जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस निषेध आंदोलन ! (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पंतप्रधानांच्या नावाने काही अपेक्षा करणारे ट्विट केल्यावरून गुजराथ मधील काँग्रेसचे आ. जिग्नेश मेवानी यांना अटक केली आहे. याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निदर्शने करण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गुजरातमधील वडगामचे मतदार संघाचे काँग्रेसचे आ. जिग्नेश मेवानी यांना आसाम पोलिसांनी गुजरात मधून सर्किट हाऊस येथून अटक केली आहे. पंतप्रधानांच्या नावाने काही अपेक्षा करणारे ट्विट करणे हा काही अपराध नाही. पकडून आसाममध्ये त्यांच्यावर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात येऊन आ. जिग्नेश मेवाणी यांना पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. लोकशाही व संविधानाने सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे. परंतु भारतीय जनता पक्षाच्या सरकारने मनमानीपणे व सर्व नियम कायदे धाब्यावर ठेवून आ. जिग्नेश मेवाणी यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. ही अटक बेकायदेशीर असून लोकशाही मूल्यांची पायमल्ली करणारे आहे. आ. जिग्नेश मेवानी यांची त्वरीत सुटका करावी, या मागणीसाठी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आले.

 

या निवेदनावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष डी. डी. पाटील, भरत पाटील, युवक काँग्रेसचे सचिव किरण पाटील, आशुतोष पवार, सरचिटणीस जमील शेख, ज्ञानेश्वर कोळी, ज्ञानेश्वर महाजन, के.डी. चौधरी, मनोज सोनवणे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

Protected Content