धरणगाव

धरणगाव सामाजिक

धरणगाव येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती उत्साहात

धरणगाव (प्रतिनिधी) येथे थोर समाजसुधारक स्वच्छता अभियानाचे जनक राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची १४३ वी जयंती मोठ्या उत्साहात विविध ठिकाणी साजरी करण्यात आली. तसेच नगरपालिकेतर्फे प्रशासकीय इमारत सभागृहातील कार्यक्रमात प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी यांनी संत गाडगे महाराज याचा प्रतिमेस माल्यार्पण केले. यावेळी भाजपा गटनेते कैलास माळी व माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील यांनी गाडगेबाबा यांचा स्वच्छता संदेश घरोघरी पोहचवा असे प्रतिपादन केले. यावेळी उपस्थित चर्मकार समाजाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, विजय महाजन, नूतन विकास सोसायटी नवनिर्वाचित चेअरमन धीरेंद्र पुरभे, नगरसेवक भागवत चौधरी, सुरेश महाजन, विलास महाजन, नंदू पाटिल, परिट समाजचे प्रांत सदस्य छोटू जाधव, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख विनोद रोकडे, शिवसेना उपशहर प्रमुख रवींद्र […]

धरणगाव सामाजिक

धीरेंद्र पुरभे यांचा परिट समाजातर्फे सत्कार

धरणगाव (प्रतिनिधी) येथील नूतन विकास सोसायटीच्या चेअरमनपदी शिवसेनेचे शहर संघटक धीरेंद्र पुरभे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा परीट समाजातर्फे नुकताच सत्कार करण्यात आला. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झालेल्या या सत्कार प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, शिरीष बयस, नूतन सोसायटी संचालक निलेश चौधरी, राजेंद्र महाजन, भगवान महाजन, शैलेंद्र चंदेल व सर्व सचालक उपस्थित होते.

जळगाव धरणगाव राजकीय

मुख्यमंत्र्यांनी वाहनात बसवुन केली राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा !

धरणगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील धरणगाव येथे दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. स्वागत झाल्यावर नियोजित कार्यक्रमासाठी जात असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी “माझ्यासोबत वाहनात या ” असे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांना सांगितले. प्रवासादरम्यान दोघांमध्ये जळगाव जिल्हा व मतदारसंघातील विविध विकास कामांबाबत चर्चाही झाली. ना .गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील पालकमंत्री शेत पाणंद रस्त्या साठी शेतकऱ्यांच्या व ग्रामपंचायतीच्या वाढत्या मागणीनुसार जिल्ह्यासाठी शेतरस्त्यांसाठी कमीत कमी 60 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करणे. पर्यटन विकास योजनेअंतर्गत धरणगाव येथील बालकवी ठोंबरे स्मारक व परिसर विकासासाठी पाच कोटी रुपये निधी मंजूर करणे. नशिराबाद ग्रामपंचायतीचे नगरपंचायती मध्ये रुपांतर करण्याचा परिपूर्ण प्रस्ताव शासना कडे […]

धरणगाव सामाजिक

धरणगावात छत्रपती शिवाजी महाराज व संत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी

धरणगाव (प्रतिनिधी) छत्रपती शिवराय व संत रविदास जयंती उत्सवानिमित्त धरणगाव शहरात उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण पाहावयास मिळाले.बालाजी महाराज व महापुरुषांच्या प्रतिमेच्या पूजनाने रॅलीची सुरुवात मान्यवर व शिवजयंती उत्सव समिती धरणगावच्या पदाधिकाऱ्यांनी केली.   बालाजी मंदिर , धरणी चौक , कोट बाजार , लांडगे गल्ली , परीहार चौक , शिवराय स्मारक , डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते पुन्हा छत्रपती शिवराय स्मारक असा रॅलीचा मार्ग होता.छत्रपती शिवराय व संत रविदास यांच्या प्रतिमेचे ट्रॅक्टर , बग्गीवर माँसाहेब जिजाऊ व बाल शिवराय यांचा सजीव देखावा , घोड्यावर शिवराय व त्यांच्यासोबत मावळे यांचा सजीव देखावा , महिलांचे पथक , महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे झेंडा पथक , ढोल […]

धरणगाव

बोराडी येथे विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बोराडी येथे २१ वर्षीय तरुणाचा आज सकाळी विजेचा धक्का लागून अकस्मात मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली होती. आकाश नितीन जाधव असे मृत तरुणाचे नाव असून त्याला एक लहान भाऊ व बहिण आहे.

