आठ्वड्यातील हे दोन दिवस वगळून जळगावात सगळी दुकाने सुरु राहणार

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या चार ते पाच महिन्यांपासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश शासनाने काढले होते. आता ४ ऑगस्टपासून शहरातील ठरवून दिलेल्या नियमानुसार दुकाने उघडण्याची परवानगी दिली. आता आठवड्यातून दोन दिवस सोडून इतर सर्व दिवशी दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी जळगाव महानगर पालिकेचे आयुक्त सतिश कुलकर्णी दिली आहे.

जळगाव महानगरपालिकेने प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, राज्यातील विविध व्यवसाय, व्यापारी, संकुले व दुकाने टप्प्याटप्याने उघडे करण्यात येत आहे. ४ ऑगस्ट पासून शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार दुकानदारांना व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती.

आता यावर देखील आदेश शिथील करत आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार हे पाच दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. तर शनिवार आणि रविवार या दोन दिवशी शहरातील संपुर्ण दुकाने बंद राहतील. सोमवार ते शुक्रवार या वेळेत दुकानदाराने दुकानावर शासकिय नियमांचे पालन करणे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे, सॅनिटायझर ठेवणे आदी बंधनकारक ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त सतिश कुलकर्णी यांनी काढले आहे. हे आदेश ३१ ऑगस्ट पासून लागू करण्यात येणार आहे.

मार्केटच्या दुकानांसाठी हे राहणार नियम
१. कपड्या दुकानात ट्रायल रूम बंद ठेवावे, एक्सचेंज बंद ठेवावे.
२. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याची संपुर्ण जबाबदारी दुकानदारांची राहील. ग्राहकांना फूट मार्केटींग, टोकन सिस्टीम आदींचा अवलंब करावा.
३. दुकानात एकापेक्षा पाच ग्राहक असू नये.
४. दुकानातील कर्मचारी यांनी मास्क लावणे गरजेचे आहे. ग्राहकाला विनामास्क माल विक्री करू नये,
५. नागरिकांनी शक्यतोवर पायी किंवा सायकलवर खरेदी करण्यासाठी वापर करावा.
६. अत्यावश्यक सेवा वगळता इतर वस्तू घेण्यासाठी दूरच्या मार्केटमध्ये जाण्याची गरज नाह.

महापालिका प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे नागरिक व दुकानदारांनी काटेकोरपणे पालन करावे, नियमांचे भंग केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा आयुक्त सतिश कुलकर्णी यांनी दिला आहे.

Protected Content