सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर आणि यावल तालुक्यातील गावांना कृतज्ञता संवाद यात्रा माध्यमातून गावागावातील ग्रामस्थाना भेटून आनंद वाटला आणि आपला परिसर इतर पर्यटन स्थळांपेक्षा सुंदर आहे त्यांचा पर्यटन विकास व्हावा यासाठी अधिक सक्षमपणे काम करण्यास माझा आत्मविश्वास वाढला आहे असे काँग्रेसचे युवा नेतृत्व धनंजय चौधरी यांनी सांगितले.
धनंजय चौधरी यांचा सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेले सातोद, कोळवद, वड्री व परसाडे या गावी कृतज्ञता संवाद यात्रा झाली, कृतज्ञता संवाद यात्रेचे औचित्य साधून धनंजयभाऊ यांनी या गावांमध्ये प्रथम संविधान चौकामधील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माला अर्पण करून दौरास प्रारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी सातोद व कोळवद गावांमध्ये स्वामीनारायण, विठ्ठल मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर दोघे गावांमध्ये गावातील सरपंच जाऊबाई भिल तसेच कोळवद मधील सरपंच मुमताज भाई तडवी व सातोद व कोळवद ग्रामस्थांच्या हस्ते जलपूजन तसेच या गावांमधील जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देऊन मयत झालेल्या व्यक्तींप्रती वृक्षारोपण करून ‘जल वाचवा वृक्ष वाचवा’असा जणू काही संदेशात समाजास देण्यात आला. याप्रसंगी या गावांमधील प्रतिष्ठित व्यक्ती वृद्ध नवयुवक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. याप्रसंगी दोन्ही गावात महिलांनी जागोजागी भाऊंचे औक्षण करून स्वागत केले तसेच गावकऱ्यांमार्फत जाहीर सत्कार करण्यात आला.
धनंजय चौधरी यांनी हाती घेतलेल्या या अभिनव उपक्रमाबद्दल समाजातील सर्व स्तरांमधून भाऊंचे कृतज्ञतापूर्वक गौरवउद्गार गावकरी बोलवून दाखवत आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण गावी असून या गावांमध्ये वैशाख महिन्यामध्ये मोठी यात्रा भरते तसेच स्मशानभूमीपासून खंडेराव महाराज मंदिरापर्यंत बारा गाड्या ओढले जातात त्याचप्रमाणे डिसेंबर महिन्याच्या संकष्ट चतुर्थी पिरबाबांची संदल मिरवणूक सुद्धा येथे काढला देते. त्याचप्रमाणे वाल्मिक जयंती निमित्त गुरु पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा मोठा कार्यक्रम येथे केला जातो. या गावांमध्ये सर्व धर्म मिळून तसेच सर्व स्त्री-पुरुष एकत्र येऊन सर्व कार्यक्रम साजरे करतात अशी माहिती गावाचे सरपंच जाऊबाई भिल यांनी भेटीदरम्यान बोलताना दिली. त्यानंतर माननीय धनंजय भाऊ यांनी या दोघे गावांमध्ये फेरी घेऊन गावातील लोक ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेतलं तसेच असलेल्या अडचणी बद्दल योग्य ते उपाय करून अडचणी सोडवण्यासाठी आपण कसोशीने प्रयत्न करू अशी ग्वाही सुद्धा देण्यात आली. माननीय आमदार शिरीष चौधरी यांनी या सातोद व कोळवद गावांसाठी विशेष निधी देऊन त्या मार्फत गावांतर्गत रस्ते पेवर ब्लॉक गावाबाहेरील रस्त्यांचे डांबरीकरण जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी पाईपलाईन संरक्षण भिंती जल बंधारे असे मोठ्या स्वरूपाची कामे पूर्ण केलेली आहे दादांनी केलेल्या या भरघोस कामांबद्दल गावकऱ्यांनी दादांचे धनंजय भाऊ समोर आभार व्यक्त केले.
याप्रसंगी जलपूजन व वृक्षारोपणास कोळवद येथे सरपंच मुमताज भाई तडवी, माजी सरपंच याकुब तडवी, मेंबर अनिल पाटील यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले त्याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील , मसाकाचे माजी संचालक अनिल महाजन, माजी विकास सोसायटी चेअरमन मिठाराम महाजन, अभय महाजन, निलेश महाजन वैभव महाजन असलम तडवी, शाहरुख तळवी, फारूक तडवी, जाकीर तडवी, अल्ताफ तडवी, रवी पाटील, बोदर्बुवा अढायगे, सद्दाम तडवी,अमीर तडवी, नसीब तडवी, सलमान तडवी, विनोद खैरे आदी उपस्थित होते.
सातोद येथे सरपंच जाऊबाई भील यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. त्याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक माजी सरपंच यशवंत पाटील, माजी सरपंच पंकज पाटील,माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश पाटील, महेंद्र धांडे, प्रसन्न महाजन, माजी ग्रामपंचायत सदस्य विकास पाटील, संजय धांडे, किशोर पाटील, संजय पाटील, टेनु सोनार, सुनील तळले, भगवान भील, गोपीनाथ धांडे, प्रदीप धांडे, हेमा तळेले, भास्कर महाजन, विष्णू तळेले, लीलाधर पाटील, दुबा तळेले , सागर तळेले, घनश्याम फेगडे, पंकज पाटील आदी उपस्थित होत्या.