धरणगाव राजकीय

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृतिकेंद्राच्या आराखड्याला मंजुरी: देवेंद्र फडणवीस

धरणगाव (प्रतिनिधी)  येथे उभारण्यात येणाऱ्या क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृतीकेंद्रासाठी तयार करण्यात आलेल्या 15 कोटीच्या आराखड्यास मंजुरी देण्यात येत असून या केंद्राच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचविण्यात यावी. सुशिक्षित आणि सक्षम युवापिढी घडविण्यासाठी क्रांतिकारी आणि प्रेरणादायी विचार समाजापर्यंत पोहोचविले जावे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दरम्यान, हेलीपॅडवर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. धरणगाव येथे क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृतीसंस्थेतर्फे आयोजित जनजाती मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक सह कार्यवाहक भैयाजी जोशी, श्री. नायराणस्वामी, संस्थेचे अध्यक्ष श्री. भाईदास सोनवणे आदी उपस्थित होते. श्री. फडणवीस म्हणाले, क्रांतीकारी खाज्याजी नाईक यांनी इंग्रजांचा […]

धरणगाव राजकीय सामाजिक

आदिवासी बांधवांसाठी राज्य सरकारचे मोठे काम- मुख्यमंत्री

धरणगाव (प्रतिनिधी) इंग्रजांशी अखेरच्या श्वासापर्यंत लढा देणारे खाज्याजी नाईक यांनी इंग्रजांचा व्यापार उद्वस्त करण्याची कामगिरी केली होती. त्यांचे धरणगावात स्मारक व्हावे ही सगळ्यांची इच्छा होती. त्यानुसार आज या स्मारकाची पायाभरणी होत आहे. गेल्या ५० वर्षात सरकारने जेवढे आदिवासी बांधवांसाठी केले नसेल तेवढे या सरकारने गेल्या साडेचार वर्षात केले आहे. केवळ आश्वासने न देता त्यांच्यासाठी विविध योजना राबवून प्रत्यक्ष काम करून दाखवले आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. आज ते येथील खाज्याजी नाईक स्मृति संस्थेतर्फे आयोजित भव्य जनजागृती मेळाव्यात बोलत होते. या कार्यक्रमाला रा.स्व. संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशीही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते यावेळी म्हणाले की, […]

धरणगाव राजकीय सामाजिक

धरणगावच्या जनजाती मेळाव्यास प्रारंभ

धरणगाव (प्रतिनिधी) येथिल जनजाती मेळाव्याच्या कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहचलेले आहेत. यावेळी संघाचे भय्याजी जोशी आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली आहे. एरंडोल रोडवर तयार करण्यात आलेल्या हेलीपॅडवर मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले. यावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी जळगावच्या विमानतळावर मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे,पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, महापौर सिमाताई भोळे, आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. बी. एन. पाटील, महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी केले. धरणगाव येथिल जनजाती मेळाव्यास संघाचे सरकार्यवाहक भय्याजी जोशी हे मार्गदर्शन करणार आहेत. सभेच्या स्थळी प्रचंड गर्दी आहे. यावेळी व्यासपिठावर संघाचे बाळासाहेब चौधरीयांच्यासह मोजकीच मंडळी होती. उपस्थित मान्यवरांसह […]

धरणगाव सामाजिक

खाजा नाईक : एक उपेक्षीत भिल्ल क्रांतिकारी !

जळगाव : विजय वाघमारे  11 एप्रिल 1858 चा दिवस…तत्कालीन खान्देशातील शिरपूर जवळील अंबापाणी नावाचे जंगल, ब्रिटीश सरकारचे अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज सैनिक, चहुबाजूने घातलेला घेराव अशा कठीण परिस्थितीत ब्रिटीश सैन्याला दिवसभर झुंजवत त्यांचे अधिकारी व सैनिक ठार मारत, भिल्ल समाजातील महिला-पुरुषांनी लढा दिला. या लढाईचे नेतृत्व करणार्या खाजा नाईक यांच्यावर कालांतराने चवताळलेल्या ब्रिटीशांनी दोन हजारांचे बक्षीस ठेवले.1860 मध्ये विश्‍वासघाताने पाठीत गोळ्या घालून या क्रांतीवीराची हत्या करण्यात आली व धरणगावच्या मुख्य प्रवेश रस्त्यावरील झाडाला त्यांचे शिर तब्बल सात दिवस लटकविण्यात आले. खान्देशातील भिल्ल समाजाच्या हा क्रांतीकारी वीर तसेच अंबापाणी लढाईत भिल्ल समाजातील महिला-पुरुषांनी दाखवलेले शौर्य इतिहासकारांनी तसे उपेक्षीतच ठेवले,असे म्हटले तर चुकीचे […]

धरणगाव शिक्षण सामाजिक

बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात शिवजयंती साजरी

धरणगाव (प्रातिनिधी) येथील बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात आज रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रतिमेचे पूजन प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. विक्रमादित्य पाटील यांनी केले.यावेळी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. एस.एस.पाटील तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सांस्कृतिक प्रमुख परमेश्वर रोकडे यांनी केले.