जळगाव

जळगाव राजकीय

काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी दिपक बाविस्कर

जळगाव (प्रतिनिधी) शहर जिल्हाअध्यक्ष डाँ.राधेश्याम चौधरी यांच्या शिफारसीने ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद मोरे यांनी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी दिपक बाविस्कर यांची नियुक्ती केली आहे. दिपक बाविस्कर यांनी सामाजिक राजकीय विविध पदे भूषविले आहे. ते महाराष्ट्र परीट धोबी महासंघ या संघटनेचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष आहेत. तसेच संत श्री गाडगेबाबा बहुउद्देशिय संस्था जळगाव या सामाजिक संस्थेचे प्रसिध्दी प्रमुख असून मागील पंधरा वर्षां पासून पत्रकारिता करत आहेत. जळगाव शहर महानगर पालिका सार्वत्रिक निवडणूकीत त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी लढविली आहे. दुसरीकडे चेतन कासलीवाल (MBA finance) यांची जळगाव शहर जिल्हा काँग्रेसच्या सोशल मिडीया सेलच्या समन्वयकपदी तर रियाज शेख (B. E.) यांची सहसमन्वयकपदी नियूक्ति कॉंग्रेस सोशल मिडीया […]

जळगाव शिक्षण

कॉप्यांसाठी कायपण…! बारावीच्या पहिल्याच पेपरला कॉप्यांचा सुळसुळाट

जळगाव प्रतिनिधी । कॉपीला अटकाव करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या तरी बारावीच्या पहिल्याच पेपरला अनेक केंद्रांवर उघडपणे कॉप्यांचा सुळसुळाट दिसून आला. आजपासून बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. परिक्षांमध्ये कॉपी हा सर्वात महत्वाचा मुद्दा असतो. या अनुषंगाने बारावीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र याची तमा न बाळगता अनेक ठिकाणी सर्रास कॉप्या करण्यात आल्याचे दिसून आले आहे. काही परीक्षा केंद्रांवर तर अगदी उघडपणे कॉप्या पुरवण्यासाठी अनेकांचा आटापीटा दिसून आला. पहिल्याच दिवशी भरारी पथकांनी १४ विद्यार्थ्यांना डिबार केले. मात्र बर्‍याचशा केंद्रांवर अगदी उघडपणे कॉप्यांचा पाऊस पडल्याचे दिसून आले. जळगाव शहरातील एका महाविद्यालयात कॉपीसाठी आटापीटा करणारा तरूण छायाचित्रात दिसून […]

क्राईम जळगाव

‘त्या’ रुग्णालयात आयकर विभाकडून झाडाझडती सुरूच

जळगाव (प्रतिनिधी) बुधवारी सकाळी ८ वाजेपासून शहरातील रुग्णालय,लॅब,डायग्नोस्टिक सेंटर अशा एकूण आठ ठिकाणी आयकर विभाकडून एकाच वेळेस धाडी टाकण्यात आल्या होत्या. आज दुपारी १ वाजेपर्यंत म्हणजेच तब्बल २८ तासापासून झाडाझडती सुरूच आहे. दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशी देखील आयकार विभागाकडून तपासणी केली जात असल्यामुळे या कारवाईचे गांभीर्य वाढले आहे.   राज्य आयकर विभागाच्या मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद व नागपूर येथील पथकांनी बुधवारी जळगाव शहरातील आठ रुग्णालये, पॅथॉलाॅजी लॅबसह डायग्नोस्टीक सेंटर्सवर सशस्त्र पोलिस बंदोबस्तात धाडी टाकून झाडाझडती घ्यायला सुरुवात केली होती. त्यात मू. जे. महाविद्यालय रस्त्यालगतचे डॉ. विकास बोरोले यांचे नेत्रम हॉस्पिटल, भास्कर मार्केटमधील डॉ. सुनील नाहाटा यांचे वर्धमान अॅक्सिडेंट हॉस्पिटल, इंडो-अमेरिकन […]

