामुळे ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. याबाबत ग्रामपंचायतीने पोलीसात तक्रार नोंदविली आहे. पहू कसबे गावात भिषण पाणी टंचाई निर्माण झाली असून गोगडी धरणातून गावाला पाणी पुरवठा केला जात होता. यंदा डिसेंबर मध्ये च धरणातील पाणी साठा संपूष्टात आल्यामुळे ग्रामपंचायत कडून गावाला सुरळीत पाणी पुरवठा केला जात नाही. तात्पुरत्या स्वरूपात मोतीआई धरणातून पाणी पुरवठा सुरु केला असता अज्ञातांनी पाणी पुरवठा होणारी पाईप लाईन फोडल्याने पुन्हा गावाचा पाणी पुरवठा खंडित झाला आहे. या संदर्भात सरंपच कसबे ज्योती शंकर घोंगडे यांनी पहूर पोलिसांत संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची […]

क्राईम जामनेर

पहुर येथे पेट्रोल पंपाच्या मँनेजरला पिस्तुल दाखवून सहा लाखांची लूट

पहूर ता.जामनेर (रवींद्र लाठे)  पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ आज संपूर्ण गावात दुकाने व बाजारपेठ बंद ठेवण्यात आले होते. या गोष्टीचा फायदा घेत पिस्तुल दाखवून बँकेत भरणा करण्यासाठी जात असलेल्या पेट्रोल पंपाच्या मँनेजरकडून साडेसहा लाखांची रोकड लुटल्याची घटना आज दुपारी घडली. विशेष म्हणजे लोकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. या संदर्भात अधिक असे की, पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ आज संपूर्ण गावात दुकाने व बाजारपेठ बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे गावात बऱ्यापैकी शुकशुकाट होता. येथील अजिंठा टेंडर्स पेट्रोल पंप मॅनेजर संजय पारखे व  सोबत असलेला  कर्मचारी समाधान कुंभार […]

जामनेर सामाजिक

पहूर येथे युवकांचा कँडल मार्च

पहूर ता जामनेर प्रतिनिधी । पुलवामा येथे जवानांवर झालेल्या भ्याड हल्लेच्या निषेधार्थ पेठ व कसबे गावातील युवकांनी कँडल मार्च काढून पहूर बस्थानकावर शोकसभा घेण्यात आली. भारत माता की जय, वंदेमातरम या घोषणा देत सुमारे दोनशे युवकांनी कसबे व पेठ गावातून कँडल मार्च काढला. यादरम्यान पाकिस्तान मुर्दाबादच्याही घोषणा देऊन निषेध व्यक्त केला आहे. कोणतीही भाषणबाजी न करता कमी वेळात शोकसभेत शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र धनगर समाज संघर्ष समिती प्रमुख रामेश्‍वर पाटील, शैलेश पाटील,उपसरपंच रवींद्र मोरे, राजधर पांढरे, अँड एस आर पाटील, शंकर घोंगडे,लक्ष्मण गोरे ,ज्ञानेश्‍वर पवार, संदिप बेढे यांच्या सह […]

जामनेर शिक्षण

पहूर येथे सरस्वती प्ले स्कुलचे स्नेहसंमेलन उत्साहात

पहूर ता.जामनेर ( वार्ताहर) तालुक्यातील सुर्यदीप शिक्षण प्रसारक मंडळ शेंदुर्णी संचलित सरस्वती प्ले स्कूल पहुर शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक व्हावे, यासाठी स्नेहसंमेलन व विविध स्पर्धांमधील विजयी विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन येथील चंदन कुमावत मंगल कार्यालयात नुकतेच करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटन शेंदुर्णी येथील लोकनियुक्त नगराध्यक्षा विजयाताई खलसे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून शेंदुर्णी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा चंदाबाई अग्रवाल, ज्येष्ठ नेते अमृत खलसे, माजी जिल्हापरिषद सदस्य राजधर पांढरे, शेंदुर्णी नगरपालिकेचे नगरसेवक श्याम गुजर, निलेश थोरात, पत्रकार गणेश पांढरे, अंबादास चोपडे व संस्थेचे अध्यक्ष प्रदीप गुजर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला […]

जामनेर शिक्षण

इंग्रजीच्या कृतिपत्रिकेशी मैत्री करा – टी.बी.पांढरे

पहूर, ता. जामनेर ( वार्ताहर ) दहावीच्या विद्यार्थ्यांनी कृतीपत्रिकेशी मैत्री करावी, अर्थात कृतीपत्रिका समजून घ्यावी, बदललेला अभ्यासक्रम आणि मुल्यमापन पद्धती विदयार्थीकेंद्री असून विद्यार्थी व पालकांनी मनातील भीती दूर करावी, असे प्रतिपादन जिल्हा इंग्लिश वेल्फेअर असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी टी.बी. पांढरे यांनी गुरुवारी येथे केले.पहूर येथे आर.टी. लेले विद्यालयात इंग्लिश लर्नर्स क्लब व इंग्लिश टिचर्स वेल्फेअर असोसिएनच्या वतीने आयोजित उद्बोधन वर्गाप्रसंगी ते बोलत होते. सुमारे सव्वातीनशे विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. पुढे बोलताना पांढरे म्हणाले की , कृतिपत्रिकेचा जास्तीत जास्त सराव करावा, वेळेचे नियोजन करावे, सूचना व प्रश्न न लिहीता केवळ उत्तरे लिहावीत. पीपीटीद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक व्ही.जी. […]

