डॉक्टर दिनानिमित्त अमोल पाटील यांच्याकडून डॉक्टरांचा सत्कार

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा प्रतिनिधी एरंडोल पारोळा भडगाव मतदार संघातील जीवनाची नाळ जोडणारे डॉक्टर यांना डॉक्टर दिनाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या एरंडोल-पारोळा मतदार संघात पुढील १० दिवस मा.अमोलदादा पाटील मित्र मंडळातर्फे डॉक्टर सप्ताहाचे आयोजन करण्यात येऊन डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.

त्यानिमित्त आज पारोळा-एरंडोल मतदारसंघातील डॉक्टरांना जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह देवुन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी शिवसेनेचे शहरप्रमुख अमृत चौधरी, माजी नगरसेवक राजुभाऊ कासार, सामाजिक कार्यकर्ते कैलास पाटील, पंकज मराठे पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content