जळगाव राजकीय

मुख्यमंत्री जळगावहून धरणगावला रवाना

जळगाव (प्रतिनिधी) धरणगाव व भुसावळ येथील विविध कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जळगाव विमानतळावर सकाळी ११:१५ वाजेला आगमन झाले. दरम्यान,थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने धरणगावला रवाना झाले आहेत.   मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे,पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, महापौर सिमाताई भोळे, आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. बी. एन. पाटील, महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी केले. धरणगाव येथिल जनजाती मेळाव्यास संघाचे सरकार्यवाहक भय्याजी जोशी हे मार्गदर्शन करणार असून या कार्यक्रमला मुख्यमंत्री फडणवीस हे प्रमुख अतिथी आहेत. यावेळी क्रांतिकारी खाजा नाईक यांना अभिवादन करण्यात येणार आहे.

जळगाव राजकीय

Exclusive : भाजपचे धक्कातंत्र…अभियंता प्रकाश पाटील यांना मिळणार जळगावची उमेदवारी !

जळगाव प्रतिनिधी । बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमिवर जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे तिकिट हे अभियंता प्रकाश पाटील यांना मिळणार असल्याचे निश्‍चीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप श्रेष्ठींनी या धक्कातंत्राला मंजुरी दिल्याचे समजते. राजकीय स्थितीत बदल जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदार अर्थात ए.टी. पाटील आणि रक्षाताई खडसे यांना भाजपचे पुन्हा तिकिट मिळणार असल्याचे निश्‍चित मानले जात होते. यापैकी रक्षाताई खडसे यांच्या नावाला तर पक्षातून कुणाचा विरोधदेखील नसला तरी ए.टी. पाटील यांच्याऐवजी अन्य नेत्यांनी उत्सुकता दाखविली होती. यात पक्षाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ व चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांच्या नावाचा समावेश होता. यात जळगाव येथील अभियंता प्रकाश पाटील यांचे नावदेखील […]

जळगाव

अकरा तासापासून आयकर खात्याकडून झाडाझडती सुरूच ! (व्हिडीओ)

जळगाव (प्रतिनिधी) आज सकाळपासून शहरातील सात वैद्यकीय व्यावसायिकांवर एकाच वेळेस धाडी टाकण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, ईडीच्या नोटीसांना संबंधितांकडून समाधाकरण उत्तर न मिळाल्यास अशा प्रकारचे धाडसत्र राबविण्यात येत असते,असे जाणकारांचे म्हणणे आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, औरंगाबाद येथील आयकर खात्याच्या पथकांनी शहरातील सात हॉस्पीटल्सवर एकाच वेळी धाडी टाकल्या. या संदर्भात सूत्रांनी माहिती दिली की, जळगाव शहरातील सात ख्यातप्राप्त वैद्यकीय व्यावसायिकांवर धाडी टाकण्यासाठी नाशिक आणि धुळे येथील पथकांना पाचारण करण्यात आले होते. आज सकाळी नऊच्या सुमारास ही पथके पहिल्यांदा आयकर खात्याच्या कार्यालयात आले. यानंतर आयएमआर महाविद्यालयाच्या मैदानावर ही पथके आली. येथेच त्यांना नेमक्या कोणत्या हॉस्पीटल्सवर […]

अर्थ जळगाव

जळगाव महापालिकेचा २३१ कोटींचा शिलकी अर्थसंकल्प सादर

जळगाव (प्रतिनिधी) महानगरपालिकेचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी विशेष स्थायी समिती सभेत सन २०१९-२०२० साठी १११७ कोटी ४६ लाख ३४ हजार रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. कुठलीही करवाढ या अंदाजपत्रकात सुचवण्यात आलेली नाही. २३० कोटी ९२ लाख रुपये शिलकीचे हे अंदाजपत्रक आहे. अमृत योजनांचा निधी व मुख्यमंत्री यांनी दिलेल्या निधीमुळे अंदाजपत्रकाची रक्कम वाढली आहे. आज (बुधवारी) स्थायी समितीची सभा सभापती जितेंद्र मराठे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी मनपा प्रभारी आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी अंदाजपत्रक सादर केले. यावेळी व्यासपीठावर उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, नगरसचिव सुनील गोराणे हे उपस्थित होते. महापालिकेचे अंदाजपत्रकात प्रारंभीची शिल्लक २३० कोटी ९२ लाख इतकी आहे. त्यात प्रत्यक्षात महापालिकेचे उत्पन्न २८० […]

