पोलिस पाटलांतर्फे आ. चिमणराव पाटील यांचा सत्कार

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एरंडोल-पारोळा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षापासून पासून पोलीस पाटलांचे मानधन वाढवण्याची मागणी होत होती. पोलीस पाटलांच्या संघटनेकडून हा विषय सातत्याने लावून धरला होता. अखेर आता पोलीस पाटलांचे मानधन वाढवण्याचा निर्णय राज्याचे कर्तव्यदक्ष तथा लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. तसेच आशा स्वयंसेविका मानधनात भरीव पाच हजार रुपये वाढ करण्यात आली आहे.

ही मागणी एरंडोल विधानसभा मतदारसंघातील पोलीस पाटील बांधवांनी आमदार चिमणराव पाटील यांचेकडे केली होती. त्याअनुषंगाने आमदार चिमणराव पाटील यांनी देखील यासाठी पाठपुरावा शासन दरबारी केला होता. या पाठपुराव्याला यश संपादन झाल्याचानिमित्ताने पारोळा तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने आमदार चिमणराव पाटील यांचा पेढा भरवत, सत्कार करत आभार मानण्यात आले.

Protected Content