मयत विद्युत कर्मचाऱ्याच्या वारसाला विविध संघटनेकडून आर्थीक मदत

पारोळा- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा येथील झिरो वायरमन दिनेश भामरे यांचा विद्यूत पोलवर काम करत असतांना विजेच्या धक्काने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यांच्या वारसाला आर्थीक मदत देण्यासाठी पारोळा शहरातील विविध संघटनांनी पुढे येवून आर्थीक मदत देण्यात आले आहे.

यात प्रथम माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी मदत दिली तर शहरातील नामांकित सोशल मीडिया ग्रुप कडून लोकसहभागातून मयताच्या वारसांना आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक अरुण चौधरी, विधीतज्ञ तुषार पाटील, पत्रकार अभय पाटील, दीपक अनुष्ठान, ईश्वर ठाकूर, अन्नू महाजन, कैलास महाजन, नगरसेवक भैय्या चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी त्यांच्या कुटुंबाशी चर्चा करताना सदर टीमने विद्युत विभाग व ठेकेदारांकडून मदती बाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. मयत दिनेश भामरे यांच्या लहान मुलांना शाळेमध्ये ५० टक्के सूट देण्यात येणार असल्याचे टायगर स्कूल संचालक रवींद्र पाटील यांनी सांगितले.

Protected Content