जामनेर राजकीय

…म्हणून मला इतक्या ठिकाणाहून निवडणूक लढण्याचे आमंत्रण येत आहेत- ना. महाजन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । अजितदादा म्हणतात बारामतीला ये…किशोरआप्पा म्हणतात पाचोर्‍याला ये…तर गोटे म्हणतात धुळे येथून लढा…यामुळे मला खूपच आमंत्रण येत असल्याचे सांगत आज जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी विरोधकांची खिल्ली उडविली. आज जळगाव येथे झालेल्या भाजपच्या मेळाव्यात ना. गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणातून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, भाजपच्या विजयरथाने विरोधकांना धडकी भरली असून त्यांना यात काही तरी घोटाळा असल्याचे दिसून येत आहे. यातच विरोधकांनी पाचोरा, बारामती, धुळे येथून लढण्याचे आव्हान दिले आहे. आपण हे आव्हान स्वीकारल्याचे ना. गिरीश महाजन म्हणाले. यावेळी त्यांनी उत्तर महाराष्ट्रातील आठ जागांची जबाबदारी आपल्याकडे दिली असून या आठही जागा भाजपच जिंकणार असल्याचा दावा […]

जामनेर सामाजिक

साखर पुड्यातच लग्न : पहुरचे लोढा आणि शिर्डीचा दोशी परिवाराचा आदर्श

पहूर त.जामनेर (वार्ताहर) लग्न म्हटले की, अनेक विधी, परंपरा, खानपान, मानपान अशा अनेक विधी पार पाडत असतांना वधू पित्याला आणि वर पित्याला फार मोठी कसरत करावी लागते. परंतु या सर्व गोष्टींना फाटा देत साखर पुड्यातच लग्न आपटून पहुरचा लोढा परिवार, आणि शिर्डीच्या दोशी परिवाराने एक नवीन आदर्श घालून दिलाय. सविस्तर असे की, पहुर येथील रिखबचंद रायचंद लोढा यांच्या लहान मुलगा महेंद्रकुमार लोढा यांची कन्या दिशा हिचे शिर्डी येथील प्रकाशचंद उत्तमचंद दोशी यांचा मुलगा कमलेश यांच्याशी विवाह ठरला. दि २५ जानेवारी रोजी पहुर येथील राजेंद्र लोढा यांच्या मुलीचे लग्न शिर्डी येथे होते. त्या ठिकाणी कु. दिशा आणि तिचे आजोबा रिखबचंद लोढा […]

क्राईम जामनेर

तरुणीचा विनयभंग; शेंदुर्णीत तणाव

शेंदुर्णी ता.जामनेर ( वार्ताहर) येथे काल ( गुरुवार ) सायंकाळी एका तरुणाने एका तरुणीचा पाठलाग करून हात धरत तिला लज्जा वाटेल, असे कृत्य केल्याने वाद निर्माण झाला होता. सध्या गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून दोन्ही गटात पोलिसात परस्पर विरोधात तक्रारी दिल्या आहेत. दरम्यान मुख्य आरोपीसह काही जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी सायंकाळी घरकाम करणारी एक तरुणी काम आटोपून आपल्या घराकडे परत जात असताना हमीद दादामिया खाटिक याने तिला रस्त्यात अडवून तिचे नाव विचारले व हात धरून तिचा विनयभंग केला. त्यावेळी सदर तरुणीने स्वत:ची सुटका करून घेतली. त्यांनतर ती घराकडे जात असताना हमीद […]

क्राईम जामनेर

पहूरजवळ जुगार अड्ड्यावर छापा; नऊ जणांना अटक

पहूर, ता. जामनेर (वार्ताहर) येथून जवळच असलेल्या हिवरखेडा रोडलगत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी बुधवारी रात्री छापा टाकून नऊ जणांना अटक केली आहे. तसेच पाच हजार पन्नास रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिवरखेडा रोडलगत शेतात जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे, सहाय्यक फौजदार अनिल अहिरे, शशिकांत पाटील, अनिल देवरे, नवल हटकर, किरण शिंपी यांनी बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास छापा टाकला. यावेळी जुगार खेळताना आढळलेल्या केतन प्रकाश जाधव, सागर रामराव पाटील, देवेंद्र सुभाष भोई, ज्ञानेश्वर मोतीलाल चौधरी, विनोद अशोक चौधरी, अरीफ मुखतार तडवी, महेश बाळकृष्ण महालपूरे, अमोल अरूण पाटील, सतीश […]