दुपारच्या सत्रात आपल्या सर्वांचे लाडके तसेच सर्व नवयुकांच्या हाकेला धावून येणारे व नवयुवकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे युवा नेतृत्व माननीय धनंजय भाऊ यांचा वड्री व परसाळे या गावी कृतज्ञता दौरा केला.कै.#धनाजीनाना व कै.#मधुकरराव_चौधरी यांच्या दूरदृष्टीकोनातून तसेच त्यांनी राबवून पूर्ण केलेल्या नाविन्यपूर्ण योजनेमधून निर्माण झालेले लघुबंधारे तसेच धरणांमुळे या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये लोकांच्या जीवनमानामध्ये कमालीची स्थिरता आलेली आज पहावयास मिळते. त्यांचाच वसा हाती घेऊन रावेर यावल तालुक्याचे लाडके आमदार शिरीषदादा चौधरी व धनंजय दादा चौधरी हे सुद्धा काम करीत आहेत. कै. धनाजी नाना तसेच कै. मधुकरराव चौधरी यांच्या पर्व काळामध्ये त्यांच्यासोबत रावेर तालुक्यातील बऱ्याच लोकांनी व सर्व जाती धर्मातील लोकांनी महत्त्वाच्या ठिकाणी लोकांची साहेबांना मदत मिळाली व त्यामुळेच आज इतकी झालेली विकास कामे पहावयास मिळत आहे त्याचीच एक पोचपावती म्हणून धनंजय भाऊ यांनी पूर्ण रावेर तालुक्यामध्ये कृतज्ञता दौऱ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
वड्री या गावी ग्रामस्थ अरमान तडवी व दिनकर पाटील यांच्या हस्ते गावातील जुन्या विहिरीवरती जलपूजन करून करण्यात आले तसेच या गावाच्या जडणघडणी मध्ये महत्त्वाचे योगदान देऊन मयत झालेल्या व्यक्तींप्रती कृतज्ञता म्हणून त्यांच्या नावाने झाड लावून वृक्षारोपण करण्यात आले. याचप्रमाणे परसाळे या गावी ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब भालेराव यांच्या हस्ते जलपूजन तसेच गावाच्या जडणघडण योगदानातील महत्त्वाच्या व्यक्तीप्रति वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर गावामध्ये हनुमान मंदिर त्यानंतर परसाळे येथील पुरातन अशा गरीब नवाज दर्गा व चांद सावली बाबा दरबार येथे जाऊन धनंजय जाऊ भाऊंनी दर्शन घेतले. परसाळे या गावी खाजा गरीब नवाज यांच्या नावे जानेवारी महिन्यात यात्रा भरते तसेच गावामध्ये संदलीचा सुद्धा कार्यक्रम असतो. तसेच या गावांच्या बाजूलाच असलेले आसराबारी धरण हे सुद्धा कै.मधुकरराव चौधरी यांच्या दूरदृष्टीकोनातून तयार झालेले आहे व या गावांची पाणी पिण्याची व्यवस्था सुद्धा याच धरणाच्या पाण्यापासून होते अशी माहिती गावातील प्रतिष्ठित नागरिक सुलेमान तडवी मनोज पाटील प्रदीप पाटील प्रभाकर चौधरी यांनी दिली. सदर कार्यक्रमादरम्यान गावात विविध ठिकाणी महिलांनी भाऊंचे औक्षण करून स्वागत केले तसेच गावकऱ्यांनी शाल श्रीफळ देऊन धनंजय भाऊचा यांचा सत्कार केला. आमदार शिरीष चौधरी यांनी या गावांसाठी विविध विकास निधी मार्फत गावांतर्गत रस्ते,गावांतर्गत पेवर ब्लॉक बसवणे,जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी, पेवर ब्लॉक,संरक्षण भिंती,सार्वजनिक वाचनालय येथे ग्रंथ व पुस्तके पुरवणे, डांबरीकरण अशी विविध विकास कामे पूर्ण केलेले आहेत.
याप्रसंगी जलपूजन व वृक्षारोपणास वड्री येथे अरमान तडवी, दिनकर पाटील यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले त्याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रदीप पाटील, अनिल चौधरी, प्रभाकर चौधरी, प्रमोद चौधरी, ईदबार तडवी, फिरोज तडवी, इमाम तडवी, कबीर तडवी, असलम तडवी, भिका तडवी, भूषण चौधरी, संजय पाटील, निलेश चौधरी, फरीद तडवी आदी उपस्थित होते.
परसाळे गावी ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब भालेराव यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले त्याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपसरपंच सुलेमान तडवी, माजी उपसरपंच रमेश सोना सावले, ग्रामसेवक मज्जित तडवी, कमाल तडवी, रामचंद्र साबळे, दीपक पाटील, राजू तडवी, भरत पाटील, ज्ञानेश्वर सावळे, शेखर सावळे, दीपक सावळे ,तेजस सावळे, यश पाटील, मुबारक तडवी, समीर तडवी, जुम्मा तडवी, मनोज पाटील, दिदास सावळे, सुरेश सावळे, किरण भवरे, राजू तडवी, बशीर तडवी, छब्बीर तडवी, संजू तडवी आदी उपस्थित होते.