Browsing Category

राज्य

मला खोट्या प्रकरणात अडकवण्याचे कारस्थान : नवाब मलीक

मुंबई प्रतिनिधी | केंद्रीय यंत्रणा मला खोट्या प्रकरणात अडकवण्याचे कारस्थान करत असून माझी अवस्था अनिल देशमुख यांच्या प्रमाणेच करण्याचा कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री तथा राष्ट्रवाचीचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी आज…

परमबीर यांचे अटक वॉरंट रद्द

ठाणे प्रतिनिधी | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधातला अटक वॉरंट ठाणे कोर्टाने रद्द केल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात ठाणे कोर्टाने अटक वॉरंट बजावले होते. आज हे…

…तर वेतन वाढीवरही विचार करणार : अनिल परब यांचा इशारा

मुंबई प्रतिनिधी | वेतन वाढ करूनही जर संप कायम राहत असेल तर आम्ही एसटी कर्मचार्‍यांना दिलेल्या वेतनवाढीवर विचार करू असा सूचक इशारा आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला. कर्मचारी कृती समितीशी नव्याने बोलणी केल्यानंतर ते पत्रकारांशी…

शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी ईडीचा छापा

औरंगाबाद प्रतिनिधी | माजी मंत्री तथा शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी आज सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने छापेमारी केली आहे. माजी मंत्री आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे. १२ जणांच्या पथकाकडून…

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने तज्ज्ञांना धडकी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | एकीकडे देशात कोरोना आटोक्यात येत असतांना बर्‍याच देशांमध्ये याच्या नव्या व्हेरियंटने नव्या लाटेचा धोका वाढविला आहे. या नवीन व्हेरियंटचे तब्बल ३० वेळेस म्युटेशन होत असल्याचे दिसून आल्याने जागतिक आरोग्य…

एसटी कर्मचार्‍यांना कामावर येण्यास अडवू नका : अनिल परब

मुंबई प्रतिनिधी | एसटीचे काही कर्मचारी संपातून माघार घेत कामावर परत येत आहेत. त्यांना कुणी अडविण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. राज्य सरकारने, एसटी…

महाआघाडी सरकार काही दिवसच टिकणार : राणे

मुंबई प्रतिनिधी | राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे थोडेच दिवस उरले असून ते लवकर कोसळणार असल्याचे भाकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले आहे. भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारचं…

संविधान दिन पाळण्याचं नाटक कशासाठी ? : संजय राऊत

मुंबई प्रतिनिधी | एकीकडे देशाची राज्यघटना पायदळी तुडवली जात असतांना केंद्र सरकार संविधान दिवस पाळण्याचे नाटक का करत आहे ? असा सवाल आज शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. आज देशभरात संविधान दिन  साजरा होत…

सतेज पाटील यांची विधानपरिषदवर बिनविरोध निवड

कोल्हापूर | कॉंग्रेसचे मंत्री सतेज पाटील यांच्या विरोधातील भाजपचे उमेदवार आणि डमी उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे त्यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड निश्‍चीत झाली आहे. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत…

महाराष्ट्रात मराठीतच बोला : राज्यपालांनी जिंकली मराठी जनांची मने !

यवतमाळ | हा महाराष्ट्र असून आपण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठीतच करा अशा सूचना जाहीरपणे देऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपले मराठी प्रेम दाखवून दिले आहे. त्यांच्या या मराठी प्रेमावरून अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे.

मुंबईतच होणार विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन

मुंबई प्रतिनिधी | राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबई येथे घेण्यात येणार असल्याचा निर्णय आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

१ डिसेंबर पासून सुरू होणार राज्यातील सर्व शाळा

मुंबई प्रतिनिधी | राज्यातील सर्व शाळा १ डिसेंबर पासून सुरू करण्यात येणार असल्याचा निर्णय आज राज्य मंत्री मंडळाने घेतला. यामुळे कोविडच्या नियमांचे पालन करून पहिली ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मलिकांना हायकोर्टाचा धक्का : वानखेडे कुटुंबावर आरोप करण्यास मज्जाव

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयाने समीर वानखेडे अथवा त्यांच्या कुटुंबियांबाबत कोणतेही आरोप करण्यास बंदी घातली आहे. या निर्णयामुळे मलीक यांना धक्का…

संप सुरूच राहणार : एसटी कर्मचाऱ्यांचा पवित्रा !

मुंबई प्रतिनिधी - परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीर केलेली वेतनवाढ आणि नंतर आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी संपातून घेतलेली माघार यांच्या पार्श्‍वभूमीवर एसटी कर्मचारी संघटनेने जोवर विलीनीकरण होत नाही तोवर आपला लढा सुरूच…

पडळकर आणि खोत यांची एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून माघार

मुंबई प्रतिनिधी- भारतीय जनता पक्षाचे आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपण एसटी कर्मचाऱ्यांच्या संपातून माघार घेत असल्याची घोषणा केली. एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन सुरू केले असून यात गेल्या…

वानखेडेंच्या मातोश्रींचे दोन्ही धर्माच्या मृत्यूचे दाखले !

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आज पुन्हा नवीन आरोप लावत त्यांच्या आईच्या मृत्यूची दोन धर्मांची स्वतंत्र नोंद करण्यात आल्याची कागदपत्रे जाहीर केली आहेच.

संपाबाबत एसटी कर्मचारी उद्या घेणार निर्णय

मुंबई प्रतिनिधी | परिवहन मंत्री अनिल परब यांनी वेतनवाढीचा तोडगा जाहीर केल्यानंतर यावर पूर्णपणे विचार विनीमय करून आपण उद्या सकाळी निर्णय जाहीर घेणार असल्याची माहिती आ. सदाभाऊ खोत यांनी जाहीर केली आहे. यामुळे संपाबाबत कर्मचार्‍यांची भूमिका ही…

मोठी बातमी : एसटी कर्मचार्‍यांना पगारवाढ ! कर्मचारी संप मागे घेण्याची शक्यता

मुंबई प्रतिनिधी | राज्य कर्मचारी म्हणून एसटी महामंडळाचे विलीनीकरण करावे या मागणीसाठी राज्यव्यापी संप करणार्‍या कर्मचार्‍यांच्या मागणीवर सरकारने वेतनवाढीचा तोडगा सुचविला. यात मूळ वेतनात अडीच ते पाच हजार रूपयांची वाढ करण्यात आली असल्याची…

एसटी कर्मचार्‍यांना वेतनवाढीचा प्रस्ताव : वेळेत पगाराचेही आश्‍वासन

मुंबई प्रतिनिधी | संपावर असणार्‍या राज्यातील एसटी कर्मचार्‍यांना वेतनवाढीचा प्रस्ताव देण्यात आला असून यात वेळेवर पगार होणार असल्याची शाश्‍वती देखील देण्यात येणार आहे. जाणून घ्या सरकारने नेमकी कोणती ऑफर दिलेली आहे ती ?

फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला – राजकारणातील नवीन समीकरणाची चर्चा !

मुंबई प्रतिनिधी | राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या नव्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट दिली आहे. ही भेट राजकारणातील नवीन समीकरणाची नांदी असल्याचा कयास बांधला जात आहे. राजकारणात कोणीच कोणाचा कायम शत्रू व मित्र नसतो. असं म्हटलं…
error: Content is protected !!