Accident : भरधाव बस डंपरवर धडकली ! (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बांभोरी गावाजवळ असलेल्या पोद्दार शाळेसमोरील राष्ट्रीय महामार्गावर पुढे जात असलेल्या डंपरवर मागून येणाऱ्या बसने जोरदार धडक दिली. या धडकेत बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव एरंडोल राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बांभोरी गावाजवळील पलोड स्कूलजवळ पुढे जात असलेल्या डंपरला मागून येणारी जळगाव आगाराची बस क्रमांक(एमएच २० बीएल ७६४) ही जळगावकडून शिंदखेडा कडे जात असतांना जोरदार धडकली. यात चालकाच्या डाव्या बाजूवरील बसचे नुकसान झाले आहे. तर यात प्रवास करणारे काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रूग्णालयात रवाना करण्यात आले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीसांत या घटनेबाबत कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती.

 

दरम्यान, या घटनेमुळे वाहतूकीची मोठी कोंडी झाली होती. रास्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांची रांगचरांग लागल्या होत्या. तब्बल दोन तासानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. यावेळी शहर वाहतूक शाखा, जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पथक आणि पाळधी दुरक्षेत्र विभागाचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेवून वाहतूक सुरळीत केली.

Protected Content