खामगावमधील ट्रॅफिकच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त; मात्र प्रशासनाची कुंभकर्णीची झोप

खामगांव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सध्या सर्वत्र रस्ते झाले छोटे आणि ट्रॅफिक झाले मोठे असाच काहीच चित्र विशेषता सकाळी दहा ते दुपारी एक आणि संध्याकाळी सहा ते आठच्या दरम्यान शहरापासून लहान छोट्या गावापर्यंत दिसून येते. पण कोणीही या बेशिस्त ट्रॅफिकला शिस्त लावण्याकरता पुढाकार घेत नाही. याच्या संबंधित पोलीस प्रशासनाने याकरिता कडक पावले उचलायला पाहिजे ते मात्र कुंभकर्ण झोपेचे सोंग घेते की काय असाच म्हणावा लागेल.

कारण ज्या भागात अशा घटना घडतात वारंवार ट्रॅफिक जाम होतात विशेषतः शाळा कॉलेज सरकारी कार्यालय असता तिथे कायमस्वरूपी कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे. पण जोपर्यंत एखादी अप्रिय घटना घडत नाही कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होत नाही, तोपर्यंत संबंधित विभागाने यात हस्तक्षेप करावा नाही का हा देखील एक प्रश्न उभा राहतो पण आज पुन्हा तोच प्रसंग लाईव्ह ट्रेंडस न्युज कॅमेराने खामगाव शहरातील नॅशनल हायस्कूल जवळ चौकामध्ये टिपला. वेळ दुपारी १ वाजता होती. अक्षरशः एखाद्या मेट्रो शहरांमध्ये जसं ट्रॅफिक जाम होते तसं खामगाव शहरात एका मध्यभागी चौकात अशी घटना वारंवार घडतात काही वेळ याची दखल घेतल्या जाते व पुन्हा तेच चित्र वारंवार पाहायला मिळते यावर कायमस्वरूपी तोडगा निघणे गरजेचे आहे.

Protected Content