ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बुलढाणा लोकसभा मतदारसंघाकरिता दुसऱ्या टप्प्यामध्ये २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्याकरता 4 एप्रिल आज रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने महाविकास आघाडीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिवसेनेचे नरेंद्र खेडेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळेस त्यांच्यासमवेत सुषमा अंधारे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे उपस्थित होते, तसेच आदित्य ठाकरे आणि रोहित पवार हे सभास्थळी येणार आहे. असे सुषमा अंधारे यांनी सांगितले. यावेळी ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की, कापूस-सोयाबीनचे भाव एकीकडे वाढत नसताना विद्यमान खासदारांची प्रॉपर्टी २००९ पेक्षा २०२४ पर्यंत पोहोचता पोहोचता १६ ते १८ कोटी झाली आहे, मात्र शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावत नसल्याचाही त्यांनी पुनरुचार केला.

Protected Content