Home Cities जळगाव आदर्श शिक्षक किरण पाटील यांचा राज्यस्तरीय सन्मान 

आदर्श शिक्षक किरण पाटील यांचा राज्यस्तरीय सन्मान 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावातील कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलचे आदर्श शिक्षक किरण विठ्ठल पाटील यांना राज्यस्तरीय सन्मानपत्राने गौरविण्यात आल्याने शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड, नागपूर यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र राज्यस्तरीय अष्टाक्षरी काव्यस्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत साहित्यिक अभिव्यक्तीचा ठसा उमटविल्याबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला. या यशामुळे जळगावच्या शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड, नागपूर यांच्या वतीने यावर्षी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्यस्तरीय अष्टाक्षरी काव्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ११ एप्रिल महात्मा फुले जयंती आणि १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्याने पार पडलेल्या या स्पर्धेला राज्यभरातून साहित्यप्रेमी आणि कवींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या स्पर्धेमध्ये जळगाव येथील शिक्षक किरण विठ्ठल पाटील यांनी उत्साहाने सहभाग घेत आपल्या साहित्यिक लेखणीतून सामाजिक जाणीवा, प्रेरणादायी विचार आणि परिवर्तनवादी मूल्ये प्रभावीपणे मांडली. त्यांच्या सहभागाची दखल घेत अखिल भारतीय सावित्री ब्रिगेडच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानदानाचे कार्य करत असताना साहित्याच्या माध्यमातून सामाजिक आणि वैचारिक प्रबोधन करण्याचे कार्यही किरण पाटील सातत्याने करत असतात. शिक्षण आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रांमध्ये सक्रिय योगदान देणाऱ्या पाटील यांच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

या सन्मानप्रसंगी अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड, नागपूर महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. स्मिता मेहेत्रे, समूह प्रमुख महेश भामरे, संचालक समितीच्या डॉ. शितल बागडे, सौ. प्रणोती कळमकर तसेच परीक्षक निमा बोडखे यांनी किरण पाटील यांचे अभिनंदन करत त्यांच्या साहित्यिक वाटचालीचे कौतुक केले. पुढील काळातही साहित्य क्षेत्रात अशीच प्रभावी वाटचाल कायम राहो, अशा शुभेच्छाही मान्यवरांनी दिल्या.

जळगावमधील शिक्षकाला मिळालेल्या या राज्यस्तरीय गौरवामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षक वर्गामध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्ञान, संस्कार आणि साहित्य यांचा समतोल साधत समाजात सकारात्मक विचार रुजविणाऱ्या शिक्षकांचा सन्मान होणे ही जळगावसाठी अभिमानाची बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound