रावेर

राजकीय रावेर

शिवसैनिक मातोश्रीचा आदेश पाळणार की नाही ?- खा. खडसे

रावेर (प्रतिनिधी) आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना माझ्यासाठी प्रचाराचे काम करायचे आहे किंवा नाही, ते त्यांनी ठरवावे, हा त्यांच्या इच्छेचा भाग आहे. पण नुकतीच भाजपा सेनेची युती झाली असताना सेनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी मातोश्रीचा आदेशही डावलणार का ? असा प्रश्न खासदार रक्षा खडसे यांनी शिवसैनिकांना केला आहे. खडसे परिवारातील उमेदवार असल्यास आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही, असे शिवसेनेने नुकतेच भुसावळ येथे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. त्यानंतर राज्यात भाजप व शिवसेनेची युती करण्याचा निर्णय झाला आहे. आगामी निवडणुकांचे पडघम दोन्ही पक्षांचे नेते वाजवीत असताना भाजपच्या विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांनी मत व्यक्त केले आहे. शिवसेनेचे लोक सोबत आले तर त्यांना […]

रावेर सामाजिक

रावेर येथील महाजन परिवार देणार दशक्रिया विधीचे पैसे शहीद जवानाच्या कुटुंबास 

रावेर (प्रतिनिधी) येथील सेवानिवृत्त न.पा. कर्मचारी भागवत तुकाराम महाजन यांच्या निधनानंतर त्यांचा दशक्रिया व गंधमुक्ती विधी थोडक्यात करून वाचलेली रक्कम व नातवाच्या पहिल्या पगारातील काही रक्कम असे मिळून ११ हजार रूपयांचा निधी मलकापूर येथील शहीद जवान संजयसिंह राजपूत यांच्या परिवाराला देण्याचा निर्णय येथील महाजन परिवाराने घेतला आहे.   रावेर पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी भागवत तुकाराम महाजन यांचे नुकतेच (दि.११ फेब्रुवारी) रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांचा आज झालेला दशक्रिया विधी व उद्या होणारा गंधमुक्ती कार्यक्रम हा थोडक्यात करून तसेच नुकताच नोकरीस लागलेल्या नातवाच्या पगारातील काही रक्कम मिळून अकरा हजार रूपयांचा निधी काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या […]

क्राईम रावेर

यावलच्या ग्रामीण रूग्णालयात अश्‍लील चाळे करणार्‍याला चोप

यावल प्रतिनिधी । येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये एक कर्मचारी महिलेसोबत अश्‍लिल चाळे करताना आढळल्याने खळबळ नागरिकांनी त्याला बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये एका कर्मचारी मंगळवारी सुटीचा दिवस असल्याने रुग्णालयात आला होता. रुग्णालयामध्ये शांतता होती. मात्र, रुग्णालयात प्रसुतीसाठी महिला आली होती. दरम्यान, रुग्णालयात सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्या खोलीचा आतून दरवाजा बंद आढळून आला. रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या त्या महिलेसोबत आलेल्या काही नागरिकांनी दरवाजा ठोठावला असता एका महिलेसोबत एक व्यक्ती अश्‍लिल चाळे करीत असल्याचे आढळून आले. नागरिकांनी त्याला रंगेहात पकडून चोपले. मात्र गर्दी पाहाताच संबंधित महिलेने तेथून काढता पाय घेतला. नागरिकांनी आरोपीला चांगलाच चोप दिला. नंतर त्याला पोलिसांच्या […]

क्राईम रावेर

रसलपूर येथे दोन गटात हाणामारी

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील रसलपूर येथे एकाच समाजातील दोन गटात हाणामारी झाल्याने तीन जण जखमी झाले असून या प्रकरणी दोन्ही गटातील १२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. रावेर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उमर खान असगर खान रा. रसलपूर यांनी पोलिसात तक्रार दिली की रहदारीच्या रस्त्यात शेळ्या बांधू नकोस असे सांगितल्याच्या कारणावरून भांडण होऊन आरोपी शेख चाँद शेख आमद व वगैरे ६ जणांनी हातात लाठ्या, काठ्या, व लोखंडी टॉमी घेऊन मारहाण करून, फिर्यादी व त्यांच्या सोबत वगैरे सहा जणांना लोखंडी पाईपाने मारहाण केली व शिवीगाळ करून जीवे मारण्याच धमकी दिली. यात असगर खान महेमुद खान हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सावदा […]

भुसावळ राजकीय रावेर

रावेर लोकसभा मतदारसंघात हिशोब चुकता कसा होणार ?

जळगाव प्रतिनिधी । एकमेकांविरूध्द टोकाच्या लढाईच्या वल्गना करणार्‍या शिवसेना व भाजपची अखेर युती झाली असली तरी स्थानिक पातळीवर या दोन्ही पक्षाच्या नेत्यांची दुभंगलेली मने कशी सांधली जाणार हा खरा प्रश्‍न आहे. तसेच रावेर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला असला तरी आता युती झाल्यामुळे लोकसभा आणि त्यापश्‍चातच्या विधानसभा निवडणुकीत हिशोब नेमका कसा चुकता होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक शिवसैनिकांच्या भूमिकेकडे लक्ष तब्बल २५ वर्षांपर्यंत अक्षरश: खांद्याला खांदा लाऊन आगेकूच करणार्‍या शिवसेना व भाजपमधील मैत्रीला पाच वर्षांपूर्वी नजर लागली. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत बहुमतामुळे आत्मविश्‍वास दुणावलेल्या भाजपने विधानसभेत युती न करण्याचा निर्णय घेतला. अर्थात, निवडणुकीनंतर दोन्ही पक्ष एकत्र सत्तेत […]

