मोदींच्या ७० व्या वाढदिवसाला ७० ठिकाणी कार्यक्रम ; भाजपची तयारी

नवी दिल्ली वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदींचा . १७ सप्टेंबर रोजी असणारा ७० वा वाढदिवस साजरा करण्यासाठी भाजपाने तयारी सुरु केली आहे. या वर्षी मोदींचा वाढदिवस ‘सेवा दिवस’ म्हणून आणि साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. . ७० ठीकाणी ७० कार्यक्रम करण्याचा भाजपाचा विचार आहे.

मोदींच्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार नाही . मोदींच्या वाढदिवसानिमित्त अन्नवाटपाबरोबरच मास्क, सॅनिटायझर आणि औषध वाटप करण्याची तयारी भाजपाने केली आहे. रक्तदान शिबिरांचेही आयोजन करण्यात येणार आहे.

मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये करोनाचे नियम पाळले जावेत यासंदर्भातील सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या आहेत. मागील वर्षी पंतप्रधान मोदींचा ६९ वा वाढदिवस पक्षाच्या माध्यमातून आठवडाभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करत साजरा करण्यात आला होता.

काही दिवसांपूर्वीच भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि पक्षाच्या महासचिवांची बैठक झाली. त्या बैठकीमध्येच पंतप्रधान मोदींच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त ७० समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये केंद्र सरकारने काय निर्णय घेतले,

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत योजना नक्की काय आहे याबद्दलची माहिती सामान्यांपर्यंत पोहचवली जाणार आहे. यंदा भाजपा गांधी जयंतीबरोबरच २५ सप्टेंबर रोजी दीनदयाल उपाध्याय यांची जयंतीही साजरी करणार आहे.

Protected Content