जळगाव प्रतिनिधी । सचित्र छायाचित्रांसह जिल्ह्याच्या सर्वांगीण माहितीचा समावेश असलेल्या जळगाव जिल्हा कॉफी टेबल बुकचे प्रकाशन आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी करण्यात आले. यांची होती उपस्थिती याप्रसंगी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स व्यवसाय मंत्री महादेव जानकर, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव तथा जळगाव जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर उपस्थित होते. जळगाव जिल्हा कॉफी टेबल बुकमध्ये जिल्ह्याची सर्वांगीण माहिती देणारे विविध आठ विभाग असून यामध्ये १७० विषयांची हाय रिझोल्युशनची रंगीत छायाचित्रे आणि महत्त्वपूर्ण माहिती आहे. वर्षभराचे परिश्रम कॉफी टेबल बुकच्या कव्हरपेजवर कटआऊटसह अक्षरांच्या उठावाने लक्षवेधून घेणार्या या १८० पानी कॉफी टेबल बूकमधील आशय आणि छायाचित्रांची मांडणी […]
