Home Cities धरणगाव राज्य पत्रकार संघाच्या धरणगाव शहराध्यक्षपदी अविनाश बाविस्कर

राज्य पत्रकार संघाच्या धरणगाव शहराध्यक्षपदी अविनाश बाविस्कर

0
136

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा परखड पत्रकार अविनाश बाविस्कर यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या धरणगाव शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

अविनाश बाविस्कर यांचा पत्रकारिता क्षेत्रात परखड अनुभव तसेच संघटनेत सदस्य म्हणून केलेल्या कामांचा आढावा घेत राज्य अध्यक्ष वसंत मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे, प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष भूषण महाजन यांनी त्यांची नियुक्ती केली. या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष गोपाल सोनवणे, तालुका अध्यक्ष धर्मराज मोरे,किरण सोनवणे, राजेंद्र रडे उपस्थित होते.


Protected Content

Play sound