जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी भाजपला जय श्रीराम केल्यानंतर आज राष्ट्रवादी-शरचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी हातात तुतारी घेतली.
काही दिवसांपूवच जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा जामनेर तालुक्यातील वजनदार नेते म्हणून ख्यात असलेले दिलीप खोडपे सर यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. खोडपे यांनी आपण लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. या अनुषंगाने त्यांनी आज जामनेर येथे आयोजीत कार्यक्रमात हातामध्ये तुतारी घेतली. शिवस्वराज्य यात्रेतील कार्यक्रमात त्यांनी शरद पवार गटात प्रवेश घेतला.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, विद्याथ प्रदेशाध्यक्ष योगेश गव्हाणे, जिल्हा निरिक्षक भास्करराव काळे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत दिलीप खोडपे यांनी या पक्षात प्रवेश घेतला. जयंत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले तेव्हा उपस्थितांना टाळ्यांचा कडकडाट केला. या प्रसंगी आ. जयंत पाटील, खा. अमोल कोल्हे, जिल्हा निरिक्षक भास्करराव काळे, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, रवींद्रभैय्या पाटील, एजाज मलीक, श्रीराम पाटील आदी मान्यवरांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.