संजय पांडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करा- सोमय्या

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा –   सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला तसेच खोट्या एफआयआर प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जावी, अशी मागणी भाजपा शिष्टमंडळ कडून करण्यात आली आहे.

 

खार पोलीस ठाण्याबाहेर भाजपचे किरीट सोमय्या यांच्या वाहनावर चपला, काचेच्या बाटल्यासह, दगडफेक करण्यात आली.  शिवसेनेच्या गुंडांना वाचवण्यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी खोटा एफआयआर दाखल करून त्याआधारे कारवाई केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने  पोलीस आयुक्त संजय पांडे यांची हकालपट्टी करावी,’ अशी मागणी  किरीट सोमय्या यांनी भाजपा शिष्टमंडळाच्या सोबत राज्यपालांकडे  केली आहे.

भाजप नेते आणि विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने आज राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

काठ्या, दगड, काचेच्या बाटल्या, चपला आल्या तरी माझ्यासोबत असलेल्या कमांडोंनी मला वाचवले, माझी गाडी बाहेर काढली. दगड लागल्याने खिडकीची काच फुटून ती लागल्याने किंचित जखम झाली. पोलिसांनी त्याचा पंचनामा केला आहे. ती काच डोळ्याला लागली असती तर…उद्धव ठाकरे आणि माफिया सेनेची मी जिवंत राहू नये अशी इच्छा होती का?,” अशी संतापजनक विचारणा किरीट सोमय्यांनी केली आहे.

पोलीस व सीआयएसएफ जवानांमध्ये युध्द होण्याची अपेक्षा होती का? दरेकर 

पोलिसांच्या उपस्थितीत किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी सीआयएसएफ जवानांनी सोमय्या यांचा बचाव करीत त्यांना गर्दीत संरक्षण दिले. असे  असताना पोलीस आयुक्त विचारतात की सीआएसएफचे जवान काय करत होते. सीआयएसएफ जवानांनी त्यावेळी गोळीबार करावा आणि महाराष्ट्र पोलीस व सीआयएसएफ जवानांमध्येच गोळीबार व्हावा, अशी पोलीस आयुक्तांची अपेक्षा होती का? असा संतप्त सवाल प्रवीण दरेकर यांनी विचारला आहे.

गृहमंत्र्यांच्या भेटीसाठी आम्ही गेलो असतो, मात्र सरकार न्याय देईल असं आता   वाटत नाही,  किरीट सोमय्या हे पुराव्यानिशी सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढत असल्याने सर्वच ठिकाणी सुडाने पेटलेले हे सरकार आहे.  त्यामुळे किरीट सोमय्या यांनाच नष्ट करा, असा डाव सरकारकडून आखण्यात आला असून , राज्यपालांनी गृहसचिवांकडून या घटनेचा अहवाल मागवावा, अशी मागणीही  दरेकर यांनी केली आहे.

 

 

Protected Content