जळगाव सामाजिक

भौतिक साधनांचा अतिरेकी वापरच नकारात्मक वृत्तीस वाढीस लावतो : ब्र.कु. मिनाक्षीदीदी

जळगाव (प्रतिनिधी) आज सर्व जग साधनांच्या अधिन झालेले असून स्व-साधना विसरलेले आहे. त्यास कारण भौतिक साधनांना अतिरिक्त महत्व देणे होय. साधने वापरा परंतु त्यांना मानवीय संवेदनांपेक्षा जास्त महत्व देऊ नका हीच सकारात्मक जीवन शैलीची गुरु किल्ली होय. त्यासाठी राजयोग ध्यानाभ्यास अत्यंत लाभदायी ठरते, असे प्रतिपादन राष्ट्रीय आयुष अभियान महाराष्ट्र आणि ब्रह्माकुमारीज् वैद्यकिय प्रभागामार्फत मानसिक स्वास्थ्य आणि राजयोग ध्यानाभ्यास कार्यशाळेत ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत मेडिटेशन वर्कशॉप फॉर हेल्थ केअर प्रोव्हायडर्स या उपक्रमातर्गत शासकीय अधिकारी व कर्मचा­यांसाठी मानसिक स्वास्थ्य व राजयोग मेडिटेशन या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत आरोग्य अधिकारी व कर्मचा­यांचे मानसिक बळ वाढविणे […]

जळगाव

आसोदा रेल्वे गेट बंद : परिसरातील ग्रामस्थांचे हाल ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । आसोदा रेल्वे गेट आज सकाळपासून दोन दिवसांसाठी बंद झाल्यामुळे येथून ये-जा करणार्‍या परिसरातील ग्रामस्थांचे हाल होत असल्याचे दिसून येत आहे. रेल्वे प्रशासनाने दोन दिवसांसाठी आसोदा रेल्वे गेट बंद राहणार असल्याचे आधीच जाहीर केले होते. यानुसार आज सकाळपासून हे गेट बंद करण्यात आले आहे. यात आसोदा आणि भादली या मोठ्या गावांसह परिसरातील तब्बल १२ गावांमधील ग्रामस्थांची ये-जा असते. आता गेटच बंद करण्यात आल्यामुळे हजारो ग्रामस्थांचे हाल होतांना दिसून येत आहेत. दोन्ही बाजूला अनेक वाहनधारक उभे असल्याचे दिसून आले. तर काही पादचर्‍यांनी जीव धोक्यात घालून पायी रेल्वे रूळ ओलांडण्याचा धोका पत्करला. दरम्यान, ग्रामस्थांना जळगावला येण्यासाठी पर्यायी रस्ता असला तरी […]

आरोग्य जळगाव

‘त्या’ वैद्यकीय व्यावसायिकांची इन्कम टॅक्सच्या पथकांकडून कसून चौकशी

जळगावात एकाच वेळेस टाकण्यात आल्या आयकर खात्याच्या धाडी जळगाव प्रतिनिधी । आज सकाळपासून शहरातील सात वैद्यकीय व्यावसायिकांवर एकाच वेळेस धाडी टाकण्यात आल्या असून त्यांची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत आयकर खात्याच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, आयकर खात्याच्या पथकांनी शहरातील काही हॉस्पीटल्सवर धाडी टाकण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात सूत्रांनी माहिती दिली की, जळगाव शहरातील सात ख्यातप्राप्त वैद्यकीय व्यावसायिकांवर धाडी टाकण्यासाठी नाशिक आणि धुळे येथील पथकांना पाचारण करण्यात आले होते. आज सकाळी नऊच्या सुमारास ही पथके पहिल्यांदा आयकर खात्याच्या कार्यालयात आले. यानंतर आयएमआर महाविद्यालयाच्या मैदानावर ही पथके आली. येथेच त्यांना नेमक्या कोणत्या हॉस्पीटल्सवर धाडी टाकावयाच्या […]