पारोळा

पारोळा शिक्षण

अंबाप्रिपी येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोपसमारंभ

पारोळा (प्रतिनिधी) येथील ग्राम विकास शिक्षण संस्था मुडी संचलित कै. एच पी पाटील माध्यमिक विद्यालय अंबापिंपरी या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2018- 19 या वर्षात शिकत असलेल्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना नुकताच निरोप देण्यात आला.   यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री पी व्ही पाटील सर त्याचबरोबर श्री डीडी पाटील सर, सी.एच. माळी सर, के.जी.कचवे व एच.आर.लोहार उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता आई सरस्वतीच्या प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत मांडले. त्यात कृतिका पाटील, कोमल माळी, सोनाली वानखेडे, वैशाली पाटील, अर्चना पाटील, हर्षाली माळी, हर्षा माळी, दुर्गेश माळी, प्रितेश माळी इत्यादी विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्याचबरोबर श्री. माळी […]

पारोळा सामाजिक

भिलाली परिसरातील ग्रामस्थांचे बंधार्‍याच्या मागणीसाठी उपोषण

अमळनेर (प्रतिनिधी)  पारोळा तालुक्यातील भिलाली येथील अपूर्ण बंधाऱ्याच्या कामाबाबत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे भिलाली व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे. याबाबत ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे की, १०१ ते २५० हेक्टर सिंचन क्षमतेचा कोल्हापुर पध्दतीचा बंधारा या योजनेचे अपूर्ण काम पूर्ण होणे बाबत मा. कार्यकारी अभियंता लघुसिंचन जलसंधारण विभाग जळगाव यांचे कार्यालयीन कार्यारंभ आदेश असून, (जा.क्र. लेखा.२ निविदा १५२३ सन २०१४) याबाबत शासन व प्रशासन यांना वेळोवेळी निवेदन देऊनही हे काम अपूर्ण आहे. हा बंधारा ठेकेदार यांनी 3 जुलै 2014 रोजी अठरा महिन्यांच्या कालावधीत काम पूर्ण करण्याचे आदेश केलेले होते, परंतु दिनांक 14 डिसेंबर 2014 पर्यंत कामास […]

पारोळा

दारुबंदीसाठी सांगवी येथील महिला आक्रमक

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील सांगवी येथे दारूबंदीसाठी महिलांनी अतिशय आक्रमक भूमिका घेऊन पोलीस स्थानकावर मोर्चा काढला. सांगवी येथे दारूचा मुद्दा संवेदनशील बनला आहे. येथे दारूबंदीयाबाबत गावात महिला ग्रामसभा घेऊन या ग्रामसभेत ग्रामपंचायतीचा ठराव करण्यात आला आहे. गावातील महिला सविताबाई जब्बरसिंग पाटील यांनी या सभेत सांगितले की, गावात अवैध दारू विक्री होत असून त्यामुळे तरुण पिढीला वाईट वळण लागले आहे. या विषारी दारूमुळे अनेक तरुणांनी आपले जीव गमावले असून अनेक मृत्यूच्या दाढेत आहेत. मात्र असे असूनही दारूबंदी न करण्यात आल्याने अनेक कुटुंबे उदध्वस्त होत आहेत. परिणामी गावात कायमस्वरूपी दारूबंदी करण्यात यावी अशी मागणी महिलांनी केली. याबाबतचे निवेदन पारोळा पोलिस ठाण्यात निरीक्षक […]

Cities पारोळा

विविध मुद्यांवरून गाजली पाचोरा येथील आमसभा

पाचोरा प्रतिनिधी । येथील पंचायत समितीत आयोजित करण्यात आलेली आमसभा अनेक विषयांवरून गाजली. यात विविध खात्यांना कामाबाबत उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. यांची होती उपस्थिती आजची आमसभा आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. प्रारंभी शहीद जवान यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या नंतर सरस्वती मातेचे पूजन करण्यात आली. या सभेत खासदार ए.टी.नाना पाटील, पंचायत समिती सभापती बन्सीलाल पाटील, उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे आदी उपस्थित नव्हते. तर या आमसभेला पंचायत समिती उपसभापती अनिता पवार, नगराध्यक्ष संजय गोहिल, तहसीलदार बीए कापसे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश चौधरी, गटशिक्षणाधिकारी विकास पाटील, सार्वजनिक बांधकाम अभियंता डी. एम. पाटील. जि. प. सदस्य पदमसिग पाटील, दिपकसिंग राजपूत, […]