रावेर सामाजिक

रावेरात बंदच्या माध्यमातून शहिदांना श्रध्दांजली

रावेर प्रतिनिधी । पुलवामा येथील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज रावेर शहर कडकडीत बंद ठेवण्यात आला असून या माध्यमातून शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या बाबत वृत्त असे आज सकाळपासूनच रावेर बाजारपेठ बंद असून शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, मेन रोड, गांधी चौक, आठवडे बाजार आदींसह इतर ठिकाणची दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद करून घटनेचा निषेध करण्यात आला. तर अनेक ठिकाणी निषेध सभा, शोक सभा आयोजन करून सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली बाजार समितीत शोकसभा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शोकसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी सचिव गोपाळ महाजन उपसचिव संतोष तायडे रोहिदास बाविस्कर भागवत अलंकार जयवंत पाटील शरद पाटील अरुण महाजन गोकुळ पाटील, […]

रावेर

तूर खरेदीला अल्प प्रतिसाद

रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यात तूर खरेदी केंद्राला शेतकर्‍यांकडून अपेक्षित प्रतिसाद दिसत नसल्याचे दिसून येत आहे. येथील तूर खरेदी केंद्र सुरु होऊन आठ दिवस उलटले आहे आता पर्यंत ५१ शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. राज्य सरकारने तुरीला ५६७५ रुपये भाव दिला असून खाजगी व्यापारी तुरीला ५२०० रुपयां पर्यंत भाव देत आहेत. त्यात मागील वर्षी हेक्टरी १० क्विंटल प्रमाणे खरेदी केली जात होती तर यंदा मात्र फॅक्टरी चार क्विंटल ७० किलो प्रमाणे शेतकर्‍यांकडून तूर खरेदी केली जात आहे त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये प्रचंड निराशा असून हेक्टरची मर्यादा वाढवण्याची मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.

राजकीय रावेर

प्रकाश आंबेडकरांनी रावेर मधून घोषित केला आपला उमेदवार

जळगाव (प्रतिनिधी) मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक मोर्चा काढले, तरीसुध्दा त्यांचा एकही मराठा नेता असे म्हणत नाही की, 16 टक्के व 27 टक्के आरक्षण वेगळे आहेत. त्यामुळे ओबीसीच्या मनात शंका निर्माण झाली आहे. ज्याची काठी त्याची म्हैस त्यामुळेच ओबीसीने स्वतंत्र लढा सुरू केला आहे. 27 टक्के अ व 16 टक्के ब असे म्हणण्याची हिम्मत सध्याच्या सरकारमध्ये नाही. त्यांना झुंज लावण्यात रस असतो. कधी याची तर त्याची बाजु घेवून आपली सत्ता ते कायम ठेवतात, असे प्रतिपादन मुक्ताईनगर येथे झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या सभेत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. यावेळी सर्वप्रथम त्यांनी रावेर लोकसभेचे उमेदवार म्हणुन नितीन कांडेलकर यांची उमेदवारी त्यांनी जाहीर केली. […]

यावल रावेर सामाजिक

सातपुड्याचे वैभव जपण्यासाठी आदिवासी बांधवांचे योगदान महत्वाचे – राजेंद्र राणे

रावेर (प्रतिनिधी) रावेर व यावल तालुक्यात पर्यावरण संवर्धन करण्यासाठी सातपुडा पर्वताची महत्वाची भूमिका असून या सातपुड्याचे वैभव टिकवून ठेवण्यासाठी सर्व आदिवासी बांधवांचे योगदान अत्यंत महत्वाचे असल्याचे प्रतिपादन प्र.सहाय्यक वनसंरक्षक राजेंद्र राणे यांनी कुसुंबा येथील कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात बोलतांना केले. वन विभागाच्या शासन निर्णयानुसार जंगलावरील भार कमी होण्यासाठी कुसुंबा येथील संयूक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत सातपुडा पर्वताच्या लगत असलेल्या गावातील नागरिकांना घरगुती गॅस संचांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात अध्यक्षपदी राजेंद्र राणे हे होते, तर गॅस संच वाटप तहसीलदार विजयकुमार ढगे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी श्री. राणे पुढे म्हणाले की, पर्यावरण संरक्षणासाठी जल, जमीन आणि जंगल यांचे महत्त्व असून त्याचे […]

राजकीय रावेर

‘ती’ कामे तुमचीच हे सिध्द करा- हरीभाऊ जावळे यांचे आव्हान

रावेर प्रतिनिधी । मतदारसंघामध्ये केलेली कामे आघाडी सरकारच्या काळातील असल्याचे विरोधकांनी सिध्द करून दाखवावे असे खुले आव्हान आमदार हरीभाऊ जावळे यांनी आज दिले. राष्ट्रवादी किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आमदार हरीभाऊ जावळे आणि खासदार रक्षाताई खडसे यांच्यावर आरोप केले होते. आघाडी सरकारच्या कालखंडात झालेली कामे दाखवून हे दोन्ही मान्यवर जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. तसेच हरीभाऊ जावळे यांनी मतदारसंघात विकासकामांबाबत केलेल्या दाव्यांवरही त्यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. या पार्श्‍वभूमिवर, आज रावेर येथे आयोजित केलेल्या बैठकीत आमदार जावळे यांनी विरोधकांना धारेवर धरले. संबंधीत कामे ही आघाडी सरकारच्या कालखंडात झाले असतील तर […]