Home क्राईम शेतातील वादातून महिलांसह १२ जणांचा शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला !

शेतातील वादातून महिलांसह १२ जणांचा शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला !


पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतातील वहिवाटीच्या वापरावरून झालेल्या जुन्या वादाचे रूपांतर मोठ्या हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना पारोळा तालुक्यातील म्हासवे येथे घडली आहे. या वादातून एका ४५ वर्षीय शेतकऱ्यावर कुऱ्हाड आणि लाकडी काठ्यांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील महिलांसह एकूण १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बळवंत दगा महाले (वय ४५, रा. म्हासवे, ता. पारोळा) हे २३ मे रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास म्हासवे शिवारातील आपल्या शेतात होते. यावेळी शेतातील रस्त्याच्या वापराच्या कारणावरून आरोपींनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादाचे पर्यावसान पुढे गंभीर मारहाणीत झाले. आरोपी निलेश बापू महाले याने बळवंत महाले यांना अश्लील शिवीगाळ करत, हातातील कुऱ्हाडीने त्यांच्या दोन्ही पायांच्या पोटरीवर जबर वार करून गंभीर जखमी केले.

एवढ्यावरच न थांबता, इतर संशयित आरोपी महेंद्र महाले, जितेंद्र महाले, दोधू दगा महाले, वासुदेव महाले आणि राज महाले यांनी हातातील लाकडी काठ्यांनी बळवंत यांच्या पोटावर, पाठीवर व शरीराच्या इतर भागांवर बेदम मारहाण केली. तसेच संशयित महिला आरोपी संगीताबाई महाले, दिपाली महाले, चित्राबाई महाले, वैशाली महाले आणि सुरेखाबाई महाले यांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.


Protected Content

Play sound