पारोळयात उपजिल्हा रूग्णालयाला मंजूरी; आ. चिमणराव पाटलांच्या प्रयत्नांना यश

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा येथील कुटीर रूग्णालय हे गेल्या कोरोना काळात रूग्णांसाठी मोठ्या उपचारासाठी मोठ्या मदतीचे आणि उपयुक्त ठरले. पारोळा कुटीर रूग्णालयाला एकुण ११० पेक्षा अधिक खेडे संलग्न आहेत.

त्यात मुख्य म्हणजे शहरालगत जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ येथे दैनंदिन दिवसाला ६ ते ७ अपघात हे होत असतात. त्यात सर्वच अपघातग्रस्त रूग्ण हे पारोळा कुटीर रूग्णालयाला येत असतात. अशात कुटीर रूग्णालयाला अपुर्ण असलेल्या यंत्रणेमुळे रूग्णांना थेट धुळे अथवा जळगांव कडे स्थलांतर करावे लागते.

परंतु ही बाब आमदार चिमणराव पाटील यांनी आमदार झाल्यापासुन कुटीर रूग्णालय हे उपजिल्हा रूग्णालय होऊन येथेच रूग्णांना उपचार मिळणेसाठी आवश्यक तो पाठपुरावा करत होते. या पाठपुराव्याला अखेर यश संपादन झाले असुन राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभागाकडुन पारोळा येथील ३० खाटांचा ग्रामीण रूग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रूग्णालयात श्रेणीवर्धीत मुख्य इमारत व निवासस्थान बांधकामास मंजुरी मिळाली आहे.

Protected Content