विधानपरिषद निवडणूकीसाठी भाजपकडून पाच जणांना उमेदवारी जाहीर

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा| भारतीय जनता पक्षाने विधानपरिषदेसाठी 5 जणांची यादी जाहीर केली आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडेंसह परिणय फुके, अमित बोरखे, योगेश टिळेकर आणि सदाभाऊ खोत यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर सातत्याने त्यांचे राजकीय पूनर्वसन करण्यात यावे अशी मागणी पंकजा समर्थकांकडून करण्यात येत होती. यावर्षी झालेल्या बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा यांना उमेदवारी देण्यात आली होती. अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीत पंकजा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांनी पराभव केला होता.

येत्या 12 जुलै रोजी विधानपरिषदेसाठी मतदान आणि मतमोजणी पार पडणार आहे. विधानसभा संख्येनुसार भाजपा पाचा जागा लढवू इच्छितो. तर एकनाथ शिंदे शिवसेना आणि एनसीपी अजित पवार प्रत्येकी दोन जागा, असे गणित आहे. पण, शिवसेनेनं भाजपाच्या कोट्यातील एक जागा मागितली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली भाजपा नेत्या सोबत संवाद करून भाजपा कोट्यातून एक जागा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. पण, भाजपाने शिवसेनेला धक्का देत पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार (2 जुलै) हा शेवटचा दिवस आहे. 16 जुलैच्या आधी ही मतदान प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

Protected Content